पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी हळुवारलें । आइतें होतें ॥ ३४ ॥ तेणें सांदुकपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा । स्नेहेंसीं नानाविधा । जाळिलिया ॥ ३५ ॥ तेथ सोहंमंत्र दीक्षितीं । इंद्रियकर्माचिया आहूति । तिये ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ॥ ३६ ॥ पाठीं प्राणक्रियेचिये सैवेनिशीं । पूर्णाहुति पडली हुताशीं तेथ अवभृथ समरसीं । सहजें जहालें ॥ ३७ ॥ मग आत्मवोधींचें सुख । जें संयमामीचें हृतशेख । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥ ३८ ॥ एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त जाले गा त्रिभुवनीं । या यज्ञक्रिया तरी आनानी । परि प्राप्य तें एक ॥ ३९ ॥ द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे । स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ २८ ॥ सम० - द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञहि सुव्रत । वेदार्थज्ञानही यज्ञ यत्नशील अनुष्टिती ॥ २८ ॥ आर्या - स्वाध्यायमखा कोणी करिती ज्ञानाध्वरासि संन्यासी । योगद्रव्य तपोमय यज्ञातें दृढव्रताव्य संन्यासी ॥२८॥ ओवी - एक द्रव्य वेंचिती । त्रिविध तप करिती । एक योगातें अनुष्टिती । स्वाध्याय यज्ञ ॥ २८ ॥ । एक द्रव्ययज्ञ म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजविती । एक योगयागुही आहाती । जे सांगितले ॥ १४० ॥ एकीं शब्द शब्द यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥ ४१ ॥ हैं अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडें । परी जितेंद्रियासीच घडे । योग्यताas || ४२ ॥ ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धि आंथिले । म्हणोनि आपणपां तिहीं केलें । आत्महवन ॥ ४३ ॥ अगदी एवढीशी ठिणगी चमकली. ३३ परंतु या ठिणगीला मनाचें यमदमानीं वाळून हलके झालेलें पेटवण सांपडलें. ३४ त्या भडक्यानें ज्वाळा उसळल्या, आणि मग निरनिराळ्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपाबरोबर जळून खाक झाल्या. ३५ त्या वेळी ' सोऽहमस्मि ' हा मंत्र उच्चारीत दीक्षितांनी पेटलेल्या ज्ञानाग्नीत इंद्रियकर्माच्या आहुति दिल्या. ३६ मग प्राणकर्मरूपी स्वानामक दर्भपात्रासह अग्नींत शेवटची आहुति पडली आणि अखेरीस ब्रह्मतादात्म्याच्या एकरूप अवस्थेत या यज्ञसमाप्तीचें स्नान झाले. ३७ यानंतर या संयमयज्ञांतील अवशिष्ट हविर्भाग जो आत्मज्ञानाचा आनंद तो त्याचांनीं पुरोडाश म्हणून ग्रहण केला. ३८ कोणीएक या अशा प्रकारच्या यज्ञविधानांनीं त्रिलोकीं मुक्त झाले. हीं आतांपर्यंत सांगितलेलीं यज्ञविधानें जरी निरनिराळीं दिसलीं, तरी सर्वाचं साध्य एकच आहे, तें हेंच कीं ब्रह्मसमरसत्व प्राप्त करून घेणे. ३९ कोणी द्रव्ययज्ञ, कोणी तपोयज्ञ, आणि कोणी योगयज्ञ करितात. १४० कोणी शब्दांत शब्दाचा होम करितात. त्याला ' वाग्यज्ञ' हें नांव आहे. ज्ञानानें जेथें ब्रह्मरूप ज्ञेयाची प्राप्ति होते, तो ज्ञानयज्ञ होय. ४१ परंतु, अर्जुना, हीं सर्व यज्ञांचीं कोडी सोडविणें फार कष्टाचें आहे, पण ज्यांनी इंद्रियांवर आपली सत्ता प्रस्थापित केली, त्यांना आपल्या अंगच्या बळानें हें साधितां येतें. ४२ ते फार कुशल आणि योगसामर्थ्यानें संपन्न असल्यामुळे त्यांना आपल्या जीवात्म्याचें परमात्म्यामध्यें हवन करितां आलें. ४३ १ हलके, २ भडक्यानें. ३ ममतारूपी तुपाबरोबर. ४ जीवनाच्या कर्माच्या. ५ यज्ञांतील घृताहुति घालण्याच्या दर्भपात्रासह. ६ यज्ञसमाप्तीचें स्नान, ७ यज्ञांतील अवशिष्ट हविर्भाग ८ कोर्डे, कठीण गोष्ट. ९ भरलेले, संपन्न.