पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी प्रमाणें । जैसें न चलतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्माचि असतां ॥ ९९ ॥ तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसें जळाधारें न बुडे । भानुविंव ॥ १०० ॥ तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥ १ ॥ एकेचि ठायीं वैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हें असो विश्व जाहला । अंगेंचि तो ॥ २ ॥ यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः । ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ १९ ॥ सम० – टाकूनि काम संकल्प आरंभी सर्व काम जो । ज्ञानाग्निनें कर्म जाळी म्हणती तोचि पंडित ॥ १९ ॥ आर्या - कर्मारंभ जयाचे इच्छासंकल्पवर्ज जे प्राज्ञ । कर्म ज्ञानामीनें जाळिति ते जाण पंडित प्राज्ञ ॥ १९ ॥ ओवी - सर्व कर्मारंभ करी । कामना त्यजूनि अवधारीं । ज्ञानामीनें दाहकारी । म्हणती तोचि पंडित ॥ १९ ॥ जया पुरुषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेद नाहीं । परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥ ३ ॥ आणि हैं कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धी नेईन । येणें संकल्पही जयाचें मन | विटाळेना ॥ ४ ॥ ज्ञानानीचेनि मुखें | जेणें जाळिलीं कर्मों अशेखें । तो परब्रह्मचि मनुष्यवेखें | वोळख तूं ॥ ५ ॥ त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः । कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित्करोति सः ॥ २० ॥ सम० - फलेच्छा टाकुनी सर्व सदा तृप्त निराश्रय । प्रवर्त्तला सर्व कर्मी तरी कांहीं न तो करी ॥ २० ॥ आर्या - कर्मफलात त्यागी नित्य सुतृप्त स्वयंचि अनुभवितो । कर्मी प्रवृत्त असतां न करी कांहीं स्वसौख्य अनुभवि तो २० ओंवी — फलेच्छा त्यजी । तृप्त असोनि निराश्रयो जी । प्रकृतिकर्मी सहजीं । न बाधिजेल ॥ २० ॥ जो शरीरीं उदासु । फळभोगीं निरासु । नित्यता उल्हासु । होऊनि असे ॥ ६ ॥ जो संतोषाच्या गौभारां । आत्मवोधाचिया वोगैरां । पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां ॥ ७ ॥ तसाच हाही कर्म करीत असतां आपलें निष्कर्मत्व अचंचळ राखतो. ९९ तो मनुष्यासारखाच दिसतो, परंतु सूर्याचं प्रतिबिंब जरी पाण्यांत पडलें तरी जसे सूर्यबिंब भिजत नाहीं, तसें या निष्कर्म्याला मनुष्यत्व स्पर्श शकत नाहीं १०० असा निष्कर्मा विश्व पाहतो, सर्व कांहीं करतो, आणि सारे भोग भोगतो, तरीपण तो या क्रियांपासून तटस्थ व अलिप्तच राहातो. १ तो एका जागी असतो, पण विश्वांत संचार करतो, किंबहुना तो स्वतःच विश्वरूप होतो. २ ज्या पुरुषाला कर्माचरणाचा कंटाळा नाहीं, पण कर्मफलाचीही आसक्ति नाहीं, ३ आणि, 'मी हें कर्म करीन, हैं हातीं घेतलेलें कर्म तडीस नेईन,' अशा संकल्पाचा विटाळ ज्याच्या चित्तास होत नाहीं, ४ आणि ज्यानें ज्ञानरूपी अग्नीला सर्व कर्माची आहुति दिलेली आहे, तो मनुष्य म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच आहे, असें तूं समज. ५ ज्याचे देहभाव सुटले, जो कर्मफळाविषयीं निरिच्छ असून, नेहमीं आनंदित असतो. ६ जो संतोपाच्या माजघरांत बसतो आणि तेथें आत्मबोधाचें जेवण कितीही वाढले, तरी ' पुरे' असें म्हणतच नाहीं ! ७ १ वाटतो. २ माजघरांत ३ वाढपाला, जेवणाला. ४ वाढतो.