पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी के विसावा | शीणु आपुला ॥ ८ ॥ म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण । यालागीं एथ अंतःकरण । देयावें ना ॥ ९ ॥ इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषी व्यवस्थितौ । तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनी ॥ ३४॥ सम०--गोड त्याविषयीं प्रीति वाइटी द्वेष इंद्रियां । रागद्वेषचि हे शत्रू वश होऊं नये तयां ॥ ३४ ॥ आर्या-ज्या त्याहि इंद्रियार्थी राग अणि द्वेष हे रिपू थोर । त्यांला वश नच व्हावे हे दोघे मोक्षमागिंचे चोर ॥ ३४ ॥ ओंवी -- विषयकल्पना बहुत । रागद्वेषीं वर्तत । जे तेथे होती आसक्त । विषयां वश होऊं नये ॥ ३४ ॥ एन्हवीं इंद्रियांचिया ओर्ता । सारिखा विपयो पोषितां । संतोषु कीर चित्ता | आपजेल || २१० ॥ परी तो संबंचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु । जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥ ११ ॥ वापा विपाची मधुरता | झणें आवडी उपजे चित्ता । परी तो परिणामु विचारितां । प्राणु हरी || १२ || देखें इंद्रियीं काम असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळीं मीनु आमिपें । भुलविजे गा ॥ १३ ॥ परी तयामाजी गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥ १४ ॥ तैसें अभिलापें येणें कीजेल । विषयांची आशा धरिजेल । तरी वरपडा होइजेल | क्रोधानळा || १५ || जैसा कवळोनियां पारधी । धातेचिये संधी । आणी मृगातें बुद्धी । सांधावया ॥ १६ ॥ एथ तैसीचि परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे । पार्थो दोन्ही कामक्रोध है । घातक जाणें ॥ १७ ॥ म्हणऊनि हा आश्रोचि न करावा । मनेंही आठवो न धरावा । एक निर्जवृत्तीचा वोलांवा । नामों नेदीं ॥ १८॥ गेल्यावर, आपल्या सर्व श्रमाचें फळ आपल्यास कोठें मिळणार ! ८ म्हणून, केवळ शरीरपोषण करणें, हें तर उघड उघड आत्मघातकीपणाचें आहे, यास्तव, अर्जुना, केवळ पिंडपोषणाकडे अंतःकरण लावू नये. ९ सामान्यतः पाहिले, तर इंद्रियांच्या आवडीप्रमाणें त्यांस विषय देत गेलें, म्हणजे मनाला सुख होतें. २१० परंतु संभावित चोराची सोबत जशी नगराचा सुरक्षित मार्ग सोडीपर्यंतच अल्पकाळ सुखाची वाटते, ११ किंवा एकाद्या प्रसंगी कदाचित् विषाच्या मधुरतेची भूल मनाला पडली आणि परिणामाचा विचार केला नाहीं, तर ती भूल जशी प्राण हरण करिते, १२ त्याप्रमाणें इंद्रियांमध्यें जी विषयवासना असते, ती भलत्याच सुखाच्या भरीं त्यांना पाडते. ज्याप्रमाणें आमिषाच्या साह्यानें गव्ळ माशाला भुलवितो, १३ परंतु त्या आमिषांत प्राण घेणारा गळ आहे, हें त्या माशाला ठाऊक नसतें, कारण तो गळ आमिषानें झांकलेला असतो, १४ त्याप्रमाणेंच या विषयवासनेनें होतें; विषयाची आशा धरली, कीं, प्राणी क्रोधाने झपाटलाच. १५ ज्याप्रमाणें पारधी चहूं वाजूंनीं हुसकावीत सावजाला जेथें त्याचा घात होईल अशा ठिकाणीं बुद्धचा आणतो, त्याचप्रमाणें बुद्धीला पकडून नष्ट करण्याची ही विषयवासनांची रीत आहे; म्हणून, पार्था, कामक्रोध हे उभयतां महाघातक आहेत, यांचा संग धरूं नकोस. १६, १७. यास्तव कामक्रोधांची सोबत नको, यांची मनांत नुसती आठवणसुद्धां नको; आपल्या आत्मसुखाच्या अनुभवाचा रस नासूं देऊं नये. १८ १ आवडीप्रमाणें २ टकाचा. ३ घात करता येईल अशा अडचणीत. ४ बुद्धथा, मुद्दाम. ५ मारण्यासाठी, ६ आत्मानुसंधानाचा दमदारपणा.