पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा १०७ दिवाळी | निरंतर ॥ ५४ ॥ स्वसुखें विश्व कोंदे | धर्मचि जगीं नांदे | भक्तां निघती दोंदें । सात्त्विकाचीं ॥ ५५ ॥ तें पापांचा अळु फिटे | पुण्याची 'पहांट फुटे । जैं मूर्ति माझी प्रगटे | पांडुकुमरा ।। ५६ ।। ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगींयुगीं । परी हेंचि वोळखे जो जगीं । तो विवेकिया ॥ ५७ ॥ जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ९ ॥ सम०-अलौकिकें जन्मकर्मे माझी जाणे असें खरें । देहा टाकुनि तो मातें पावे जम्मा म ये पुन्हां ॥ ९ ॥ आर्या- एवं पार्था माझें जाणे जो जन्मकर्म निश्चित रे । देहांतीं जन्म पुन्हा न पवे मजशीं मिळोनि तोचि तरे ॥ ९ ॥ ओवी - माझें जन्मकर्म दिव्य जाण । तया नाहीं जन्ममरण । ते खूण ज्ञानी धरून । ते मज पावती ॥ ९ ॥ माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥ ५८ ॥ तो चालिला संगें न चले । देहींचा देहा नाकळे । मग पंचवीं तंव मिळे | माझ्याचि रूपीं ॥ ५९ ॥ वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ १० ॥ सम० – कामक्रोध-भयातीत ध्याननिष्ठ मदाश्रित । बहुज्ञानतपें शुद्ध मरस्वरूपासि पावले ॥ १० ॥ आर्या - रागभयक्रोधरहित मन्मय ते जन्मले नर सुपूत । ज्ञानतर्फे पावत बहु पावति मजला मदाश्रयें पूत ॥ १० ॥ ओंवी - कामक्रोधभय त्यजिती । माझ्या आश्रयें असती । मज प्रसादें ज्ञान पावती । स्वरूपीं मिळोनी ॥ १० ॥ ए-हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा के वेळीं न वर्चेती । क्रोधाचिया ॥ ६० ॥ सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले । कीं आत्मबोधें तोषले । वीतराग जे ॥ ६१ ॥ जे तपोतेजाचिया राशी । कीं एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥ ६२ ॥ ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले । जे मज तयां उरले । विवेकाचा दिवा सोज्वळ करतों, आणि असें झालें म्हणजे योगी लोकांना तो काळ दिवाळसणाचा वाटतो, ५४ आत्मसुखानें सर्व विश्व खचून भरतें, जगांत धर्मावांचून दुसरें कांहींच आढळत नाहींसें होतें, आणि भक्तमंडळी सात्विक भक्तीनें ओतप्रोत भरून फुगून जाते ! ५५ अर्जुना, ज्या वेळी मी साकार होऊन अवतार धारण करतों, तेव्हां पापांचे पर्वत नष्ट होतात व पुण्याची प्रभात उघडते. ५६ तेव्हां अशा प्रकारच्या कार्यासाठीं मी प्रत्येक युगांत अवतरत असतों, आणि हे रहस्य ज्यानें ओळखलें, तोच या जगांत खरा विवेकी समजावा. ५७ मी जन्मरहित असूनही जन्म घेतों, मी अक्रिय असूनही कर्म आचरतों, याचें खरें रहस्य जो, विकारांना बळी न पडतां, जाणतो, तो परममुक्त जाणावा. ५८ असा पुरुष संसारांत असला तरी कर्मसंगानें भ्रष्ट होत नाहीं किंवा देहधारी असूनही देहभावानें बांधला जात नाहीं, आणि, यथाकाल देह पंचत्व पावला, म्हणजे तो पुरुष माझ्या आत्मस्वरूपांत मिसळून जातो. ५९ सामान्यतः जे गतागताचा शोक करीत नाहींत, जे निष्काम होतात व क्रोधाच्या वाटेसही जात नाहींत, ६० जे माझ्या स्वरूपाने भरलेले असतात, माझ्या सेवेकरतांचं जिवंत राहातात, आणि निर्विकार होऊन आत्मज्ञानाचा आनंद भोगतात, ६१ जे महातपस्वी व जपी आहेत, किंवा ज्यांनीं सर्व आत्मज्ञानाचें आपल्या ठिकाणीं एकीकरण केलें आहे, ६२ ते सहजच मत्स्वरूप होतात १ पर्वत, २ जातात. ३ भरले. ४ जगले. ५ एकस्थान,