पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ९९ जैसी चंदनाची मुळी | गिंवसोनि घेपे व्याळीं । ना तरी उत्वाची खोळी । गर्भस्थासी ॥ २६० ॥ कां प्रभावीण भानु । धूमेवीण हुताशनु । जैमा दर्पणु महीनु । कहींच नसे ॥ ६१ ॥ तैसें इहींवीण एकलें । आम्ही ज्ञान नाहीं देखिलें | जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥ ६२ ॥ आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा । कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३९ ॥ सम० – वेष्टिलें ज्ञान हैं कामें ज्ञात्याचे नित्य शत्रुनें। जो नानाकामना रूपी जो का निर्भर अग्निवत् ॥ ३९ ॥ आर्या- ज्ञात्याचा नित्य रिपू हा काम ज्ञान आवरी जाण । न म्हणे पुरे कधींही पूर्ण नव्हे हा कदा तुझी आण ॥ ३९॥ ओवी - तैसें ज्ञान झाकोळलें तेणें । म्हणोनि ज्ञानियाचा नित्य वैरी मी म्हणें । कामरूप देह दहनें | दूर करूनि त्यजिती ॥ ३९॥ तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असें प्ररुद्ध । म्हणोनि तें अगाध । होऊनि ठेलें ॥ ६३ ॥ आधीं यांतें जिणावें । मग तें ज्ञान पावावें । तंव पराभव न संभवे । रागदेषां ॥ ६४ ॥ यांतें साधावयालागीं । जें वळ वाणिजे आंगीं । तें इंधन जैसें आगी । सावावो होय ॥ ६५ ॥ इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४० ॥ सम० - इंद्रियें मन बुद्धी ह्रीं कामाधिष्ठान बोलिजे । यांहीं करूनि हा मोही प्राण्यातें ज्ञान वेटुनी ॥ ४० ॥ आर्या - इंद्रिय-मन-बुद्धीशीं अधिटुनीयां वसे सदा देहीं । ईंहींकरूनि यातें आवरुनि ज्ञान मोहवी देही ॥ ४० ॥ ओवी - इंद्रिये आणि मनबुद्धी । यांसि काम अधिष्ठान आधीं । यांतें भुलवोनि त्रिशुद्धी । ज्ञान लोपतसे ॥ ४० ॥ तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे । म्हणोनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥ ६६ ॥ ऐसियांहीं सांकडां बोला । एक उपायो आहे भला । तो करितां जरी आंगेवला । तरी सांगेन तुज ॥६७॥ तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि होनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥ ४१ ॥ सम० – तस्मात् तूं इंद्रियें आधीं जिंकोनि भरतर्षभा । मारीं या पापिया कामा ज्ञानविज्ञाननाशका ॥ ४१ ॥ आर्या - यास्तव इंद्रियदमनें विज्ञानज्ञाननाशका आधीं । पापी रिपु कामाला मारुनियां मारिजे महा आधी ॥ ४१ ॥ ओवी - याकारणें इंद्रियदमना । तूं नियमीं गा अर्जुना । जाळोनि पापकामना । ज्ञानविज्ञाना हित असे ॥ ४१ ॥ यांचा पहिला कुरुंठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये । आधीं निर्दळून घालीं तियें । सर्वथैव ॥ ६८ ॥ जसा चंदनाच्या मुळीला साप वेटाळून राहतो, किंवा गर्भाशयाची खोळ गर्भाला वेढते, २६० अथवा जसा प्रभवांचून सूर्य, धुरावांचून अग्नि, किंवा मटावांचून आरसा, कधींच आढळत नाहीं, ६१ तसें या कामकोधांचा ज्यांत मुळींच गंध नाहीं, असें ज्ञान अजून आमच्या दृष्टीस कधींही पडलें नाहीं. जसें सालपटाखालीं धान्याचें सकस बीज झांकलेले असतें, ६२ तसे ज्ञान स्वतः शुद्धच असतें, पण यांच्या दडपणानें गूढ होऊन राहते. ६३ बरें, आधीं यांना जिंकावें आणि मग ज्ञानसंपादन करावें, असें म्हटलें, तर कामक्रोधादि राक्षसांचा पराभव होण्याचा संभव नसतो. ६४ यांना मारण्यासाठी अंगीं सामर्थ्य आणा असें म्हटलें, तर जसें जळणाचे लांकूड आगीला मदतच करते, ६५ तसेच जे जे उपाय योजावे, ते ते यांना साहाय्यकच होतात. म्हणून, हठयोग्यांनाही हे कामक्रोध हैराण करितात. ६६ परंतु या महासंकटालाही एक उपाय आहे; तो जर तुला मानवत असेल, तर सांगतों. ६७ या कामकोधांचं मूळस्थान इंद्रियें आहेत, आणि या इंद्रियांपासून कर्माची प्रवृत्ति उत्पन्न होते; म्हणून पहिल्या प्रथम या इंद्रियांनाच सर्वस्वी ठेचून टाकिली पाहिजेत. ६८ १ वीर्य देणारे, जोर आणणारे २ मानवला, आवडला. ३ घरटें, वसुतिस्थान,