पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा ११७ अपने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे । प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ २९ ॥ सम० - अपान होमिती प्राण प्राणी तोचि अपानही । प्राणापान निरोधूनी प्राणायामास तत्पर ॥ २९ ॥ आर्या-प्राणी अपान होमे प्राण अपानी कुणी स्वबोधानें । प्राणापानगतीतें रोधुनि असती समीररोधानें ॥ २९ ॥ ओवी - अपान होमिती प्राणीं । अपानीं प्राण अर्पुनी । हठयोग हा जाणोनी । यज्ञे यज्ञफळ पावती ॥ २९ ॥ मग अपनाग्नीचेनि मुखीं । प्राणद्रव्ये देखीं । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥ ४४ ॥ एक अपानु प्राणी अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणती । पांडुकुमरा ।। ४५ ।। अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति । सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ३० ॥ सम० - कोणी नेमूनि अन्नादि प्राणीं प्राणांसि होमिती । हठयोगी असे सर्व यज्ञे पावन यज्ञवित् ॥ ३० ॥ आर्या-कोणी नियताहारे प्राणी प्राणांसि होमिती बापा । हे सर्व यज्ञवेत्ते क्षाळिति यज्ञकरूनियां पापा ॥ ३० ॥ ओंवी - अल्प नेमूनि आहारें । प्राणी प्राण नेमिती खरे । हठयोगी निर्धारें । यज्ञेचि यज्ञफळ ॥ ३० ॥ एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें । प्राणी प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥ ४६ ॥ ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । जिहीं यज्ञद्वारा मनोमळ | क्षाळण केले ॥ ४७ ॥ जया अविद्याजात जाळितां । जें उरलें निजस्वभावता । जेथ अनि आणि होता । उरेचिना ॥ ४८ ॥ जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे । मागुतें जेथूनि वोसरे । क्रियाजात ॥ ४९ ॥ विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे । जें द्वैतदोपसंगें । सिंपेचिना ॥ १५० ॥ यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् । नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ३१ ॥ सम० - यज्ञशेषसुधाभोक्ते परब्रह्मींच पावती । अयज्ञाला न हा लोक कैंचा स्वर्ग कुरूत्तमा ॥ ३१ ॥ आर्या - यज्ञवशिष्ट अमृता सेवुनि पावति सनातन ब्रह्म । यज्ञावांचुनि कैसे लोक तया पावतील जे ब्रह्म ॥ ३१ ॥ ओवी - यज्ञशेष जे भक्षिती । अमृतपानें ब्रह्म पावती । यज्ञशेष न करिती । तयां नाहीं परलोक ॥ ३१ ॥ ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट । तें सेविती ब्रह्मनिष्ठ | ब्रह्माहंमंत्रे ।। ५१ ।। ऐसे शेपामृतें धाले । की अमर्त्यभावा आले । दुसरे कोणी दृढ निश्चयाने व संवयीनें योगसाधन करून अपानवायुरूपी अग्नींत प्राणवायुरूपी द्रव्याची आहुति देतात. दुसरे कोणी अपानाचं प्राणांत हवन करितात, व आणखी कोणी प्राण व अपान या दोहोंनाही कोंडून टाकतात, अशा योग्यांना 'प्राणायामी' म्हणतात. ४५ आणखी कोणी 'वज्रयोग' नांवाच्या योगपद्धतीने सर्व आहार आटोपते घेऊन प्राणाचें प्राणाच्याच ठायीं मोठ्या धैर्यानें हवन करितात. ४६ अशा प्रकारें यज्ञसाधनानें मनाचे मन्द्र झाडून टाकणारे हे सर्व यज्ञकर्ते मोक्षाचीच इच्छा करीत असतात. ४७ ज्यांचे, मायामोह जळून, केवळ सहज आत्मस्वरूप अवशिष्ट राहिले, त्यांच्या ठिकाणीं अग्नि आणि या ही भावनाही मग उरत नाहीं. ४८ मग या स्थितीत यचाचा हेतु पुरा होतो, यज्ञविधान समाप्त होतें, सर्व कर्माची उठाठेव नाहींशी होते, ४९ विचार आणि हेतु यांना प्रवेश करण्यास जागाच राहात नाहीं, आणि द्वैत भावनेचा दोष स्पर्शही करूं शकत नाहीं. ५० अशा प्रकारे यज्ञविधानाच्या अंतीं जें अविट, अनादि, निर्दोष ज्ञान पदरी पडतें तें ' अहं ब्रह्मास्मि' हा मंत्र म्हणून ब्रह्मनिष्ठ सेवन करितात. ५१ या रीतीनं जे या यज्ञशेषाच्या अमृतानें तृप्त