पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अकाळींची अत्रें जैशीं । ऊर्मीवीण आकाशीं । हरपती पेशीं । उदयलीं सांतीं ॥ १७ ॥ तैसीं विधिविधानें विहितें । जरी आचरे तो समस्तें । तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥ १८ ॥ ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ २४ ॥ सम० - कर्ता अनि हविर्द्रव्ये ब्रह्मब्रह्मींच अर्पण । कमी ब्रह्मसमाधिस्थ त्याणें ब्रह्मींच पाव ॥ २४ ॥ आर्या - अर्पण हवि हुत वन्ही सर्वहि हें ब्रह्मरूप जो मानी । ब्रह्मक्रियासमाधी करुनी ब्रह्मासि पावतो ज्ञानी ॥ २४॥ ओवी - कर्ता, हव्य आणि अग्नि । होम, ब्रह्म जाणोनि । कर्म ब्रह्मसमाधि लावुनि । ब्रह्मींच पावे ॥ २४ ॥ हैं हवन मी होता । कां इये यज्ञीं हा भोक्ता । ऐसिया बुद्धीसि नाहीं भिन्नता । म्हणऊनियां ॥ १९ ॥ जे यष्टा यज्ञ यजावें । तें हविमंत्रादि आघवें । तो तसे अविनाशभावें । आत्मबुद्धी ॥ १२० ॥ म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥ २१ ॥ आतां अविवेककुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें । मग उपासन जिहीं आणिलें । योगामीचें ॥ २२ ॥ दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते । ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ २५ ॥ सम० यज्ञ इंद्रादिभावेंचि कर्मयोगी उपासिती । ब्रह्माग्नींतचि ते ज्ञानी यज्ञरीतींच होमिती ॥ २५ ॥ आर्या-कर्म सदैव मखातें करिती वदलों सुयुक्ति होमीं ती । ब्रह्मानीचे ठायीं ज्ञानी यज्ञेकरूनि होमी ती ॥ २५ ॥ ओवी - इंद्रादिभावेंचि यज्ञ । कर्मयोगी उपासिती जाण । ब्रह्मानींत चित्तमन । ज्ञानी यज्ञरीतींच होमिती ॥ २५ ॥ जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं । गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें || २३ || तिहीं योगामिकीं यजिजे । तो देवयज्ञ म्हणजे । जेणें आत्मसुख कामिजे । पांडुकुमरा ॥ २४ ॥ आतां अवधारीं सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नि साग्निक । तयांते यज्ञेचि यज्ञ देख । उपासिजे ॥ २५॥ त्याच्याच आत्मस्वरूपांत लीन होतात. १६ अकाळीं अभ्रं जशीं आकाशांत उठून वृष्टि न करितांच, आपोआप आकाशांतच लीन होतात. १७ तशीं अशा पुरुषानें केलेलीं उचित यज्ञयागादि कर्मे त्याच्याच ऐक्यभावांत एकरूप होऊन जातात. १८ कारण, हें हवन, हा होता, हा या यज्ञाचा भोक्ता, इत्यादि भेद याच्या बुद्धीला असतच नाहींत. १९ या, यज्ञ, याजन, आहुति, मंत्र, इत्यादि सर्वच तो अविनाशी आत्मस्वरूपच समजतो. १२० या कारणानें, 'कर्म' म्हणजेच 'ब्रह्म' हे ज्याला बरोबर कळलें, त्याला, वा अर्जुना, कर्म करणें म्हणजेच निष्कर्म होणें असें होतें. २१ आतां अविवेकरूपी हूड पोरपणाला ओलांडून ज्यांनी विरक्तीशी विवाहसंबंध जोडला, आणि मग योगाचें अग्निहोत्र आरंभले. २२ ज्यांनी रात्रंदिवस हा योगयज्ञ करून मनाबरोबर अज्ञानाची आहुति गुरूपदेशाच्या मंत्राग्नींत टाकली, २३ त्यानीच हा योगयज्ञ करावा. आतां, अर्जुना, जो यज्ञ केला असतां आत्मसुखाचा लाभ व्हावा, त्या इंद्रादिदेवांप्रीत्यर्थ केलेल्या यज्ञाला दैवयज्ञ' म्हणतात. २४ आतां आणखी कांहीं यज्ञप्रकार सांगतों, ऐक. जे ब्रह्माग्नीनें अग्निहोत्र करितात, ते त्या यज्ञानेंच म्हणजे ब्रह्मयज्ञानंच यज्ञविधि करितात. २५ १ त्रुष्टीवांचून २ उटलेली असतांद्दी.