पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासें ॥ ५२ ॥ येरां विरक्ति माळ न घालिचि । जयां संयमानीची सेवा न घडेचि । जे योगयागु न करितीचि । जन्मले सांते ॥ ५३ ॥ जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई । म्हणोनि असो हे गोठी पाहीं । पांडुकुमरा ॥ ५४ ॥ एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ३२ ॥ सम० - विस्तारले बहु असे यज्ञ ब्रह्वयाचिया मुखं । सर्व कर्मज ते जाण ऐसें जाणोनि सूटसी ॥ ३२ ॥ आर्या - एवं बहुविध यज्ञ श्रुतिनें सांगीतलें असें स्वमुखें । कर्मज अवघे ऐसे जाणुनि हो मुक्त तूं निजात्मसुखें ॥३२॥ ओवी - ऐसे बहु विस्तारले । यज्ञ ब्रह्म झाले । सर्व कर्म विस्तारलें । हें उमजल्या सूटसी ॥ ३२ ॥ ऐसे बहुत परीं अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारूनि वेदेचि चांग । म्हणितले आहाती ॥ ५५ ॥ परि तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्म सिद्ध जाणावें । येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ।। ५६ ।। श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परंतप । सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ३३॥ सम० – द्रव्ययज्ञाहुनी श्रेष्ठ ज्ञानयज्ञचि अर्जुना । लौकिक वैदिक कर्मों सर्व ज्ञानींच संपती ॥ ३३ ॥ आर्या - द्रव्यमखाहुन अधिक ज्ञानमखा जाणते भवा तरती । ज्ञानेंकरूनि कर्मों अवघीं सांडुनि परंतपा परतीं ॥ ३३ ॥ ओवी—सांगितला द्रव्ययज्ञ । ब्रह्मार्पण बहुत यज्ञ । लौकिक वैदिक यज्ञ । ज्ञानीं हे सर्व संपती ॥ ३३ ॥ अर्जुना वेदु जयांचें मूळ | जे क्रियाविशेषे स्थूळ । जयां नेव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥ ५७ ॥ ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैसी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥ ५८ ॥ देखें परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जें न विसंविती अंजन | उन्मेपनेत्रीं ॥ ५९ ॥ जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यवोधाची खाणी । जें भुकेलिया धणी । साधनाची ॥। १६० ।। जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची होऊन अमरपणाला पोंचले, ते सहजच ब्रह्मस्वरूप होतात. ५२ ज्या इतरांना या आत्मसंयमरूप अम्मीची सेवा घडत नाहीं, जे जन्माला येऊन हा योगयाग संपादीत नाहींत, त्यांना वैराग्य कधींही लाभत नाहीं. ५३ ज्यांना लौकिक क्रियाही नीट संपादितां येत नाहींत, त्यांच्या पारलौकिक अवस्थेची गोष्टच बोलावयास नको. ५४ याप्रमाणे मी तुला जे अनेक यज्ञप्रकार सांगितले, त्यांचा वेदांमध्यें, चांगली फोड करून, विस्तार केला आहे. ५५ पण आपल्याला त्या विस्ताराशीं काय करावयाचें आहे? अशा प्रकारें केलेलें कर्म खरं यशस्वी होते आणि असें कर्म स्वाभाविकपणेंच बंधक होत नाहीं, हें ध्यानीं घ्यावें, म्हणजे झाले. ५६ अर्जुना, वेदामध्यें जे बाह्यक्रियाप्रधान स्थूल यज्ञ सांगितले आहेत, त्यांचे नवलाचें फळ स्वर्गसुख हैं आहे. ५७ ते यज्ञ म्हणजे जड द्रव्याचे हवन; त्यामुळे, जशी सूर्याजवळ तारांच्या तेजाची प्रौढी फिकी पडते, तसे ते सर्व जड यज्ञ या ज्ञानयज्ञाशीं तोलतां हलके ठरतात. ५८ अरे, जें ज्ञान स्फूर्तींच्या डोळ्यांला दिव्य अंजनासारखे होतें, आणि परमात्मसुखाचा गुप्त ठेवा सांपडावा म्हणून ज्याला योगीजन कधींही दूर होऊं देत नाहींत, ५९ जें ज्ञान चालू कर्माचें अखेरचें फळ, निष्कर्मपणाची खाण, आणि तळमळणाऱ्या साधकांचं पूर्ण समाधान आहे, १६० जें ज्ञान प्राप्त झालें १ जन्माला आले असतो. २ नवलाचें, अपूर्व ३ अखेरचें फळ.