पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मवोधाचा ॥ ८९ ॥ मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीचि देखिजे । तेथ आपपरु नेणिजे । निर्धारितां ॥ १९० ॥ ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानवीजाचा विस्तारु । सांगतां असे अपारु । परि असो आतां ॥ ९१ ॥ सम०-- अज्ञश्राश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४० ॥ - बुडे अज्ञ तसा श्रद्धाहीन संशयबुद्धिही । त्यांत संशयबुद्धीला न दोन्ही लोक ना सुख ॥ ४० ॥ आर्या - जो अज्ञ अविश्वासी करि संशयवंत आपुला नाश । लोकद्वय नाहींही सुख नाहीं ज्यास संशय मनास ॥४०॥ ओवी - - श्रद्धाहीन ज्ञानहीन । तो संशयबुद्धी जाण । त्या दोन्ही लोक नाहीं जाण । सुख त्या नसे ॥ ४० ॥ ऐकें जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं । तयाचें जियाले म्हणों काई | वरी मरण चांग ॥ ९२ ॥ शून्य जैसें गृह । कां चैतन्येवीण देह । तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीन ॥ ९३ ॥ अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परि ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पैं ॥ ९४ ॥ वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरी मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥ ९५ ॥ जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचि आरोचकु जैं पडे । तें मरण आलें असे फुडें । जाणों एकीं ॥ ९६ ॥ तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे । तो संशयें अंगिकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥ ९७ ॥ मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि शोधीत येतें. ८८ तें ज्ञान अंतःकरणांत ठसलें, आणि शांतीचा उद्भव झाला, की मग आत्मबोधाचा प्रचंड विस्तार होतो. ८९ असें झालें, म्हणजे ज्या ज्या दिशेला तो पाहतो, तेथे तेथे त्याला शांतीच दिसते आणि त्याची आपपर भावना साफ नाहींशी होते. १९० असा हा अधिकाधिक होणारा ज्ञानवीजात्रा अपरंपार विस्तार किती म्हणून सांगावा ! तेव्हां एवढेच पुरे. ९१ अर्जुना, ज्या प्राण्याला अशा या ज्ञानाची चाड नाहीं, त्याच्या जिण्यापेक्षां मरणच बरें. ९२ ओसाड घर किंवा प्राणहीन शरीर, तसें त्याचें तें ज्ञानहीन जिणें केवट भ्रमिष्टपणाचें असतें. ९३ किंवा, ज्ञान प्राप्त झालेलें तर नाहींच पण निदान त्याच्याविषयीं कांहीं तरी आदर वाटत आहे, अशी कोणाची स्थिति असेल, तर त्याच्या ठिकाणीं ज्ञानप्राप्तीचा कांहीं तरी ओलावा संभव आहे, असं समजावं. ९४ ज्याला ज्ञान नाहीं, त्याला किंमत नाहींच; तरी पण ज्ञान नसून, शिवाय ज्ञानाविषयीं नुसता आदरही नसेल, तो प्राणी संशयाच्या आगीत भस्म झाला, असेंच जाण. ९५ प्रत्यक्ष अमृतही रुचीला येत नाहीं, असं जेव्हां एकाद्याला आपोआप अवढणं येतें, तेव्हां त्याचें मरण ओढवले आहे, असे स्पष्ट जाणावें, ९६ त्याप्रमाणेच जो विषयसुखांत रंगतो आणि ज्ञानाचें ज्याला अवढणें पडतें, तो खास संशयानं झपाटला आहे, असें सिद्ध होतें. ९७ मग जो संशयांत पडला, त्याचा १ चार दिशा. २ स्वाभाविक, आपोआप. ३ अवढर्णे. ४ स्पष्ट.