पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० सार्थ श्रीज्ञानेश्वरी एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः । कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वः पूर्वतरं कृतम् ॥ १५ ॥ सम० - ऐसें जाणोनि मोक्षार्थी केलीं कमैं पुरातनीं । करीं कर्मचि तूं तस्मात् केलें जें पूर्व पूर्वज ॥ १५ ॥ आर्या - ऐसें जाणुनि कर्मे केलीं पूर्विल मुमुधुंच्या निकरें। प्राचीनांनीं केलीं कर्म म्हणवूनि तूं करीं निकरें ॥ १५ ॥ ओवी - ऐसें जाणोनि करीं कर्म । मोक्ष इच्छूनि न करीं धर्म । याकारण वर्णाश्रम केला पाहिजे ॥ १५ ॥ I मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशिया जाणोनि मातें । कर्मों केलीं समस्तें । धनुर्धरा ॥ ८२ ॥ परि तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतीचि पेरिलीं । तैसीं कर्मैचि परि तयां जाहलीं । मोक्षहेतु ॥ ८३ ॥ एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडे सज्ञाना | योगु नोहे ॥ ८४ ॥ किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् १६ सम० -- ज्ञानीही मोहिले कीं हैं कैसे कर्म अकर्मही । सांगेन तें जं जाणोनी सुटसी अशुभांतुनी ॥ १६ ॥ आर्या — कर्माकर्मविचारी मोहित जे थोर थोर कविराय । तें कर्म तुला कथितों पार्था में जाणतां अशुभ जाय ॥ १६ ॥ ऑवी - अकर्म कर्म तें कोण । कर्मों ओळखावीं जाण । आईक तें सांगेन । अशुभांतून सूटसी ॥ १६ ॥ कर्म म्हणि तें कवण | अथवा अकर्म काय लक्षण | ऐसें विचारितां विचक्षण | गुंफोनि ठेले ॥ ८५ ॥ जैसें कां कुंडे नाणें । खऱ्याचेनि सारिखेपणें । डोळ्याचेंहि देखणें | संशयीं घाली ॥ ८६ ॥ तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिर्वसिजत आहाती कर्मै । जे दुजी सृष्टि मनोधर्मे । करूं सकती । ॥ ८७॥ वांचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणोनि आतां तेंचि परियेसीं । सांगेन तुज ॥ ८८ ॥ 1 कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः । अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ १७ ॥ सम० - तत्व वेदोक्तकर्माचे विकर्माचें निषिद्ध जें । अकर्माचेंहि जाणावें कर्माच्या गहना गती ॥ १७ ॥ आर्या -- कर्माकर्मत्रिकर्मे जाणावीं सद्विचार साधूनी । कर्माची गहन गती ऐसें कथिलें सदैव साधूंनीं ॥ १७ ॥ ओवी - कर्माचे ज्ञान असावें । विकर्म तें ओळखावें । अकर्मा चित्त न द्यावें । कर्मगति गहन म्हणोनियां ॥ १७ ॥ तरी कर्म म्हणिजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे । तें सम्यैक आधीं अर्जुना, मागें जे जे मुमुक्षु जन होऊन गेले, त्यांनीं हें माझें मूलस्वरूप ओळखूनच कर्माचरण केलें. ८२ पण ज्याप्रमाणे भाजलेलें बीं रुजत नाहीं, त्याप्रमाणेच त्यांचीं तीं निष्काम कर्मे त्यांच्या मोक्षाला कारण झाली. ८३ अर्जुना, या विषयासंबंध आणखी एक गोष्ट ध्यानांत घेण्यासारखी आहे, ती ही, कीं, कर्माकर्माचा विचार शाहण्यानेही केवळ आपल्या आवडीच्या लहरीप्रमाणें करावयाचा नसतो. ८४ कर्म म्हणजे काय, आणि अकर्माचें लक्षण कोणतें, याचा विचार करतां करतां शहाणेही गुरफटून गेलेले आहेत. ८५ जसें खोटें नाणें खऱ्यासारखें हुबेहूब दिसून डोळ्यांना भ्रम पाडतें, ८६ तशींच, ज्यांनीं मनांत आणलं असतां, ते प्रतिसृष्टीही निर्माण करूं शकतील, अशा महासामर्थ्य - वंताचीही कर्मे निष्कामत्वाच्या खोट्या कल्पनेने झपाटल्यामुळे सकामच ठरलीं आहेत ! ८७ मग येथे मूर्खाची काय कथा ? अरे, या प्रश्नासंबंधं मोठमोठे दूरदृष्टि लोकही फसून गेले आहेत, म्हणून तोच विषय तुला आतां स्पष्ट सांगतों, एक. ८८ ज्याच्यासह हे विश्व साहजिक संभवतें तें 'कर्म' म्हणावें तें सहज कर्म अगोदर नीटपणें १ गुरफटून, गांगरून, २ खोटें. ३ व्यापिली जात. ४ दिव्य दृष्टीचे पुरुष. ५ नीट, चांगलें, यथार्थ,