पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ९५ श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुप्रितात् । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥ सम०—बरा स्वधर्म भलता परधर्मा बन्याहुनी । स्वधर्मी मृत्युही श्रेय परधर्म करी भय ।। ३५ ॥ आर्या- उत्तम परधर्माहुनि विगुणहि निजधर्म पुण्य दे थोर । निजधर्मी मरण बरें परधर्मै नरक होय तो घोर ||३५|| ओवी - - आपला धर्म असोनी । परधर्म बरवा मनीं मानी। आपला धर्म टाकुनी । परधर्मी भय असे ॥ ३५ ॥ अगा स्वधर्म हा आपुला । जरी कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥ १९ ॥ येरु आचारु जो परीवा । तो देखतां कीर बरवा | परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ २२० ॥ सांगें शुद्रघरीं आघवीं । पक्वान्नें आहात वरवीं । तीं दिजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥ २१ ॥ हें अनुचित कैसेनि कीजे । अग्राह्य केवीं इच्छिजे | अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारी पां ।। २२ ।। तरी लोकांची धवळारें । देखोनियां मनोहरें । असतीं आपुलीं तणीरें | मोडावीं केवीं ||२३|| हें असो वनिता आपली । कुरूप जरी जाहली । तन्ही भोगितां तेचि भली । जियापरी ॥ २४ ॥ तेवीं आवडे तैसा सांकडु | आचरतां जरी दुवाडु | ती स्वधर्मुचि सुरवाड | परत्रींचा ॥ २५ ॥ हांगा साकर आणि दूध | हैं गौल्य की प्रसिद्ध | परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ॥ २६ ॥ ऐसे- निही जरी सेविजेल । तरी ते आळुकीचि उरेल । जे तें परिणामी पथ्य नव्हेल | धनुर्धरा ॥ २७ ॥ म्हणोनि आणिकांसी जें विहित । आणि आपणयां अनुचित । तें नाचरावें जरी हित । विचारिजे ॥ २८ ॥ या अरे, आपला स्वधर्म जरी कठीण वाटला, तरी तो आचरण्यांतच कल्याण आहे. १९ दुसऱ्याचा आचार दिसायला कितीही चांगला असला, तरी आपण आपलाच आचार ठाम राखावा. २२० सांग पाहू, शूद्राच्या घरीं सर्व प्रकारचीं पक्वान्नें उत्तम झाली आहेत, पण कितीही दुर्बळ ब्राह्मण झाला, तरी त्यानें तीं सेवावीं काय ? २१ असें भलतेच कृत्य कां म्हणून करावें ? जें स्वीकारण्यास योग्य नाहीं, त्याची इच्छा कशी करावी ? आणि यदाकदाचित् अशी इच्छा झालीच, तरी त्याचा अंगीकार करावा काय ? अर्जुना, याचा नीट विचार कर. २२ अरे, दुसऱ्याचे सुंदर चुनेगच्ची वाडे पाहून, आपलीं तणांनीं शाकारलेली खोपटे कशीं मोडून टाकावीं ? २३ पण ही प्रश्नावली पुरे झाली. अरे, आपली स्त्री जरी कुरूप असली, तरी तिचीच संगति जशी आपल्यास कल्याणाची होते, २४ तसाच स्वधर्म कितीही संकटाचा असला, आणि त्याचे आचरण कितीही कठीण असले, तरी तो आपल्यास परलोकीं सुख देणारा आहे. २५ अरे, साखर आणि दूध यांची गोडी प्रसिद्धच आहे, परंतु जंतविकाराला तीं वाईट आहेत. मग ज्याला जन्तांचा विकार झाला आहे, अशा रोग्यानों तीं घ्यावीं कशीं ? २६ असं असूनही, जर तो रोगी दूधसाखर सेवन करील, तर त्याची मुखाची इच्छा पुरी होणार नाहीं, कारण परिणामी तें कुपथ्यच ठरेल. २७ म्हणून, जर आपले कल्याण व्हावे अशी इच्छा असेल, तर दुसऱ्याला जें उचित पण आपल्याला जें अनुचित, तें कर्म कधींही आचरू नये. २८ आपला १ दुस-याचा. २ चुनेगच्ची घरें. ३ गवताच्या झोंपड्या, कुइटारू घरें, ४ हह, आग्रह.