पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी पेदर नाहीं ॥ ६३ ॥ सांगें पितळेची गंधिकांळिक | जैं फिटली होय निःशेख | तैं सुवर्ण काई आणिक | जोडूं जाइजे ॥ ६४ ॥ तैसे यमनियम कर्डेसले | जे तपोज्ञानें चोखाळले । मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ।। ६५॥ ये यथा मां प्रपद्यते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ११ ॥ सम० - जे जसे भजती मातें मी तसा फळतों तयां । पार्था मनुष्य सकळ माझ्या मार्गीच वर्तती ॥ ११ ॥ आर्या-जे जैसे मज भजती तैसें भजतों तयांसि मी पाहा । माझ्या वर्मा सर्वहि अनुवर्ते मनुजसंघ बापा हा ॥११॥ ओवी - जैसे जे मजला भजती । त्यांसि मी भजें तेच रीतीं । माझे मार्गी वर्तती । सर्व लोक ॥ ११ ॥ ए-हवीं तरी पाहीं । जे जैसे माझ्या ठायीं । भजती तयां मीही । तैसाचि भजें ॥ ६६ ॥ देखें मनुष्यजात सकळ । हैं स्वभावतां भजनशीळ | जाहलें असे केवळ | माझ्याच ठायीं ॥ ६७ ॥ परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासि आले । तेणेंचि त्या कल्पिलें । अनेकत्व ॥ ६८ ॥ म्हणऊनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती । देवी देवो म्हणती । अचर्चातें ।। ६९ ।। जें सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिती ॥ ७० ॥ काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः । क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२ ॥ सम० -- कर्मसिद्धिच इच्छूनी पूजिती अन्य देवता । कर्ममूळाच त्यां सिद्धी नृलोक होति सत्वर ॥ १२ ॥ आर्या-कमांची हे सिद्धी इच्छुनियां देवतायजन करिती । मानवलोकीं होती कर्माची सिद्धि जेहि लोकरिती ॥१२॥ ओवी - जे कर्मसिद्धी इच्छूनी । चित्त ठेविती अन्यदेवभजनीं । मनुष्यलोकीं क्षणीं । सिद्धि होती सत्वर ॥ १२ ॥ मग नानाहेतुप्रकारें । यथोचित उपचारें । मानिली देवतांतरें । उपासिती ॥ ७१ ॥ तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त । परी तें ते आणि मी एकच, आमच्यांत कोणताही आडपडदा नाहीं. ६३ अरे, असें पहा, पितळेचा कटकटपणा समूळ नाहींसा झाला, तर मग सोने मिळविण्याच्या हव्यासांत विशेष अर्थ तो काय उरला ! ६४ त्याप्रमाणेंच यमनियमांनीं तावून जे तपोरूपी ज्ञानाने चोख झाले, ते माझ्या स्वरूपाला पावले, याविषयी शंका कशाला हवी ? ६५ साधारणपणे जे माझी जशी सेवा करितात, त्यांच्याशीं मीही तसाच वागतों. ६६ तूं लक्षांत ठेव, कीं, ह्या मनुष्यकोटीला स्वभावतः माझ्याच ठिकाणीं भक्ति असते. ६७ परंतु अज्ञानानें मनुष्यांना झपाटल्यामुळे त्यांची बुद्धि फिरली आहे, आणि या कारणानें त्यांना अनेकत्वाचा भास झाला आहे. ६८ यास्तव त्यांना अभिन्न वस्तूंतही भिन्न प्रकार दिसतात, ते त्या नामहीन आत्मतत्त्वाला नांवे देतात, आणि त्यांना 'देवदेवी' म्हणून त्यांची आराधना करितात. ६९ जें आत्मस्वरूप सर्व ठिकाणी व सर्व काळी सारखंच असतें, त्याच्यांत उच्चनीच विभागाची कल्पना यांच्या मनांतील घोटाळ्यांनी उत्पन्न होते. ७० मग नानाप्रकारच्या कामना मनांत धरून योग्य विधिविधानांनीं ते आपल्या आवडत्या अनेक देवदेवतांची आराधना करतात. ७१ मग त्यांचं जे जे मागणं असेल, तें तें त्यांना लाभतें. पण तें सर्व केलेल्या कर्माचं फळ होय, हें तूं निश्चयेंकरून जाण. ७२ वस्तुतः येरवीं येथे देणारा आणि घेणारा १ आडपडदा, भेद. २ कळंक ३ मि. ४ तावून काढलेले ५ मानवी प्राण्यांचा वर्ग. ६ नामहीनाला ७ गोंधळ, घोटाळे, ८ मानिती, ९ नानाप्रकारच्या देवदेवता,