पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जिये ॥ ४८ ॥ हें असो मोहें मानिजे । यांतें अहंकारें घे दीजे । जेणें जग आपुलेनि भोजें । नाचवीत असे ॥ ४९ ॥ जेणें सत्याचा भोकैसा काढिला । मग अकृत्य तृणक्कुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥ २५० ॥ साध्वी शांति नागविली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवीं विटाळविलीं । साधुवृंदें ॥ ५१ ॥ इहीं विवेकाची त्रीय फेडिली । वैराग्याची साल काढली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥ ५२ ॥ इहीं संतोपवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिलें । उपइनियां ॥ ५३ ॥ इहीं बोधाची चोपी लूसिली । सुखाची लिपी पुसिली । जिव्हारी आगी सूँदली । तापत्रयाची ॥ ५४ ॥ हे आंगा तंव घडले । जीवींचि आधी जडले । परी नातुडती गिंवसिले । ब्रह्मादिकां ॥ ५५ ॥ हे चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाच्या एका हारीं । म्हणोनि प्रवर्तले महामारी | सांवरती ना ॥ ५६ ॥ हे जळेंवीण वुडविती । आगीवीण जाळिती । न बोलतां कवळिती । प्राणियांतें ॥ ५७ ॥ हे शस्त्रंवीण साधिती । दोरेंवीण वांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनी ॥ ५८ ॥ हे चिखलेंवीण रोंविती । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगे न होती । आंतुवटपणें ॥ ५९ ॥ 1 धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च । यथोवेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८ ॥ सम० - वेष्टिजे तो धुरें अनी आरसा नाशिजे मळें । बांधिजे गर्भही नाळें कामें हैं वेष्टिलें तसें ॥ ३८ ॥ आर्या - जैसा आदर्श मळें जरायुनें गर्भ वन्हि घूमानें । वेष्ठित तैसे पार्था आवरिलें हें समग्र कामानें ॥ ३८ ॥ ओवी - अनि झांकला धूम्रबळें । दर्पण जैसा मळे । गर्भ वेष्टिला जाळें । तैसा आत्मा अज्ञानेंकरूनी ॥ ३८ ॥ हिच्याच बटीकपणाच्या जोरावर तृष्णेचा निर्वाह होतो. ४८ हें असो, पण मोहाजवळ या कामक्रोधांना फार मान आहे, आणि अहंकारही यांच्याशी देण्याघेण्याचा व्यवहार करतो, म्हणून तो आपल्या मनास वाटेल तसें जगास नाचवीत असतो. ४९ जो सत्याचा कोथळा काढून त्यांत गवताचा चंदा भरतो, त्या दंभाचे देव्हारेही हेच जगांत माजवितात. २५० यांनीच शांतीला लुबाडून मायारूपी मांगिणीला सजविली आहे, व तिचा विटाळ साधुमंडळीला केला आहे. ५१ या कामक्रोधांनी विवेकाचें बूड उडविलें आहे, वैराग्याच्या अंगाची कातडी सोलून काढली आहे, आणि जित्या उपशमाची मान मुरगळली आहे ! ५२ यांनी संतोषवनाची तोड केली, धैर्याचे कोट मोडले, आणि आनंदाचे रोपटें उपटून फेकून दिलें. ५३ यांनीं उपदेशाची घडी विस्कटून टाकली, सुखाचीं अक्षरं पुसून काढली, आणि जगाच्या जिव्हारांत तापत्रयाची आग घातली. ५४ हे अंगाला जडल्याबरोबर जीवालाच भिडतात, आणि ब्रह्मदेवादिकांनाही आटोपत नाहींत ५५ हे चैतन्यतत्त्वा- जवळच ज्ञानाच्या पंक्तीला खेटून बसतात, म्हणून हे एकदा चवताळले कीं आहारीं येतच नाहींत. ५६ हे पाण्यावांचून वुडवितात, आगीवांचून जाळितात, आणि न बोलतांच प्राण्याला कवटाळतात ! ५७ हे शस्त्रावांचून मारतात, दोरावांचून जखडतात आणि ज्ञानवान् पुरुषाचा वध पैजेनें करतात. ५८ खिलावांचून जीवांना रुपवितात, जाळ्यावांचून पकडतात, आणि आपल्या चिवट बळकटपणानें कोणालाही हार जात नाहींत. ५९ १ आवडीप्रमाणे, मनास वाढेल तसें. २ कोथळा, आंतडीं. ३ गवताचे भूस. ४ मांगीण. ५ आश्रयस्थान, बैठक. ६ चोपून घातलेली घडी उस्कटली, ७ घातली, लावली. ८ पंक्तीत, रांगेत.