पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशी बोलत ॥ ८ ॥ देवी लक्ष्मी येवढी जेवळिक | परी तेही न देखे या प्रेमाचें सुख । आजि कृष्णस्नेहाचे विकं । ययातेंचि आथी ॥ ९ ॥ सनकादिकांचिया आशा | वाढीनल्या होतिया कीरें बहुवसा । परी त्याही येणें मानें यशा | येतीचिना ॥ १० ॥ या जगदीश्वराचं प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसें पायें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ||११|| हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज ऐकांकी यांची स्थिति । आवंड असे ॥ १२ ॥ एहवीं हा योगियां नाडळे | वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे | पावती ना || १३|| तो हा निजस्वरूप | अनादि निष्कंप | परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ॥ १४ ॥ हा त्रैलोक्यपटाची घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५ ॥ श्रीभगवानुवाच — इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् । विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽत्रवीत् ॥ १ ॥ सम० या पुरातन योगातें मी सूर्यालागि बोलिलों । बोलिला सूर्य मनुला पुत्र इक्ष्वाकुला मनु ॥ १ ॥ आर्या-पार्था सांगितला म्यां अव्यय हा जाण योग सूर्यास सूर्ये मनुला कथिला मनुर्ने इक्ष्वाकु राजवर्यास ॥ १ ॥ ओंवी -- हा योग की पूर्वी । म्यां उपदेशिला रवी । सूर्य मनूसी दावी । मनूनें इक्ष्वाकुसी सांगितला ॥ १ ॥ मग देव म्हणे पांडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ॥ १६ ॥ मग तेणें विवस्वतें रवि । हे योगस्थिति आघवी । निरूपिली वरवी । मनूप्रती ॥ १७ ॥ मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकूसि उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥ १८ ॥ श्रीकृष्णांनीं कधीं सांगितलें नाहीं, तें आज त्यानीं अर्जुनाला कथन केलें. ८ अहो, देवी लक्ष्मी इतकी लगतची, पण तिलाही जें प्रेमसुख लाभत नाहीं, तें श्रीकृष्णप्रेमाचं खरें तत्त्व यालाच मिळालें आहे. ९ ईश्वरी प्रेम पूर्णपणे आम्हांला प्राप्त होईल, म्हणून सनकादिक योग्यांना फारच मोठ्या आशा होत्या, पण त्यांनाही अर्जुनाच्या तोडीचें यश साधलें नाहीं. १० या जगन्नायकाचें अर्जुनाविषयीचे प्रेम केवळ तुलनारहित आहे ! अहो, या अर्जुनाची केवढी ही पुण्याई ! ११ कीं प्रत्यक्ष निराकार परमेश्वर याच्याकरितां साकार होऊन अवतरला आहे ! मला हे दोघे अगदीं एकरूपच वाटतात ! १२ सामान्यतः जो योग्यांना सांपडत नाहीं, वेदार्थाला समजत नाहीं, आणि ध्यानधारणेची दृष्टि ज्याला पाहू शकत नाहीं, १३ तो श्रीकृष्ण आत्मस्वरूप, अनादि, व निर्विकार असूनही, पहा या अर्जुनाविषयीं किती प्रेमळ व सदय झाला आहे. १४ हा कृष्ण त्रैलोक्यरूप वस्त्राची जणूं काय घडीच व आकारादि विकारांच्या पलीकडचा असूनही, पहा या अर्जुनाच्या आवडीने कसा आपल्या आहारीं आणला आहे ! १५ मग देव अर्जुनाला म्हणाले, “आम्हीं हाच योग सूर्याला कथन केला होता, पण त्या गोष्टीला फारच काळ झाला. १६ मग त्या सूर्यानें हा योग मनूला सांगितला. १७ मनूनें ही योगस्थिति संपादून, तिचा उपदेश इक्ष्वाकूला दिला. याप्रमाणे या योगाचा पूर्व इतिहास आहे. १८ १ लगतपणाची. २ सारांश, तत्त्व, संपूर्ण सामर्थ्य. ३ खरोखर. ४ सारखी, एकरूप. ५ वाटते.