पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शि. म. १०० सार्थ श्रीज्ञानेश्वरी इन्द्रियाणि पराण्हुरिन्द्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः॥ ४१ ॥ सम० - स्थूला पुढे इंद्रिये हीं मन त्याहीपलीकडे । मनापलीकडे बुद्धी आत्मा तो तीपलीकडे ॥ ४२ ॥ आर्या-इंद्रियगण हा पर तो त्याहुनि मन त्याहुनी मती परती। तीहुनि आत्मा पर तो नाहीं उत्कृष्टता तयापरती ॥४२॥ ओवी - इंद्रियांत श्रेष्ठ मन । मनाहूनि पर बुद्धि जाण । बुद्धीपलीकडे आत्मा जाण । ऐसी गती ॥ ४२ ॥ मग मनाची धांव पारुपेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेनि धारा मोडेल | या पापियांचा ।। ६९ ।। एवं बुद्धेःपरं बुद्धा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ४३ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिपत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः । सम०—तिणें असा तीपरता जाणोनी थांबवूनि तो । मारीं शत्रु महाबाहो कामरूपी अजिंक्य जो ॥ ४३ ॥ आर्या- एवं बुद्धिपरातें जाणुनि मतिनें मना महाबाहो । नियमुनि निजरिपु कामा मारी जयवंत तूं महा बा हो ॥४३॥ ओवी – बुद्धीनें परमात्मा जाण । आणि आत्मा स्थिर करून । वैराग्य-अग्नीनें जाळून । काम अजिंक्य जिंतीं ॥ ४३ ॥ हे अंतरींहून जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसें रश्मीवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥ २७० ॥ तैसे रागद्वेप जरी निमाले । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥ ७१ ॥ ते गुरुशिष्याची गोठी । पदेपिंडाची गांठी । तेथ स्थिर राहोनि नुठीं । कवणे काळीं ॥ ७२ ॥ ऐसें सकळ सिद्धांचा रावो। देवी लक्ष्मीयेचा नौहो । राया ऐकें देवदेवो । बोलता जाहला ॥ ७३ ॥ आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगेल तेथ पांडुसुतु । प्रश्नु करील ॥ ७४ ॥ तया वोलाचा हन पांडु । कीं रसवृत्तीचा निवाडु । येणें श्रोतयां होईल सुरवाड | श्रवणसुखाचा ॥ ७५ ॥ ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा | चांग उठावा धरूनि उन्मेपोचा । मग संवाद श्रीहरिपार्थाचा । भोगावा बापा ।। २७६ ।। असें केलें, म्हणजे मनाची धांव आपोआप खुंटेल, बुद्धीची सुटका होईल, आणि या कामक्रोधादि पाप्यांचा आधारच नाहींसा होईल. ६९ हे अंतःकरणांतून हुसकावून लाविले, म्हणजे सर्वस्वीं नष्ट झाले, असेंच समजावें. सूर्यकिरणां- वांचून जसें मृगजळ नसतं, २७० तसे कामक्रोधादि नष्ट झाले, म्हणजे ब्रह्मज्ञानाचें साम्राज्य लाभलें, असें जाणावें. मग जीव आपल्या आत्मानंदांत सुखरूप राहतो. ७१ जें गुरुशिष्यांचं गुप्त रहस्य, जीवशिवाची एकभेट म्हणतात, त्या स्थितींत जीव शांत होऊन कधींही चळत नाहीं. " ७२ संजय धृतराष्ट्राला म्हणाला, कीं, 'राजा, सर्व सिद्धांचा राणा व लक्ष्मीचा पति, देवदेवेश्वर जे श्रीकृष्ण त्यांनी असें भाषण केलें. ७३ आतां, ते अनंत श्रीकृष्ण आणखी एक महत्वाची गोष्ट बोलतील आणि अर्जुनही प्रश्न विचारील, ७४ त्या बोलण्याची योग्यता आणि त्याचा वेंचक रसाळपणा, यांनीं श्रोतेजनांना सुखाचा सुकाळ होईल ! ७५ म्हणून मी श्रीनिवृत्तिनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगतों, कीं, बाप हो, ज्ञानलालसेला चांगली स्फूर्ति देऊन, या कृष्णार्जुनसंवादाची गोडी आपण चाखावी. २७६ १ परमात्मा व जीवात्मा, २ नाथ, पति. ३ थोरवी. ४ स्फूर्तीचा,