पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीज्ञानेश्वरी स्वधर्मातें अनुष्ठितां । वे होईल जीविता। तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥ २९ ॥ ऐसें समस्तसुरशिरोमणि बोलिले जेथ श्रीशार्ङ्गपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥ २३० ॥ हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसिलें । तरी आतां पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ॥ ३१ ॥ अर्जुन उवाच - अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः । अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६ ॥ सम॰—आतां कोणें प्रेरिला हा सांग जो पातकें करी । बळेंचि योजिजे जैसा वार्ष्णेया इच्छिल्याविणें ॥ ३६ ॥ आर्य-पार्थ म्हणे कोण नरें योजियला करित पाप वद बापा । इच्छा नसतांचि बरें प्रेरियला कीं करी जसा पापा ॥ ३६ ॥ ओवी - हा कोणी प्रेरिला प्राणी । पाप आचरतो कोठुनी । वार्ष्णेया इच्छित्यावांचोनी । बलात्कारें कोण करितसे ॥ ३६ ॥ तरी देवा हैं ऐसें कैसें । जे ज्ञानियांही स्थिति भ्रंशे ॥ मार्ग सांडुनी अंनारिसे । चालत देखों ॥। ३२ ॥ सर्वज्ञुही जे होती । हेयोपादेयही जाणती । तेही परधर्मे व्यभिचरती | कवणें गुणें ॥ ३३ ॥ वीजा आणि भुमा । अंधु निवाडु नेणे जैसा । नांवेक देखणाही तैसा । वरळे कां पां ॥ ३४ ॥ जे असता संगु सांडिती । तेचि संसर्ग करितां न धाती । वनवासीही सेविती । जनपदातें ॥ ३५॥ आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती । परी बळात्कारें मुँइजती । तयाचिमाजी ॥ ३६ ॥ जयाची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं । चुकवितां ते गिंवसी । तयातेंचि ॥ ३७ ॥ ऐसा बलात्कारु एक दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावें हृषीकेशें । पार्थ म्हणे ॥ ३८ ॥ स्वधर्म आचरीत असतां, प्राणांचा वेंच झाला, तर तोही इटच, कारण तो उभय लोकीं श्रेच ठरणार." २९ असें देवदेवेश्वर श्रीकृष्ण बोलले; त्यावर अर्जुनानें विनविलें कीं, “ देवा, २३० तुम्हीं जें सांगितले, तें मी सर्व चांगलें ऐकिलें; तरीपण कांहीं मनांत आले आहे, तें विचारितों. ३१ देवा, हें असें कसें घडतें, कीं ज्ञातेही आत्मवृत्तीच्या स्थितीपासून भ्रष्ट होतात, आणि मार्ग सोडून भलतीकडेच भटकत असतांना दिसतात ! ३२ जे सर्वज्ञ झाले, ग्राह्य काय आणि अग्राह्य काय हैं ज्यांना उत्तम कळतें, तेही कोणत्या कारणानें परधर्म स्वीकारून स्वधर्माचें उल्लंघन करितात ! ३३ अंघाला जसं धान्य व भूस हीं निरनिराळीं निवडतां येत नाहींत, तसाच ग्राह्याग्राह्य निवडतांना जाणत्यांचाही कधीं कधीं गांधळ उडून चुका कां घडतात ? ३४ जे आपल्या स्वाभाविक कर्माचा पसारा सोडतात, तेच नसते संसार गळ्यांत घालून घेतांना कधींच पुरे म्हणत नाहींत ! ज्यांनी खरोखर वनांत राहावें, तेही मनुष्यवस्तीत उदेखून येतात. ३५ आपण स्वतः आड होऊन त्यांनीं पापाला पूर्णपणे टाळलं असतं, तरी पण मग तेच बुद्धया आपण होऊन पापाचारांत शिरतात. ३६ ज्या वस्तूचा मनानं कंटाळा केला आहे, तिचाच जीवाला ध्यास लागून राहतो, आणि जर तिला आपण टाळूं लागली, तर तीच उलट आपल्या गळी पडते. ३७ असा ज्ञान्यांवरही बलात्कार झालेला आढळतो, तर हा बलात्कार करण्याचें सामर्थ्य कोणाचें आहे, तें श्रीकृष्णा, मला कृपा करुन सांगा. " असें अर्जुन म्हणाला. ३८. १ इह व परत्र अशा दोन्ही ठिकाणी २ निराळे, भलत्याच वाटेने ३ त्याज्य व प्राह्म ४ स्वधर्म सोडून बहकतात. ५ क्षणमात्र. ६ ग्रामप्रदेशाला, गांवसरीला. ७ लोटले जातात. ८ भय, त्रास.