पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा १२१ या महातेजाचेनि कैसें । जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे । कां विसिलें गिवसे । आकाश हैं ॥ ७९ ॥ ना तरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळे जरी जोडे । तरी उपमा ज्ञानीं घडे । पांडुकुमारा ॥ १८० ॥ म्हणूनि बहुत परी पाहतां । पुढेतीपुढती निर्धारितां । हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ॥ ८१ ॥ जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे । तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥ ८२ ॥ आतां यावरी जें बोलणें । तें वायांचि वेळु फेर्डणें । तंव तें साचचि हें पार्थ म्हणे । जें बोलत असां ।। ८३ ।। परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंब पुसावें । तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥ ८४ ॥ मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देयीं इये गोठी । सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपावो तुज ॥ ८५ ॥ श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९ ॥ सम० श्रद्धालु तो ज्ञान पावे जो तत्पर जितेंद्रिय ज्ञान पावोनि जे शांति थोर तो शीघ्र पावतो ॥ ३९ ॥ आर्या- तत्पर विजितेंद्रिय तो ज्याच्या चित्तीं सदैव विश्वास । ज्ञानें शांतिस पावे वदतों मी कृष्ण तुजचि विश्वास ॥३९॥ ओवी - ज्ञान पाविजे भक्ति करूनी । इंद्रिये नेमिजे तत्पर होऊनी । ज्ञाननिष्ठा पावोनी । थोरव पावती ॥ ३९ ॥ तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां । जयाच्या ठायीं इंद्रियां । मानु नाहीं ॥ ८६ ॥ जो मनासी चाड न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥ ८७ ॥ तयातेंचि गिवसित । तें ज्ञान पावे निश्चित । जयामाजीं अचुंवित | शांति असे ॥ ८८ ॥ या महातेजस्वी सूर्यबिंबाच्या कसाला जर त्याच्या प्रतिबिंबाचा चोखपणा उतरला, किंवा या आकाशाची जर मोट बांधतां आली, ७९ किंवा पृथ्वीच्या तोलाचें जर वजन हातीं आलें, तरच, बा अर्जुना, या ज्ञानाला जगांत उपमा लाभेल, नाहीं तर नाहीं. १८० म्हणून, सर्व परींनी पाहतां आणि पुन्हां पुन्हां विचार करतां असेंच ठरतें, कीं, ज्ञानाची पवित्रता ज्ञानांतच आहे, ती इतरत्र आढळणें नाहीं. ८१ ज्याप्रमाणें अमृताची चव कशी असते, हें सांगणे झाल्यास, ती अमृतासारखीच असते, असेंच म्हणावं लागेल, त्याप्रमाणें ज्ञानाला उपमा ज्ञानाचीच ! ८२ असो, आतां यावर आणखी बोलणे, म्हणजे काळाचा अपव्यय करणें आहे. " असें श्रीकृष्ण बोलल्यावर, अर्जुन म्हणाला, "देवा, आपण म्हणतां तें खरें. " ८३ पण, 'हें ज्ञान ओळखावें कसें?' असा प्रश्न विचारण्याचे अर्जुनानें जो मनांत आणिलें, तोच त्याचें इंगित जाणून, ८४ देव म्हणाले, "बा अर्जुना, ज्ञान साधण्याचा उपाय तुला मी सांगतों, तो ऐक. ८५ आत्मसुखाची गोडी चाखल्यामुळें, जो सर्व विषयांचा वीट मानतो, जो इंद्रियांचे लाड करीत नाहीं, ८६ ज्याला मनाची भीड पडत नाहीं आणि जो मायिकाला भुलत नाहीं, जो श्रद्धाबुद्धीच्या संगतीनें सुखी झाला आहे, ८७ त्यालाच अखंड व निर्दोष शांतीने भरलेले हे ज्ञान निःसंशय १ कसाला, चोखपणाला. २ वजन ३ सांपडे, ४ पुन्हा पुन्हां. ५ वेळ व्यर्थ दवडणें. १६