पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी निःशेखता फिटे । मानसींचा ॥ ७ ॥ याकारणें पार्थो । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥ ८ ॥ ऐकें सर्वज्ञाचा वपु । जो श्रीकृष्णु ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृप । ऐसें राया ॥ ९ ॥ तंत्र या पूर्वापर बोलाचा | विचारूनि कुमर पांडूचा | कैसा प्रश्न अवसरींचा । करिता होईल ॥ २१० || ते कथेची संगति । भावाची संपत्ति । रसाची उन्नति । म्हणिपैल पुढां ॥११॥ जयाचिया वरवेपणीं । कीजे आठां रसांची वोवाळणी । जो सजनाचिये यणी | विसांवा जगीं ॥ १२ ॥ तो शांतुचि अभिनवेल | ते परियसा मऱ्हाठे बोल । जे समुद्राहूनि सखोल | अर्थभरित ॥ १३ ॥ जैसें विंग तरी बचकेचिएवढें । परि प्रकाशासि त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥ १४ ॥ ना तरी कामितयाचिया इच्छा | फळें कल्पवृक्षु जैसा । वोलु व्यापक होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥ १५ ॥ हें असो काय म्हणावें । सर्वज्ञ जाणती स्वभावें । तरी निकेँ चित्त द्यावें । हे विनंति माझी || १६ || जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥ १७ ॥ आधींचि साखर आवडे । तेचि जरी ओखदीं जोडे । तरी सेवावी ना कां कोडें । नानावा ॥ १८ ॥ सहजें मलयानिलु मंदु सुगंधु । तया अमृताचा होय मनांत याचा यत्किंचितही शेष उरत नाहीं. ७ यास्तव, गा पार्था, झटकर ऊठ आणि आपल्या हृदयांत राहणाऱ्या या संशयाचा नाश करून टाक. ८ अशा प्रकारें सर्वज्ञश्रेष्ठ व ज्ञानदीपक श्रीकृष्ण अर्जुनाला कृपापूर्वक म्हणाले. हे राजा धृतराष्ट्रा, ध्यानीं घे. ९ श्रीकृष्णांच्या मागच्या व आतांच्या भाषणाचा विचार करून अर्जुन आतां काय प्रभ करील, २१० भक्तीचें भांडार आणि रसाविर्भावाची प्रौढीच असा तो प्रसंग पुढे सांगण्यांत येईल. ११ ज्या शांतरसाच्या गोडपणावरून बाकीचे आठ रस नुसते ओंवाळून टाकावेत, ज्या शांतरसांत सज्जनांच्या बुद्धीला विसांवा सांपडतो, १२ तो शांतरस या कथेंत अपूर्व परिपाकाला येईल; आणि ही कथा तुम्हीं समुद्राहूनही खोल अशा अर्थपूर्ण मराठी शब्दांतच ऐकावी. १३ जसें सूर्यबिंब नुसतें बचकेएवढें दिसतें, पण त्याच्या प्रकाशास त्रैलोक्यही अपुरेंच ठरतें, तसाच या मराठी शब्दांचा व्यापकपणाही अनुभवास येईल. १४ किंवा, मागणाराच्या इच्छेप्रमाणें जसा कल्पवृक्ष फळ देतो, तसाच या मराठी शब्दांचा व्यापकपणा श्रोत्यांच्या इच्छेप्रमाणे कमीजास्त होणारा आहे. म्हणून आपण सावधानपणे ऐकावें. १५ परंतु, हें पुरे झाले. आपण सर्वज्ञत्र आहां, तेव्हां आणखी काय सांगावें ? नीट लक्ष्य द्या, एवढीच माझी विनंति आहे. १६ ज्याप्रमाणं एकाद्या स्त्रियेच्या ठिकाणीं लावण्य, गुण, व कुलीनपणा, हीं असून पातिव्रत्यही असावें, त्याप्रमाणेच या ओंवीमध्यें वाङ्मयाचे ललित गुण आणि शांतरस हे स्पष्ट दिसत आहेत. १७ आधींच साखर आवडती, आणि त्यांत जर ती औषध म्हणून देण्यांत आली, तर ती पुन्हा पुन्हां मोठ्या आनंदाने कां खाऊं नये ? १८ मलयवायु मूळचाच मंद आणि सुगंध १ श्रेष्ट. २ बुद्धीला ३ अपूर्वपणानें प्रकट होईल. ४ वारंवार, पुन्हा पुन्हों.