पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय पांचवा अर्जुन उवाच - संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । तच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥ सम० - बोलोनि कर्मसंन्यास कर्मयोगहि बोलसी । दोहींत श्रेय जें एक कृष्णा तें सांग निश्चित ॥ १ ॥ आर्या - सांगसि कर्माचा तूं योगहि संन्यासही मला आंगें । कृष्णा या दोंमध्यें श्रेयस्कर एक निश्चयें सांगें ॥ १ ॥ ओंवी — पार्थ म्हणे कृष्णनाथा । संन्यासकर्म सांगतां । कर्म की संन्यास तत्वतां । निश्चय सांग ॥ १ ॥ तरी मग पार्थ श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें । एक होय तरी अंतःकरणें । विचारूं ये ॥ १ ॥ मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु । कर्मयोगी केवीं अतिसु । पोखीतसां पुढती ॥२॥ ऐसें व्यर्थ हैं बोलतां । आम्हां नेणतयांच्या चित्ता । आपुलिये चाडे श्री अनंता । उमजु नोहे ॥ ३ ॥ आइ एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥ ४ ॥ तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । जे हा परमार्थ ध्वनितें । न बोलावा ॥ ५ ॥ परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा । सांगें दोहोंमाजीं बरवा | मार्ग कवण ॥ ६ ॥ जो परिणामींचा मग अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, "देवा, तुमचें हें असें कसें हो बोलणें ! एक गोष्ट तुम्ही निश्चयाने सांगितली असती, तर तिचा आमच्या मनाला विचार करितां आला असतां १ मागें ' सर्व कर्माचा संन्यास करावा, ' म्हणून तुम्हींच बहुत प्रकारें सांगितलें, मग पुढे या कर्मयोगाचा मोठ्या आवडीनं पुरस्कार करतां, हें कसें ? २ असें दुटप्पी भापण केल्यामुळें, आम्हां अज्ञांच्या बुद्धीला जसा पाहिजे तसा समज पडत नाहीं. ३ असें पहा, देवा, जर एका तत्वसिद्धान्ताचा उपदेश करणें असेल, तर त्याविषयींचें आपलं भाषणही त्याला धरून निश्चित असले पाहिजे, डळमळीत असतां कामा नये. हें मी तुम्हांला सांगावें असें नाहीं. ४ म्हणून, तुम्हां सद्गुरूंना मी आरंभींच विनविलें होतें, कीं, परमार्थाचा उपदेश गूढपणाने करूं नका. ५ पण, देवा, तें आतां मागचं जाऊं द्या. आतांतरी या गोष्टीचा उघड उलगडा करा, आणि 'कर्मसंन्यास ' व ' कर्मयोग ' या दोहोंमध्ये असा अधिक चांगला मार्ग कोणता, कीं, १ आपल्या आवडीप्रमाणे, पाहिजे तसा २ सद्गुरूला ३ संक्षेपाने किंवा संदिग्धपणे,