पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १२७ निर्वाळा | अचुंवितु ये फळा । आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ॥ ७ ॥ जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्ग तरी बहुसाळ सांडे । तैसें सोहो कासना सांगडें । सोहपें होय ॥ ८ ॥ येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले | मग होईल ऐकें म्हणितलें । संतोपोनियां ॥ ९ ॥ देखा कामधेनुऐसी माये । सदैवा जया होये । तो चंही परी लाहे | खेळावया ॥ १० ॥ पाहें पां श्रीशंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता | देहजेचिना ॥। ११ ॥ तैसा औदार्याचा कुरुठा | श्रीकृष्ण आपु जाहलिया सुभटा । कां सर्व सुखांचा वैसौटा । तोचि नोहावा ॥ १२ ॥ एथ चमत्कारु कायसा | गोसावी श्रीलक्ष्मीकांताऐसा । आतां आपुलिया संवेसा | मागावा कीं ॥ १३ ॥ म्हणोनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें । तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ॥ १४ ॥ श्रीभगवानुवाच— संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ २ ॥ सम० – कल्याणकर संन्यास कर्मयोगहि हा परी । कर्मत्यागाहुनी थोर कर्मयोग विचारितां ॥ २ ॥ आर्या- संन्यास कर्मयोगहि दोन्ही कल्याणकर परंतु जनीं । कर्मत्यागाहुनि हा विचारितां कर्मयोग बहुत गुणी ॥२॥ ओवी - श्रीकृष्ण म्हणे पार्थ । कर्मसंन्यास दोन्ही उभयतां । फल एक दोहींचं विचारितां । परंतु कर्म श्रेष्ठ ॥ २॥ तो हा कुंतीसुता । हे संन्यास योगु विचारितां । मोक्षकरु तत्त्वता । दोनीही होती ॥ १५ ॥ तरी जणांनेणां सकळां । हा कर्मयोग कीर जो शेवटपर्यंत टिकून अचूक फळ देईल व जो आचरण्यासही स्पष्ट व सोपा होईल, तें मला सांगा. ६, ७ ज्यानें झोंपही मोडणार नाहीं, आणि प्रवासही बराच होईल, असें एकाद्या पालखीसारखं तें साधन सुखाचें व सोपं असावें. " ८ हे अर्जुनाचे बोल ऐकून श्रीकृष्णांना जरा मौज वाटली, आणि “ अर्जुना, ऐक, तूं म्हणतोस तसेंच हैं साधन अगदी सोपे व सुखाचं होईल." असें ते मोठ्या संतोषाने म्हणाले. ९ श्रोते हो, ही गोष्ट अगदींच यथार्थ आहे, कारण, ज्या दैवशाली मुलाची आई प्रत्यक्ष कामधेनूच आहे, त्याला खेळायला पाहिजे असेल तर चंद्रसुद्धां लाभेल. १० आणि असें पहा, कीं श्रीशंकर उपमन्यूला प्रसन्न झाले असतां, त्यांनी त्या उपमन्यूची दूधभाताची हौस पुरी करण्याकरितां दूतभातासाठीं प्रत्यक्ष क्षीरसमुद्रच त्याला दिला कीं नाहीं ? ११ त्याप्रमाणेंच औदार्यगुणाचें माहेरच असे श्रीकृष्ण त्या वीरश्रेठ अर्जुनाला प्रसन्न झाले असतां, सर्व सुखांनी त्याचा आश्रय कां न करावा ? १२ अहो, यांत नवल कसलें आहे ? श्रीलक्ष्मीपति कृष्णासारखा धनी लाभला असतां, आपल्या इच्छेप्रमाणे मागणे अवश्य करावें. १३ म्हणून अर्जुनानें ज्या ज्ञानाची याचना केली, तें श्रीकृष्णांनी त्याला मोठ्या आनंदानें दिलें. श्रीकृष्ण त्याला काय म्हणाले, तें आतां सांगतों, ऐका. १४ श्रीभगवंत म्हणाले, वा अर्जुना, दोनीही मोक्षप्राप्तीचेच मार्ग ठरतात. १५ 'कर्मसंन्यास ' व ' कर्मयोग' यांचा विचार केला, तर तरीपण जाणत्या नेणत्या सर्व जीवांना हा कर्मयोगच १ स्पष्ट. २ सोपा. ३ सुखासनाच्या तोलाचें, पालखीच्या बरोबरीचें. ४ आप्त, प्रसन्न ५ वसतिस्थान. ६ स्वेच्छेनें. ७ खरोखर.