पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० सार्थ श्रीज्ञानेश्वरी अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः । सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥ ३६ ॥ सम० - अससी थोरही पापी पापियां सकळांत तूं । तरी या ज्ञाननावेनें तरसी पापसागर ॥ ३६ ॥ आर्या-मोठा पापी अससी जरि पापासी तुझ्या नसे पार । ज्ञानलत्र घेउनियां जासिल वृजनाविधच्याच तूं पार ॥ ३६ ॥ ओवी - सकळ पापियांमाझारी । थोर पातकी तूं अससी जरी । तरी या ज्ञाननावेंत निर्धारीं । तरसी पापसागर ॥ ३६ ॥ जरी कल्मपाचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होउनी अससी ॥ ७१ ॥ तन्ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोडें । ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ||७२ || देखें विश्वसंभ्रमाऐमा । जो अमूर्तचा कडेवसा । तो जयाचिया प्रकाशा | पुरेचिना ॥ ७३ ॥ तया कायसे हे मनोमळू । हें बोलतांचि अति किडांळू । नाहीं येणें पाडें दिसो | दर्जे जगी ॥ ७४ ॥ यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन । ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ३७ ॥ सम० - कीं जसा पेटला अग्नी काष्ठे जाळी जशीं तशीं । ज्ञानाग्नि करितो भस्म सर्वही पुण्य- पातकें ॥ ३७ ॥ आर्या - जैसा समिद्ध अनी करितो भस्म क्षणामधे काष्टां । कर्मै भस्म करावी ज्ञानानीनें तशी पराकाष्टा ॥ ३७॥ ओवी - जैसे महाभार इंधन । भस्म होय अभिसंगें जाण । सर्व कर्मे जाळून । ज्ञानाभि भस्म करी ॥ ३७ ॥ सांगें भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उबली । तिये प्रळयींचे वाहुळी । काय अभ्र पुरे || ७५ || कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पळिपे । तो प्रळयान काई दडपे । तृणें काष्ठें ॥ ७६ ॥ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ३८ ॥ सम० - ज्ञानासम नसे शुद्ध कांहीं तें ज्ञान हा स्वयें । ज्ञाताच्या जें योगयत्नें काळें चित्तांत बिंबतें ॥ ३८ ॥ आर्या - नाहीं सम ज्या दुसरें पवित्र ज्ञानामधे नसे काळें । तें तूं स्वकर्मयोगें होउनि संसिद्धि पावसी काळें ॥ ३८ ॥ ओंवी - ज्ञानासारिखें पवित्र । आणिक नाहीं सर्वत्र । तें ज्ञान सिद्धियोग करितां निरंतर । कार्लेकरूनि पाविजे ॥ ३८ ॥ म्हणोनि असो हैं न घडे । तें विचारितांचि अँसंगडें । पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥ ७७ ॥ एथ ज्ञान हैं उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे । जैसें चैतन्य कां नोहे । दुसरें गा ॥ ७८ ॥ तूं जरी पापाचे आगर, अज्ञानाचा सागर, आणि विकाराचा डोंगर असलास, ७१ तरी या परम ज्ञानाच्या शक्तीशीं तुलना केली असतां, हे सर्व कस्पटासारखं ठरते, इतके विलक्षण उत्तम बळ या ज्ञानाच्या अंगी आहे. ७२ अरे, अमूर्त अशा परमतत्त्वाची ही विश्वाभासरूपी सावलीही ज्याच्या प्रकाशापुढें उरत नाहीं, ७३ त्याला तुझ्या मनांतील मळ झाडून टाकण्यास कितीसे श्रम पडणार ? अरे, ही शंकाच मुळीं वेडेपणाची आहे. या ज्ञानाच्या तोलाचं असं मोठं व व्यापक या जगांत दुसरे कांहींच नाहीं. ७४ हे पहा, त्रिभुवन पेटून जो धूर आकाशांत उसळला, त्या प्रव्यकाळच्या वाहुळीपुढे अभ्रं कितीश पुरी पडणार ? ७५ किंवा जो प्रत्यक्ष पाण्यालाच जाळतो, असा वाऱ्याच्या जोरानें धडाडलेला प्रयानि गवतांनी आणि लांकडांनी दडपला जाईल काय ? ७६ एकंदरीत, 'या परम ज्ञानानं मनोमन्द्र जाणार नाहीं, ' हें म्हणणें, विचार करितां, असंबद्ध ठरते. शिवाय, या ज्ञानासारखं जगांत कांहींच पवित्र नाहीं. ७७ या जगांत जसं चैतन्याशिवाय दुसरें कांहीं चैतन्याला उपमान नाहीं, तसं हे ज्ञानच एकटें उत्तम आहे, याच्यासारखे दुसरें कांहीं नाहीं. ७८ १ काळोख, सावली. २ वाईट, वेडेपणाचें. ३ मोटे, व्यापक ४ धूर. ५ उसळली. ६ जाळतो. ७ असंबद्ध. ८ शिवाय.