पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय चौथा आजि श्रवणेंद्रिया पिकेलें । जे येणें गीतानिधान देखिलें । आतां स्वमचि हैं तुर्कलें । साचासैरिसें ॥ १ ॥ आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥ २ ॥ जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये || ३ || कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची । हो कां जपतपें श्रोतयांचीं | फळा आली ॥ ४ ॥ आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥ ५॥ हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगें । जे कृष्णार्जुन दोघे | बोलत होते ॥ ६ ॥ ते वेळीं संजयो रायातें म्हणे । अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें । जे अतिप्रीति श्रीनारायणें । वोलतु असे ॥ ७ ॥ जें न सांगेचि पितया वसुदेवासी । जे न सांगेचि माते देवकीसी । जें न सांगेचि बंधु आतां श्रवणेंद्रियाला सुकाळ आला आहे, कारण त्याला आज गीतारूपी द्रव्याचा ठेवा उघडा होत आहे. जी गोष्ट स्वप्न स्वप्न म्हणून केवळ काल्पनिक वाटत होती, ती आज खरोखरीची ठरत आहे ! १ आधीं विषयच मुळीं अध्यात्मविचाराचा, त्यांत वक्ता प्रत्यक्ष जगदीश्वर श्रीकृष्ण, तशांत श्रोताही भक्त अर्जुन ! २ तेव्हां, जसा कोकिळेसारखा स्वर, मधुर सुवास, आणि गोड रुचि, या तिघांचा मोहक संयोग घडून यावा, तसाच हा गीतेंतील कथाप्रसंग मोठ्या मौजेचा झाला आहे ! ३ अहो, केवढें हें सुदैव, कीं, ही अमृताची गंगा आपल्यास लाभली आहे. खरोखरच श्रोत्यांच्या जपतपाचें फळ आज त्यांस लाभलें ! ४ आतां, सर्व इंद्रियांनी या श्रवणेंद्रियांत शिरून वसती करावी आणि हा 'गीता' नांवाच्या कृष्णार्जुनसंवादाचा रस सेवन करावा. ५ पण हा लगटपणाचा पाल्हाळ सोडून, आतां ती कथाच सांगण्यास आरंभ करितों. कृष्ण आणि अर्जुन दोघे बोलत होते. ६ त्या वेळी संजय धृतराष्ट्रराजाला म्हणाला, ' अर्जुन खराच निर्मल गुणांच्या दैवी संपत्तीनें मंडित झालेला आहे, कारण श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याशीं अत्यंत प्रेमानें बोलत असतात. ७ प्रत्यक्ष पिता वसुदेव, माता देवकी, व भाऊ बळराम, यांनाही जें गहन तत्त्व १ सुगी आली, सुकाळ झाला, २ मोलाला आलें. ३ खन्यासारखें,