पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा ૐ जाणावें । लागे एथ ॥ ८९ ॥ मग वर्णाश्रमास उचित । जें विशेष कर्म विहित । तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसीं ॥ ९० ॥ पाठीं जें निपिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें । येतुलेनि कांहीं न गुंफे | आपैसेंचि ॥ ९१ ॥ एन्हवीं जग हैं कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परी तें असो आइकें चिन्ह | प्राप्तांचें गा ।। ९२ ॥ कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ १८ ॥ सम-- न बाधे तें नव्हे कर्म कृष्णार्पण अकर्मता । अकर्मी पाप तें कर्म देखे सर्वज्ञ सर्वकृत् ॥ १८ ॥ आर्या--कर्म अकर्मी कर्मी अकर्म पाहे तया कळे वर्म । तो बुद्धिवंत युक्तहि केलें त्याणें समस्तही कर्म ॥ १८ ॥ भवी — कर्म तेंचि अकर्म पाहे । अकर्म तें कर्म होऊनि राहे । मनुष्यांत बुद्धिवंत आहे । जो सर्वज्ञ सर्वकर्त्ता ॥ १८ ॥ जो सकळकर्मी वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगें निराशता । फळाचिया ॥ ९३ ॥ आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी । बोधला असे ॥ ९४ ॥ तरी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा | जो तोचि तो ये चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ।। ९५ ।। जैसा जो जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपण जळामाजिं देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ।। ९६ ।। अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें । तेचि सांचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥ ९७ ॥ तैसें सर्व कर्मी असणें । तें फुडें मानूनि वायाणें । मग आपणपां जो जाणे । नैष्कर्म्य ऐसा ॥ ९८ ॥ आणि उदोअस्ताचेनि केलेच पाहिजे. ८९ नंतर आपल्या वर्णाश्रमाला योग्य असें जें आपलें विशेष शास्त्रोक्त कर्म, तें ' विहित कर्म ' ही त्याच्या उपयोगासह नीट समजून घ्यावें. ९० आणि मग ज्या कर्माचा निषेध केला आहे तें कर्मही नीट जाणावें. असें केलें म्हणजे आपण गोंधळून जाणार नाहीं. ९१ वास्तविक, जग हें कर्मानें व्यापिलेलेच आहे; तेव्हां कर्माचा व्याप एवढा प्रचंड आहे, पण मी प्रसंगापुरतेंच त्याच्या लक्षणाचें विवेचन करीत आहे. ९२ जो कर्म आचरीत असतांही, मी निष्कर्मा आहे, हे तत्त्व ध्यानांत वागवतो, कर्मसंग घडला असताही फळाची आशा बाळगीत नाहीं, ९३ आणि कर्म करण्याला ज्याला कर्तव्यबुद्धीवांचून दुसरे कारण नसतें, त्याच्या अंगी निष्कर्मपणा चांगला मुरला आहे, असें जाणावें. ९४ तेव्हां जो आपली सर्व कर्मै यथास्थित रीतीनें करीत असेल, तो वरील लक्षणांनी युक्त असल्यास ज्ञानी आहे, असे ओळखावें. ९५ जसा पाण्याजवळ उभा असलेला मनुष्य आपल्याला प्रतिबिंबरूपानें पाण्यांत पाहतो, पण मी तो पाण्यांतला नव्हें, मी निराळाच आहे, असें तो जाणतो; ९६ अथवा, जसा नावं वसून नदीत विहार करणारा, नदीकांठची झाडे वेगाने एकामागून एक जातांना पाहतो, पण नीट विचार केला कीं तो ' हीं झाडें अचळ आहेत' असें म्हणतो; ९७ तसाच, आपलें कर्माचरण हे आत्मस्वरूपी खचित खोटें आहे, असें जाणून, जो आपले मूल स्वरूप ओळखतो, तोच खरा निष्कर्मा. ९८ आणि उदय व अस्त यांचा रोख सांभाळून जसा सूर्य अचळपणें भ्रमण करतो, १ वृक्ष, झाडे, २ चांगलें, नीट, ३ स्पष्ट. ४ खोटें.