पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥ २८ ॥ तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥ २९ ॥ तूं अनुसंगाचा ठाव | आतां तुज काय वंचूं जावों । जन्ही संग्रामारूढ आहों । जाहलों आम्हीं ॥ ३० ॥ तरी नावेक हैं साहावें । गांजावज्यही न धरावें । परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥ ३१ ॥ अर्जुन उवाच - अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः । कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४ ॥ सम० - आलीकडे तुझें जन्म सूर्यजन्म पलीकडे । तूं बोलिलासि पूर्वी हें जाणावें म्यां कशा रिती ॥ ४ ॥ आर्या-- जन्म पुरातन रविचा जन्म तुझा यादवा दिसे अपर । आर्धी कथिलें त्वां हैं कैसें जाणेन सांग याउपर ॥ ४ ॥ आँवी--पार्थ म्हणे कृष्णनाथा । तुम्हां जन्म अलीकडे असतां । अनादि सूर्याची कथा । म्यां केंवी जाणावें ॥ ४ ॥ तंव अर्जुन म्हणे श्रीहरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । येथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधि ॥ ३२ ॥ तूं संसारश्रांतांची साउली । अनाथ जीवांची माउली । आमुतें कीर प्रसवली | तुझीच कृपा ॥ ३३ ॥ देवा पांगुळ एकादें विजें । तरी जन्मौनि जोजरु साहिजे । हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥ ३४ ॥ आतां पुमेन जें मी कांहीं । तेथ नि चित्त देई । तेवींचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥ ३५ ॥ तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता । ते नौवेक मज चित्ता । मानेचि ना ॥ ३६ ॥ जे तो विवस्तु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलांही ठाउवें नाहीं । तरी तुवांचि केवीं राखिलें नाहीं, कारण तूं माझा फारच आवडता आहेस. २८ हे वीरा पार्था, तूं म्हणजे केवळ प्रेमाचा अवतार, भक्तीचा प्राण, आणि मैत्रीचें जीवसर्वस्व आहेस. २९ तूं श्रद्धेचें आगर आहेस, मग तुझ्याशी थापाथापी करणं योग्य कसें होईल ? म्हणून, जरी आम्ही युद्धभूमीवर थाटलों आहों, ३० तरी क्षणमात्र हैं बाजूस सारून, आणि गडबड आवरून, तुझें शंकानिरसन करून मोह झाडून टाकणे अगत्याचे आहे. " ३१ तेव्हां अर्जुन म्हणाला, “ अहो श्रीकृष्णा, आईनं आपल्या मुलावर प्रेम केलें, तर त्यांत आश्चर्य कसले ? अहो कृपासागरा, हें पहा, ३२ तुम्ही संसारांत दमल्याशिणल्याची शीतळ सावली व निराश्रितांची मावली आहां. तुमच्या कृपेने आम्ही जन्माला आलों. ३३ देवा, एकाद्या बाईनें पांगळ्या मुलाला जन्म द्यावा, आणि त्याच्या जन्मापासूनच त्याचा जंजाळ सहन करावा, तसेंच आमच्याविषयीं तुम्हांला करावे लागत आहे. पण या तुमच्या गोष्टी तुमच्याच समक्ष काय सांगाव्या ? ३४ आतां देवा, माझ्या प्रश्नाकडे चांगलं लक्ष्य द्या, आणि माझ्या बोलाचा कृपा करून राग मात्र मानू नका. ३५ पण, तुम्ही जी मागची गोष्ट आतां सांगितलीत, कीं, मी विवस्वत सूर्याल कर्मयोगाचं रहस्य उपदेशिलें, ती मात्र माझ्या मनाल। तिळभरही पटत नाहीं; ३६ कारण, तो विवस्वत कोण होता, हे आमच्या वाडवडिलांनाही ठाऊक नाहीं. मग तुम्हीं त्याला उपदेश कसा १ आवडता आहेस. २ गलबला ३ प्रसवावें, जन्मास आणावें. ४ जंजाळ, वस्त. ५ क्षणमात्र.