पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा ११९ दिठी गेली । जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंगु ॥ ६१ ॥ मनाचे मनपण गेलें । जेथ वोलाचें वोलकेपण ठेलें । जयामाजीं सांपडलें । ज्ञेय दिसे ॥ ६२ ॥ जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोमु तुटे । जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ॥ ६३ ॥ तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेश्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ३४ ॥ सम० - तें जाण वंदनें प्रश्नं संतसेवेकरूनियां । शास्त्रज्ञ तत्वज्ञ तुतें तें ज्ञान उपदेशिती ॥ ३४ ॥ आर्या- तें तूं नमनें प्रश्नं गुरुसेवेनें धनंजया जाण । तत्वज्ञानी ज्ञाना उपदेशिति गुज सख्या तुझी आण ॥ ३४ ॥ ओंवी — रिघावें सद्गुरूसी शरण । करावें पादसेवन । मग ते तुज उपदेशिती ज्ञान । तेणें पावन होशील ॥ ३४ ॥ तें ज्ञान पैं बरवें । जरी मनीं आथी आणावें । तरी संतां यां भजावें । सर्वस्वेंशीं ॥६४॥ जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तो स्वाधीन करीं सुभटा | वोळगोनी ॥ ६५ ॥ तरी तनुमनुजीवें | चरणासी लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ।। ६६ ।। मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगतील पुसिलें । जेणें अंतःकरण वोधलें । संकल्पा न ये ॥ ६७ ॥ यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव । येन भूतान्यशेषेण द्रश्यस्यात्मन्यथो मयि ॥ ३५ ॥ सम० - जें जाणोनि पुन्हा ऐसा न मोहसिल देखसी । चराचरा आपणांत मजसीं मग ऐक्य तूं ॥ ३५ ॥ आर्या-ज्या ज्ञानेंचकरुनियां पावसि पार्था पुन्हा न मोह महा । जेणें समग्र भूतें स्वात्मा निरखिशि ममात्मपरसम हा ३५ ओवी - ऐसें ज्ञान जाणितल्यावरी । मग मोह न पावसील संसारीं । आत्मरूप देखसी चराचरीं । ऐक्यतेसीं ॥ ३५ ॥ जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निर्धडें । ब्रह्माचेनि पांडें । निःशंकु होय ॥ ६८ ॥ ते वेळां आपणपेयां सहितें । इयें अशेपेंही भूतें । माझ्या स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥ ६९ ॥ ऐसें ज्ञानप्रकारों पाहेलें । तैं मोहांधकार जाईल । जैं श्रीगुरुकृपा होईल । पार्था गा ॥ १७० ॥ असतां, कर्माची आवड दुर्बल होते, तर्क आंधळा होऊन बसतो, इंद्रियांना विषयसेवनाचा विसर पडतो, ६१ मनाचं मनपणच मोडतं, बोलाचा बोलकेपणाच खुंटतो, आणि ज्ञेयाचा पत्ता लागतो. ६२ जे ज्ञान वैराग्याची हौस पुरवितें, विवेकाचें समाधान करतें, आणि अनायासानें आत्मतत्त्वाशीं गांठ घालून देते, ६३ तें अत्युत्तम ज्ञान जर मिळविणं असेल, तर खन्या जीवाभावानें या संतसज्जनांची सेवा करावी, ६४ कारण, ज्ञानाच्या मंदिराचा ही साधुसेवा उंबरठा आहे. म्हणून, अर्जुना, तूं मोठ्या उत्सुकतेने इकडे वळून याला गांठ ६५ यासाठीं तनमनप्राणानें संतांच्या चरणी लागावं आणि निरभिमानपणे त्यांची सर्व प्रकारें सेवा करावी. ६६ असें केलें, म्हणजे ज्या ज्ञानाची आपल्यास इच्छा आहे, त्यासंबंधं प्रश्न केला असतां, ते संत तेंही ज्ञान उपदेशितील, आणि तें ज्ञान असें आहे, कीं, ज्याचा उपदेश अंतःकरणाला झाला म्हणजे तें संकल्पहीन होतं; ६७ आणि ज्याच्या प्रकाशानें चित्त निर्भय होऊन परब्रह्माच्या बरोबरीला येतें. ६८ अशी अवस्था प्राप्त झाली, म्हणजे, बा अर्जुना, तूं आपणा स्वतःसहित या समस्त भूतमात्राला माझ्या स्वस्वरूपांतच अखंड पाहाशील. ६९ पार्था, ज्या वेळीं श्रीसद्गुरूची कृपा होईल, तेव्हां अशा ज्ञानप्रकाशाची पहांट होईल आणि अज्ञानाचा काळोख पार मावळेल. १७० १ वा २ उत्सुकतेने वळून ३ निर्भय ४ पहांट होईल, उजाडेल,