पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा १२३ गा ॥९८॥ जया काळज्वरु आंगीं वाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ॥ ९९ ॥ तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयी तो नोळखे । हिताहित ॥ २००॥ हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयी असतां कांहीं । मना न ये ॥ १ ॥ योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंच्छिन्नसंशयम् । आत्मवन्तं न कर्माणि निवध्नन्ति धनंजय ॥ ४१ ॥ सम० – कर्मयोगांत संन्यासी जो शास्त्रं मुक्तसंशय । जो आत्मज्ञ तया कर्मै न बाधति धनंजया ॥ ४१ ॥ आर्या -- योगें कर्मै त्यागी ज्ञानें छेदीच संशया त्याला । जाणें धनंजया तूं कर्मै बाधिति न आत्मवेश्याला ॥। ४१॥ ओंवी — कर्मयोगार्ते करिती । जे शास्त्रें मुक्त होती । आत्मज्ञानात पावती । धनंजया ॥ ४१ ॥ म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वोर | प्राणियासी ॥ २ ॥ येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एक जिणावा | जो ज्ञानाचिया अभावा- | माजीं असे ||३|| जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणोनि सर्वथा मार्ग मोडे । विश्वासाचा ॥ ४ ॥ हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥ ५ ॥ तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः । छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४२ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥ सम०--तस्मात्संशय अज्ञानें जो मन छेदुनी तथा । ज्ञानखङ्गे आणि ऊठ स्वकर्म करिं भारता ॥ ४२॥ आर्या - यास्तव अज्ञानें जो हृदयीं उपजुनि करी महा तूट । ज्ञानासीनें छेदुनि संशय तो कर्मयोग करिं ऊठ ॥ ४२ ॥ ओंवी — याकारणें अज्ञान । हृदयीं उपजे संशय करून । तें ज्ञानें तोडून । योग करीं ॥ ४२ ॥ ऐसा जरी थोरावे | तरी उपायें एकें आंगवे । जरी हातीं होय वरखें । ज्ञानखड्ग ॥ ६ ॥ तरी तेणें ज्ञानशस्त्रे तिखटें । निखंळु हा निटे । मग सत्यनाशच झाला ! तो ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही सुखांना आंचवतो. ९८ ज्याच्या अंगांत भयंकर ताप आहे, त्याला जसा थंड आणि उष्ण यांतील भेद कळत नाहीं, तो जसा आग आणि चांदणें हीं दोन्हीं सारखीच समजतो, ९९ त्याप्रमाणे या संशयपतिताला खरें आणि खोटें, असंबद्ध आणि योग्य, हित आणि अहित, यांची ओळख पटत नाहीं. २०० जन्मांधाला जसें रात्रिदिवसांचें भान नसतें, तसेंच संशयमग्नाला 'कांहींही कळत नाहीं. १ म्हणून, या संशयाएवढें घोर पातक दुसरें जगांत नाहीं. प्राण्याला पकडून त्याचा सत्यनाश करण्याकरितां हें एक जाळेंच आहे. २ म्हणून, ज्ञानाच्या अभावानें उत्पन्न होणारा हा संशय तूं सोडावास. या एकालाच तूं पहिल्याप्रथम जिंकले पाहिजेस. ३ जेव्हां अज्ञानाचा गुडूप अंधार पसरतो, तेव्हां याला फारच जोर चढतो आणि श्रद्धेचा मार्ग सर्वस्वीं खुंटतो. ४ मग हा हृदयांत सांठवत नाहींसा होऊन, बुद्धीला ग्रासतो, आणि लवकरच सर्व भुवनत्रयच त्या पुरुषाला संशयमय होते. ५ पण हा संशय जरी असा माजला, तरी तो एका उपायानें हारीस येतो. जर आपल्या हातांत ज्ञानाची लखलखीत तरवार असली, ६ तर त्या तिखट तरवारीनं याचा निर्मूळ नाश होतो आणि १ जाळे, २ आहारी येतो, आवरतो. ३ अगदी, सर्वस्वी. ४ नष्ट होतो.