पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा ११५ श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति । शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ २६ ॥ सम० श्रोत्रादि इंद्रिये कोणी निग्रहानींत होमिती । त्या इंद्रियानींत कोणी अर्थशब्दादि होमिती ॥ २६ ॥ आर्या - संयमवन्हित कोणी करिती श्रोत्रादिहोमचि सदा हा । शब्दादिक विषयांचा करिती करणाभिनें कुणी दाहा २६ ओवी - श्रोत्रादि ज्ञानेंद्रियें । संयमान होमिती तये । शब्दादिक विषये । इंद्रियानींत होमिती ॥ २६ ॥ एक संयमाग्निहोत्री । ते युक्तित्रयाच्या मंत्रीं । यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्य ॥ २६ ॥ एकां वैराग्य रवि विवेळे । तंव संयति विहार केले | तेथ अपावृत जाहले । इंद्रियानळ ॥ २७ ॥ तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली | तंव विकारांची इंधने पळिपलीं । तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ॥ २८ ॥ मग वाक्यविधीचिया निरंवडी । विपयआहुती उदंडीं । हवन केलें कुंडीं । इंद्रियामीच्या ॥ २९ ॥ सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे । आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ २७ ॥ सम० - कोणी सर्वां इंद्रियांची कर्मे प्राणादिकांचिंही चित्प्रकाशांत वृत्तीच्या निरोधामांत होमिती ॥ २७ ॥ आर्या - प्रायिकमांचा अवघा समुदाय होमितां जळतो । ज्ञानेंकरुनी कोणी पेटविती आत्मसंयमानळ तो ॥ २७ ॥ ओवी - इंद्रियकर्म प्रधान । कर्म सर्वांसि जाण । संयमानींत होमून । निरोधानींत होमिती ॥ २७ ॥ एक ययापरी पार्था । दोपु क्षाळिले सर्वथा । आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेक केला ॥ १३० ॥ तो उपशमें निहटिलां । धैर्यभारें दाटिला । गुरुवाक्यें कॉढिला | बळकटपणें ॥ ३१ ॥ ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें | जे उज्जीवन जहालें । ज्ञानाचें ॥ ३२ ॥ पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥ ३३ ॥ तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातलें । जें यमदमी कोणी आत्मसंयमाचें म्हणजे मनोनिग्रहाचें अग्निहोत्र आचरतात. ते काया, वाचा, आणि मन, यांचं नियमन हेच मंत्र म्हणून इंद्रियरूपी द्रव्याची पवित्र आहुती देतात. २६ दुसऱ्या कोणा पुरुषांना वैराग्य प्रकट होतें. मग मनाचें नियमन हेंच निवासस्थान करून त्यांत ते इंद्रियामि सिद्ध करितात. २७ मग वैराग्याची ज्वाळा चेतली कीं विकाररूपी लांकडें पेट घेतात, आणि आशारूपी धूर अंतःकरणपत्रकरूपी पांची कुंडांना सोडून जाऊन तीं कुंडे स्वच्छ व तेजस्वी होतात. २८ मग 'अहं ब्रह्मास्मि' या महावाक्याचा मंत्र घोषून ते अंतःकरणाच्या कुंडांत इंद्रियाग्नीच्या मुखीं विषयांच्या विपुल आहुति टाकतात. २९ अर्जुना, अशा प्रकारें संयमाग्निहोत्राने कांहीं पुरुष निर्दोष होऊन गेले. दुसऱ्या कांहीं पुरुषांनीं हृदयरूप अरणीला, म्हणजे कामखंडाला, घांसून पेटविण्याकरितां विवेकाचा मंथा केला. १३० या मंथ्याला मनाच्या समाधानाने जखडून, व मोठ्या धैर्यानें दावून, गुरुवाक्याच्या सामर्थ्यानें त्यांनी पुष्कळ घुसळला. ३१ असें सारखं नेटाने घर्पण केल्यावर, लवकरच त्याचें फळ मिळालें, कारण ज्ञानाग्नि प्रकट झाला ! ३२ पण हा ज्ञानाग्नि पूर्ण प्रज्वलित होण्याच्या पूर्वी पहिल्या प्रथम जरासा धूर निघाला हाच ऋद्धिसिद्धींचा मोह. हा धूर लवकरच जाऊन निवळल्यावर, ज्ञानानीची पहिली १ प्रकट होतो. २ मनाचें दमन, ३ स्थान, ४ उघडे, मोकळे. ५ निश्चयानें. ६ हडसला, जखडला, ७ फिरविला, घुसळला. ८ वाळलेला कडवा, काड्या, इत्यादि जळण.