पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी परी कर्माधीनु ऐसा आवडें । तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एन्हवीं नाहीं ॥ ४६ ॥ जें एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें । एन्हवीं काय स्वविचारें । दुजें आहे ॥ ४७ ॥ तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं । तैं साकारपणें नेटीं । कार्यालागीं ॥ ४८ ॥ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७ ॥ सम० - जे जे वेळेस धर्माची होतसे हानि भारता । अभिवृद्धि अधर्माची आपणा निर्मितों तयीं ॥ ७ ॥ आर्या-ज्या ज्या समयीं धर्मग्लानी होते अधर्म उद्भवतो। त्या त्या समय वेगें भारतवर्या जगांत संभवत ॥ ७ ॥ ओंवी -- जे जे काळीं धर्मासी । स्थानभ्रष्टता होय पर्येसीं । त्या काळीं अवतरोनि त्यासीं । दुष्टांतें मारितसे ॥ ७ ॥ जें धर्मजात आघवें । युगयुगीं मियांचि रक्षावें । ऐसा ओघु हा स्वभावें । आ असे ॥ ४९ ॥ म्हणोनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं । जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥ ५० ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ८ ॥ सम॰—साधूंच्या रक्षणालागीं माराया पातकी जना । स्थापावयासि धर्मातें होतों युगयुगाप्रती ॥ ८ ॥ आर्या – साधुत्राण कराया खळदुष्टांचे करावया हनन । धर्म स्थापायासी घेतों पार्था युगायुगीं जनन ॥ ८ ॥ ओंवी -- पवित्र साधु तारावे । दुष्टांसि नाश करावे । धर्मस्थापन व्हावें । अवतरें युगायुगीं ॥ ८ ॥ ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें । मग अज्ञानाचें आंधारें | गिळूनि घालीं ॥ ५१ ॥ अधर्माची अवधि तोडीं । दोषांची लिहिली फेडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥५२॥ दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानु गिवेशीं । धर्मासी नीतीशीं | शेंस भरीं ॥५३॥ मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे होतो. ४५ माझ्या स्वतंत्रपणाला काडीमात्र उणेंपणा येत नाहीं; माझ्या अवतारकालीं मी जो कर्माधीन दिसतों, तोही भ्रांतीमुळेंच; ही भ्रांति दूर झाली, कीं, मी आपल्या स्वस्वरूपांतच निराकार व निर्गुण आहे. ४६ एक वस्तूच्या ज्या दोन वस्तू दिसतात, त्याला कारण आरसा; पण, आरशांत जरी प्रतिबिंब दिसले, तरी विचार केला असतां ही प्रतिबिंबरूप दुसरी वस्तू खरी ठरते काय ? ४७ त्याप्रमाणेच, अर्जुना, मी स्वतः अमूर्तच आहें, परंतु मी जेव्हां मायेचा आश्रय करतों, तेव्हां कांहीं कार्यासाठी साकारपणाने नटतो. ४८ कारण, प्रत्येक युगांत धर्ममार्गाचें रक्षण मीं करावें, हा क्रम मूळापासूनच पडला आहे. ४९ यासाठीं ज्या ज्या वेळीं अधर्माचा पगडा धर्मावर बसल्याचे आढळतें, त्या त्या वेळीं मी आपलें जन्मरहितत्व बाजूला सारतों, आणि अमूर्तत्वही मनांत आणीत नाहीं, ५० तर त्या वेळीं धर्मनिष्ठांचा कैवार घेऊन मी साकाररूपानें अवतरतों, आणि मग अज्ञानाच्या अंधारास गिळून टाकतों, ५१ अधर्माची सत्ता तोडतों, दोषाचें नांव पुसतों, आणि साधुपुरुषांच्या हातून सुखाची गुढी उभारतों. ५२ असुरकुळांचा नाश करतों, साधूंचा मान उजळतों, आणि धर्म व नीति यांना एकत्र करून त्यांच्यावर पुण्याक्षता उधळतों. ५३ मी अविचाराची काजळी झाडून १ मी नटतो. २ सर्व धर्मविचार ३ लिपी मागें अ० ३, ओं० २५४ पहा. ४ पुन्हां मिळवून देतों. ५ नीतीजवळ धर्माला आणून त्याच्यावर मंत्राक्षता टाकतों; धर्माची नीतीशीं गांठ घालतों.