पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा १०५ पाहीं । उपदेशिला ॥ ३७ ॥ तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव श्रीकृष्ण सांपेचा । म्हणोनि गा इये मातूचा | विसंवादु ॥ ३८ ॥ तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांहींचि नेणिजे । हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिळां ॥ ३९ ॥ परी हेचि मातु आघवी । मी परियेसें ऐशी सांगावी | जे वांचि तेया रवी । उपदेश केला ॥ ४० ॥ श्रीभगवानुवाच — बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ ५ ॥ सम० - क्रमिलीं बहुतें जन्में तुझीं माझींहि अर्जुना । मी ईश जाणें तीं सर्व तूं जीवत्वें न जाणसी ॥ ५ ॥ आर्या- तुझ माझीं गेलीं पार्था जन्में बहूत संसारीं । तें तूं नेणसि बापा जाणे सर्वंश मीच कंसारी ॥ ५ ॥ ओवी - देव म्हणतो तुज मज । बहु जन्म झाले सहज । तें सर्व आठवे मज । जीवस्वें तुला नाठवे ॥ ५ ॥ तंव श्रीकृष्ण म्हणे पांडुसुता । तो विवस्वतु जें होता । तें आम्हीं नसों ऐसी चित्ता । प्रतीति तुज ॥ ४१ ॥ तरी तूं गा हैं नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी । बहुतें गेलीं परी न स्मरसी । आपुलीं तूं ॥ ४२ ॥ मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥ ४३ ॥ अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् । प्रकृतं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥६॥ सम० अज मी अविनाशी मी भूतांचा ईशही परी । होतों शुद्धात्ममायेनें स्वप्रकृति अधिछुनी ॥ ६ ॥ आर्या - अज अव्यय भूतेश्वर निर्गुण जो मी उपाधिला त्यजितों । प्रकृतिसि अधिष्ठुनीयां मायेनें आपणास मी सृजितों ॥ ६ ॥ ओवी - अज अव्यय अवतार । सर्व भूतांचा मी ईश्वर । प्रकृति अधिष्ठान निरंतर मायाधीन जन्म ॥ ६ ॥ म्हणोनि हें आघवें । मागील मज आठवे । मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ॥ ४४ ॥ माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । तें प्रतिबिंबे मायावरों । स्वस्वरूपीं ॥ ४५ ॥ माझी स्वतंत्रता तरी न मोडे । करणार ? ३७ तो विवस्वत् फार काळापूर्वी झाला म्हणून ऐकण्यांत आहे, आणि तुम्ही श्रीकृष्ण तर आजकालचे, म्हणून ही तुम्हीं सांगितलेली गोष्ट असंबद्ध दिसते. ३८ पण, उलटपक्षी, देवा, तुमचें चरित्र आम्हांला अगम्य आहे, मग ही गोष्ट लटकी आहे, असें एकदम म्हणावें तरी कसें ? ३९ यासाठीं, तुम्हीं त्या विवस्वत् सूर्याला उपदेश केला, ही गोष्ट मला समजून पटेल अशा रीतीनें सांगावी. " ४० मग श्रीकृष्ण म्हणाले, “पार्था, तो विवस्वत् सूर्य जेव्हां होता, तेव्हां आम्ही नव्हतों, असें तुझ्या मनाला निश्चित वाटतें, ४१ त्यावरून तुला तें कांहीं ठाऊक नाहीं, हेंच ठरते. अरे, तुमचे आमचे पुष्कळ जन्म होऊन गेले, पण तुला त्यांचं स्मरण नाहीं, ४२ मला मात्र, हे अर्जुना, ज्या ज्या वेळीं मी जो जो अवतार धारण केला, तो तो चांगला स्मरतो. ४३ म्हणून मला या मागच्या सर्व गोष्टींची आठवण आहे. मी जरी जन्महीन आहे, तरी मायेमुळे जन्म घेतो. ४४ पण जन्म घेतला, तरी माझें मूळचें निराकार अमूर्तत्व भंगत नाहीं; परंतु मी अवतरतो आणि मग निजधामाला जातों, या प्रकारचा एक भास मायागुणानें माझ्या आत्मस्वरूपांत १ सांप्रतचा. १४