पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा १०३ एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥ २ ॥ सम० -- परंपरागत असा योग राजर्षि जाणती । तो योग बहुता काळे अस्त झाला परंतप ॥ २ ॥ आर्या - एवं परंपरागत राजर्षी योग जाणती श्रेष्ठ । महता काळेंकरुनी होता झाला परंतपा नष्ट ॥ २ ॥ ओवी - - ऋषि परंपरा बोलिला । हा योग जरी ओळखिला । तूं भक्त म्हणूनि सांगितला । अति अपूर्व ॥ २ ॥ मग आणिकही या योगातें । राजर्पि जाहले जाणते । परि तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोण्ही ॥ १९ ॥ जे प्राणिया कामी भरु । देहाचिवरी आदरु | म्हणोनि पडिला विसरु | आत्मवोधाचा || २० || अविट नाथिली आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि । जीव तैसा उपाधि | आवडे लोकां ॥ २१ ॥ एरवीं तरी खेवणेयांच्या गांवीं । पांटाउ काय करावीं । सांगें जात्यंधा रवि । काय आथी ॥ २२ ॥ कां वहिरयांच्या आस्थानीं । कवण गीतातें मानी । कीं कोल्हेया चंदनीं । आवडी उपजे || २३ || पैं चंद्रोदया- आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काउळे केवीं चंद्रातें । वोळखती ॥ २४ ॥ तैसी वैराग्याची शिंवे न देखती । जे विवेकाची भाषा नेणती । मूर्ख केवी पावती । मज ईश्वरा ।। २५ ।। कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणोनि योग हा लोपला । लोकीं इये ||२६|| स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३ ॥ सम०--तोचि हा आजि म्यां तूतें वर्णिला योग पूर्विला । तूं सखा भक्त यालागीं रहस्याद्भुत बोलिलों ॥ ३ ॥ आर्या -- भक्तसखा तूं म्हणुनी पुरातन तुलाच योग हा कथिला । ऐकें भारतवर्या परम निजरहस्ययुक्तिनें प्रथिला ॥३॥ ओंवी -- आणि म्यां तुज बुद्धि । योग सांगितला अनादि । तूं सखा भक्त आधीं । म्हणोनि रहस्य सांगितलें ॥ ३ ॥ तोचि हा आज आतां । तुजप्रति कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्त्वतां । भ्रांति न करीं ॥ २७ ॥ हें जीवींचें निज गुज | परी केवीं राखों तुज । मग अनेक राजर्षीींना याचें ज्ञान झालें. परंतु सांप्रत या योगाला जाणणारा कोणीही दिसत नाही. १९ प्राणी वासनांच्या भरीस भरले व देहबुद्धीच्या नादी लागले, म्हणून त्यांना या आत्मज्ञानाचा विसर पडला. २० आत्मनिप्रेची भावना ठाम नसली म्हणजे विषयसुखच सुखाची पराकाप्रा असें वाटतें, आणि लोकांना सर्व संसाराच्या घडामोडी प्राणासारख्या प्रिय होतात. २१ नाहीतर, दिगंबर क्षणिकांच्या म्हणजे जैनसाधूंच्या गांवांत कपड्यालत्त्याचे काय काम ? जन्मांधाला सूर्याची किंमत काय ? सांग बरें. २२ अथवा, वहिऱ्यांच्या घरांत गायनाला कसला मान ? किंवा कोल्हांना कधीं चंदनाविषयीं प्रेमांदर उपजतो का ? २३ किंवा चंद्रोदयापूर्वीच ज्यांच्या डोळ्यांना दिसत नाहींसं होतं, ते कावळे चंद्राला कसे ओळखणार बरें ? २४ त्याप्रमाणेंच जे वैराग्याच्या गांवाला कधीच गेले नाहींत, ज्यांना 'विवेक' हा शब्दही ठाऊक नाहीं, ते मूर्ख पुरुष माझ्या परमात्मस्वरूपाला कसचे पोहोचणार ? २५ हा मोह कसा पसरला, कोण जाणे; पण या मोहामुळें पुष्कळ काळ वांया गेला, आणि या लोकांत कर्मयोगाचा लोप झाला. २६ तोच कर्मयोग, वा अर्जुना, आम्हीं तुला आज सांगितला आहे, आतां सर्व संशय टाकून दे. २७ हें कर्मयोगाचे तत्त्व म्हणजे माझ्या जीवींचें एक गहन रहस्य आहे, परंतु तेही मी तुझ्यापासून गुप्त १ खवणे -क्षपणिक, जैनांचे नागदे राहणारे साधु. २ संगें, वस्त्रे ३ गांवाची सीमा.