पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्णाश्रमसंस्थेचे समर्थन १५ योगाभ्यासी मंडळी असल्यामुळे त्यांनीं गीतेच्या सहाव्या अध्यायांतील कांही लोकांना बराच ताण देऊन, योग- साधनाच्या प्रवृत्तीच्या मूळाशीं निवृत्तीचेंच तत्त्व आहे, असे प्रतिपादिले आहे. ज्ञानदेव सांगतात- तेथ प्रवृत्तितरूच्या बुडीं दिसती निवृत्तिफळ चिया कोडी, जिये मार्गीचा कापडी महेशु आझुनी. १५३ पैल योगिवृंद वहिलीं आडवीं आकाशीं निघालीं, कीं तेथ अनुभवाचां पाउलीं धोरणु पडिला. १५४ अध्याय ६ याप्रमाणे आदिनाथ शंकरांच्या या पंथराजाचा' उल्लेख करून, यापुढे ज्ञानदेवांनीं योगाभ्यासांतील आसन- मुद्रांचे वगैरे यथास्थित विस्तरशः वर्णन केले आहे, आणि आपण हा इतका विस्तार कां केला, याचे कारणही त्यांनी नमूद केले आहे, तें असें- पिंडे पिंडाचा ग्रासु, तो हा नाथसंकेतींचा दंशु, परि दाऊनि गेला उद्देशु श्रीमहाविष्णु. २९१ तया ध्वनिताचें के सोडुनी, यथार्थाची घडी झाडुनी, उपलविली म्यां जाणुनी ग्राहीक श्रोते. २९२ अध्याय ६ परंतु, ज्ञानदेव जरी स्वतः नाथपंथी ( म्हणजे योगाभ्यासी ) होते, तरी हा पंथ सामान्य जनांना साध्य होणें अशक्य आहे, हेंही ते जाणून होते. म्हणून तर त्यांनी ज्ञानदेवींत योग्य प्रसंग आला त्या वेळी हा कष्टसाध्य मार्ग न अनुसरतां, भक्तीच्या सोप्या पायवाटेनेंच जावें, असा सर्व जनांना उपदेश केला आहे. गीता, अध्याय १२, श्लोक ४ वरील टीकेंत योगसाधनेर्चे थोडक्यांत वर्णन देऊन ज्ञानदेव म्हणतात- ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहंसिद्धी आंगविताती निरवधी योगदुर्गे, ५७ आपुलिया साटोवाटीं शून्य घेती उठाउठी, तेही मातेंचि किरीटी, पावती, गा. ५८ वांचूनि योगाचेनि बळें अधिक कांहीं मिळे ऐसें नाहीं, आगळें कष्टचि तया. ५९. अध्याय १२ एकंदरीत ज्ञानदेवांनी चातुर्वर्ण्यास कंटाळून नाथपंथ घेतला, हें म्हणणे अयुक्त आहे. योगाभ्यास हे नाथपंथाचे वैशिष्टय आहे, बाकी तो भक्तिमार्गांतील वैष्णवपंथ आहे, व त्यास वर्णाश्रम संस्था सर्वस्वी मान्य आहे. शंकरांच्या विष्णुभक्तीचा ज्ञानदेवींत मोठ्या आवडीनें अनेक वेळा उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ, करितां तापसांची कडसणी, कवणु जवळां ठेविजे शूळपाणी ? तोही अभिमानु सांडूनि पायवणी माथां वाहे. ३७९. अध्याय ९ आजकालच्या परिस्थितीनुसार वर्णाश्रमसंस्थेवर हल्ली चहूंकडून आघात पडत आहेत. कोणी राजकारण साधण्यासाठी तर कोणी समाज सुधारण्यासाठीं, कोणी स्वातंत्र्यासाठी तर कोणी समतेसाठी, कोणी धर्मप्रसारासाठी तर कोणी हिंदूचें संख्याबळ वाढविण्यासाठी, वर्णभेद व जातिभेद यांच्यावर निग्रहाने मोहीम काढीत आहेत. हें योग्य व हितावह आहे कीं नाहीं, याचा आम्ही येथे विचार करीत नाहीं. परंतु असे करतांना ज्ञानदेवांपासून तुकारामांपर्यंतच्या साधुसंतांनी चोखाळलेल्या वाटेनेंच आम्ही ही मोहीम काढीत आहों, असा जो कित्येकांकडून भुलावणीचा बहाणा करण्यांत येतो, त्या बहाण्याचा मात्र आम्ही मनःपूर्वक निषेध करितों; कारण या साधुसंतांना वर्णाश्रम संस्था, जातिनिर्बंध, कुलाचार, वगैरे सर्व कांहीं पाहिजे होतें. मग आपल्या हल्लीच्या चळवळी खोट्या बतावणीनें साधुसंतांच्या नांवावर विकण्यांत काय अर्थ आहे ? त्यांची स्थिति व दृष्टि निराळी, व आपली आजची स्थिति यदृष्टि निराळी; मग संतवचनांच्या तुटक तुटक चिंध्या घेऊन, त्यांची विचित्र गोधडी करून, व तिची वुथी वळून, ती पांघरण्यांत संतांची शोभा रहात नाहीं, व आपलीही किंमत होते. ज्ञानदेवांनी ज्ञानदेवींत सामाजिक भेदभावाचे गौरव करण्याची संधि सहसा वायां जाऊं दिली नाहीं. भक्तिमार्गात, मोक्षसाधनांत, किंवा तात्त्विक जीवनांत, सर्व माणसेंच काय, पण प्राणी, किंबहुना समग्र भूतसृष्टि एकस्वरूपच आहे, त्यांत भेदाभेदास तिमाही जागा नाही, हे तत्त्व ज्ञानदेवांना पूर्ण संमत आहे; परंतु संसारांत, व्यवहारांत, सामाजिक आचारांत, SHA : मप्र प्र प्र प्र म मम मम