पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी प्रांजळा | जैसी नाव स्त्रियां वाळां । तोयतरणीं ॥ १६ ॥ तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥ १७ ॥ आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह | मग सहजें हें अभिन्न । जाणसी तूं ॥ १८ ॥ ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति । निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥३॥ सम० - जाणावा तोचि संन्यासी इच्छा द्वेष नसे जया । निद्वंद्व जो अनायास बंधापासूनि सूटतो ॥ ३ ॥ आर्या- निर्द्वद्व महाबाहो निरीह जो द्वेषिनाच अन्यासी । पावेना बंध कधीं जाणावा सत्य तोचि संन्यासी ॥ ३ ॥ ऑवी - असा जाणावा संन्यासी । इच्छा द्वेष नसे मानसीं । द्वंद्व तोडोनि पावे ज्ञानासीं । बंधापासोनि मोकळा ॥३॥ तरी गोलियाची से' न करी । न पवतां चाड न धरी । जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥ १९ ॥ आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥ २० ॥ जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला । म्हणोनि सुखें सुख पावला । अखंडित ॥ २१ ॥ आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें । जे घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणऊनि ॥ २२ ॥ देखें अनि विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये । तैं ते काप व ये । जियापरी ||२३|| तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं । जयाचिये बुद्धी | संकल्प नाहीं ॥ २४ ॥ म्हणोनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । इयें कारणें दोनी सांगडे । संन्यास योगु ॥ २५ ॥ खरोखर स्पष्ट व सोपा आहे. ज्याप्रमाणें पाणी तरून जाण्यास बायकामुलांना नाव उपयोगी येते, त्याप्रमाणेच, तारतम्याने विचार केला असतां, हा कर्मयोगच सर्वाना सारखाच सुलभ आहे. या कर्मयोगाचे आचरण केलें असतां, कर्मसंन्यासाचें फळही अयाचित पदरांत पडतें. १६, १७ आतां, हे तुला नीट कळावे म्हणून मी तुला संन्याशाचं लक्षण सांगतों. त्यावरून कर्मसंन्यास व कर्मयोग यांचा अभेद तुझ्या लक्ष्यांत सहज येईल. १८ जो गेल्या वस्तूची आठवण करून कष्टी होत नाहीं, किंवा जी वस्तू प्राप्त होत नाहीं तिची हांव धरीत नाहीं, ज्याचे अंतरंग मेरुपर्वतासारखें निश्चळ असतें, १९ व 'मी, माझें ' ही भावना ज्याच्या हृदयांत तिळमात्रही नसते, पार्था, तो पुरुष 'नित्यसंन्यासी' समजावा. २० अशा अवस्थेला जो पोंचला, त्याला कर्मसंग कधींच बाधा करीत नाहीं. तो अखंड सुखानें सुखावलेला असतो. २१ अशा नित्यसंन्याशाला गृहदारादिक पसाऱ्याचा त्याग करावा लागत नाहीं, कारण, तो पुरुष संगहीन राहून, या पसाऱ्याशी आपला कांहीं एक संबंध नाहीं, हें जाणत असतो. २२ असें पहा, विस्तव विझून गेला, म्हणजे नुसती राखाडी मागें राहते, आणि मग ती राखाडी (वातीचें सूत काढतांना ) कापसाबरोबर चिमटीत धरितां येते, त्याप्रमाणेच संसाराच्या उपाधींमध्येही ज्याच्या बुद्धीला संकल्पविकल्पाची आंच लागत नाहीं, तो कर्मबंधांत सांपडत नाहीं. २३, २४ म्हणून संकल्पविकल्प जेव्हां मोडतात, तेव्हांच संन्यास घडतो; या कारणास्तव 'कर्मसंन्यास ' व ' कर्मयोग ' हे दोन्ही संगतिसोबतीनंच जाणारे आहेत. २५ १ आठवण.