पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा १०९ कर्मफळ निश्चित । वोळख तूं ॥ ७२ ॥ वांचूनि देतें घेते आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥ ७३ ॥ क्षेत्रीं क्षेत्रीं जें पेरिजे । तेंवांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥ ७४ ॥ ना तरी कडेयोतळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरीटी । पडसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥ ७५ ॥ तैसा समस्ता या भजना । मी साक्षिभूतु पैं अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥ ७६ ॥ चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्धयकर्तारमव्ययम् ॥ १३ ॥ सम० -- चारी वर्णहि म्यां केले गुणकर्म विवंचुनी । त्यांचा कर्ता तरी कर्ता नव्हें मी जाण अव्यय ॥ १३ ॥ आर्या--गुणकर्मविभागें म्यां केले उत्पन्न वर्ण हे चार । त्यांचा कर्ताही मी जाण अकर्ता करूनि सुविचार ॥ १३ ॥ ओंवी – म्यां सृजिले चारी वर्ण । गुण कर्म विभागून । त्यांचा कर्ता मी जाण । परी अव्यय असें ॥ १३॥ आतां याचिपरी जाण । हे चाही वर्ण । सृजिले म्यां गुण । कर्मविभागें ॥ ७७ ॥ जे प्रकृतीचेनि आधारें। गुणाचेनि व्यभिचारें । कर्मे तदनुसारें । विवंचिलीं ॥ ७८ ॥ एथ एकचि हे धनुष्यपाणि । परी जाहले गा चहूं वर्णी । ऐसी गुणकर्मकर्डसणी | केली सहजें ॥ ७९ ॥ म्हणोनि आइकें पार्था । हे वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हें सर्वथा । याचिलागीं ॥ ८० ॥ न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा । इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते १४ सम० – कर्मे न लिंपती मातें कीं न कर्मफळीं स्पृहा । मातें जाणे असें तोही बद्ध कमीं नव्हे कधीं ॥ १४ ॥ आर्या-कर्मा लिप्त नन्हें मी कर्मफळीं कामना न बा धांवे । ऐसें जो मज जाणे त्याला कमी कदा न बाधावें ॥१४॥ ओंवी — कर्मी जाण ते पाहीं । कीं मज कर्मइच्छा नाहीं । ऐसें जो जाणे कांहीं । कमी तों न बांधिजे ॥ १४ ॥ हैं मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें । ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ॥ ८१ ॥ कर्माशिवाय निःसंशय दुसरा कोणी नाहीं; या मनुष्यलोकीं कर्मच काय तें फलदायक आहे. ७३ शेतांत जे पेरावें तेंच जसें उगवतें, किंवा जें पहावें तेंच आरशांत दिसतें, ७४ किंवा डोंगरकपारीच्या तळाशी जें बोलावे त्याचा तसाच प्रतिध्वनि उठतो, ७५ त्याप्रमाणेच, अर्जुना, जरी या सर्व देवदेवता- भजनाला मीच मूलाधारभूत आहे, तरी उपासकाच्या इच्छेप्रमाणेंच त्या भजनाला फळ येतें. ७६ आतां, हे जे चार वर्ण मनुष्यलोकांत आढळतात, तेही मी अशाच तटस्थपणें गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार उत्पन्न केले आहेत. ७७ कारण, मायेच्या आश्रयानें आणि गुणांच्या मिश्रणानें कर्माचरणाचा विचार झालेला आहे. ७८ वीरा अर्जुना, हे सर्व मनुष्य मूळचे एकच वर्णाचे, परंतु गुण आणि कर्म यांच्या धोरणानें चातुर्वर्णिक झाले आहेत. ७९ म्हणून, अर्जुना, मी म्हणतों, कीं, या चातुर्वर्ण्यसंस्थेचा मी मुळींच कर्ता नाहीं. ८० हे सर्व माझ्यापासून झाले, पण मीं हें केलें नाहीं, हे तत्त्व ज्याला बरोबर उमजलें, तो संसारांतून सुटून मुक्तस्थितीला पोंचला, असे जाणावें. ८१ १ डोंगरखान्यांत २ प्रतिध्वनि ३ व्यवस्था, धोरण,