पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा ११३ निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः । शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्विषम् ॥ २१ ॥ यदृच्छालाभसंतुष्टां द्वन्द्वातीतो विमत्सरः । समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निवध्यते ॥ २२ ॥ सम० - शरीरचित्त स्ववश न आशा न परिग्रह । शरीरमात्रं जो कर्म करी पावे न बंध तो ॥ २१ ॥ लाभ अयाचितें तुष्ट न जया द्वंद मत्सर । सिद्धीं असिद्धत सम नव्हे बद्ध करुनिही ॥ २२ ॥ आर्या - निष्काम तनुमनांशी अवरुनि निःसंगतेशि जो वरिता । केवळ तनुसंबंधीं कर्मे करुनी न लिंपतो दुरिता ॥ २१ ॥ तुष्ट यदृच्छालाभ द्वंद्वरहित जो विमत्सरी युक्त । ज्याला सिद्धि असिद्धी सम तो कर्मे करूनिही मुक्त ॥ २२ ॥ ओव्या - शरीरचित्त स्ववश करिशी । आशापरिग्रह टाकिशी । शरीरें कर्म करिशी । असा न पावे बंधातें ॥ २१ ॥ सुखदुःखातें न धरी । लाभालाभ चाड न करी । द्वंद्वातीत विचारी । तो बंध न पावे ॥ २२ ॥ कैसी अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी | अहंभावेंसीं ॥ ८ ॥ म्हणोनि अवसरें जें जें पावे । तेणेंचि तो सुखावे । आपुलें आणि परावें | दोन्ही नाहीं ॥ ९ ॥ तो दिठीं जे पाहे । तें आपणचि होऊनि जाये । आइके तें आहे । तोचि जाहला ॥ ११० ॥ चरणीं हन चाले । मुखें जें जें वोले । ऐसें चेष्टाजात तितुलें । आपणचि जो ॥। ११ ॥ हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । वाधी तयातें ॥ १२ ॥ हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें । तो निर्मत्सरु काई म्हणिजे । बोलवरी ॥ १३ ॥ म्हणोनि सर्वां परी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥ १४ गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः । यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ २३॥ सम - कर्तृत्वापासुनी मुक्त स्वरूपीं चित्त थारलें । यज्ञार्थ आचरे कर्म सर्व तें जातसे लया ॥ २३ ॥ आर्या - जो निःसंग विमुक्त ज्ञानीं ज्याचें करीत मन निलया । यज्ञार्थ कर्म करितो त्याचीं कर्मेहि पावती विलया ॥२३॥ ओवी – कर्तृत्वापासूनि मुक्त | अखंड स्वरूपीं जयाचें चित्त । यज्ञार्थ कर्म आचरत । तेणें तें पावत लयातें ॥ २३ ॥ तो देहसंगें तरी असे। परि चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥ १५ ॥ ऐसाही परी कौतुकें । जरी कर्मे करी यज्ञादिकें । तरी तियें लया जाती निःशेखें । तयाचांचि ठायीं ॥ १६ ॥ तो आत्मानंदाची गोडी नित्य वाढत्याचढत्या आवडीनें सेवीत असतो. तो आशेला सोडतो आणि अहंकारासह तिला ओवाळून फेंकून देतो. ८ यामुळे ज्या काळीं जं प्राप्त होते, त्यांत त्याला संतोष होतो, आणि ' माझें दुसऱ्याचें, ' ही भाषाच त्याच्याजवळ नसते. ९ तो जें पाहातो, ऐकतो, चालतो, बोलतो; एकंदरीत अशा ज्या निरनिराळ्या किया तो करतो, त्या तोच स्वतः होतो. ११०,११. किंबहुना हें अखिल विश्वच त्याला आत्मस्वरूप होते; मग अशाला कोणतं कर्म कशी वाधा करणार ? १२ ज्याच्या योगानं मत्सर उत्पन्न होतो, तें दुजेंपणच ज्या पुरुषाला उरलें नाहीं, तो निर्मत्सर असतो म्हणून सांगणंच नको, तें स्वयंसिद्धच आहे. १३ म्हणून असा पुरुष सर्व परींनीं मुक्तच असतो; तो कर्म करून अकर्मा राहतो, तो दिसण्यांत गुणयुक्त पण वास्तविक निर्गुणच ठरतो, यांत संदेह नाहीं. १४ तो जरी देहधारी असला, तरी केवळ चैतन्यरूपच असतो. परब्रह्माच्या कसोटीला तो चोखनिखोड उतरतो. १५ अशा पुरुषानें जरी सहज लीलेनें यज्ञयागादि कर्मे केली, तरी तीं सर्व १ ओवाळून टाकतो. १५