पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा १२५ स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥ १९ ॥ तरी स्पर्धे सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी । तेवींचि कानांकरवी । म्हणवी वाप माझा ॥। २२० ।। तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें । आणि संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥ २१ ॥ जरी मंत्रेचि वैरी मरे | तरी वायां कां बांधावी कटारें । रोग जाय दुधसाखरें । तरी निंब कां पियावा ॥ २२ ॥ तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रिया दुःख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजी ॥ २३ ॥ म्हणोनि आथिलिया आरौणुका । गीतार्थ हा निका । ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदा ॥ २२४ ॥ असतो; मग त्याला जर अमृताची गोडी लाभली, आणि सुदैवानें सुस्वर नादही त्यांत उत्पन्न झाला, १९ तर तो आपल्या स्पर्शानें सर्व अंगाचा दाह शांतवितो, गोड रुचीनें जिभेला आनंदानें नाचवितो, आणि कानांना तृप्त करून त्यांच्याकडून 'धन्य ! धन्य' असे उद्गार वदवितो. २२० याप्रमाणें ही कथा ऐकिली म्हणजे कानांचें एकदम पारणे फिटतें, आणि कांहीं एक अपाय न होतां संसारदुःख समूळ नाहींसें होतें. २१ जर मंत्रानें शत्रु मरतो, तर हातांत कट्यार घेण्याचें कारण तें काय ? जर दूधसाखरेनें रोग नाहींसा होत असेल, तर कडूनिंबाचा रस कां म्हणून घ्यावा ? २२ याचप्रमाणें मनाला न मारतां आणि इंद्रियांना न दुखवितां, या कथाश्रवणानें आपोआप मोक्ष हातीं येतो, २३ म्हणून तेवढ्या शांतपणानें हा गीतार्थ नीट श्रवण करा, असें श्रीनिवृत्तिनाथांचा शिष्य ज्ञानदेव म्हणत आहे. २२४ १ श्रेष्ठ, धन्य, २ घालवणे, निर्मूळ करणें. ३ असलेल्या, असेल तेवढ्या, ४ स्वस्थपणाने, शांतपणे.