पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ९३ वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥ ९८ ॥ म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगें पतंग काय साहती । प्रकाशातें ॥ ९९॥ पतंगा दीपी आलिंगन | तेथ त्यासी अचुक मरण । तेवीं विपयाचरण | आत्मघाता ॥ २०० ॥ तैसे जे पार्था । विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावेंना ॥ १ ॥ सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥ सम० - ज्ञानीहि पूर्वसंस्कारें वर्ते प्रकृतिसारिखा । भूर्ते वश प्रकृतिला करावें काय निमर्हे ॥ ३३॥ आर्या-- ज्ञानीही वश केला प्रकृतीच्या तूं पहा उपाधीन । प्रकृतीला वश भूर्ते प्रकृतिस निग्रह करी न आधीन ||३३|| ऑवी -- ज्ञानी असतील जरी । प्रकृति चेष्टा करी । पंचभूतांतें अवधारीं । तया निग्रह काय ? ॥ ३३ ॥ म्हणोनि इंद्रियें इयें एकें । जाणतेनिही पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनी ॥ २ ॥ हां गा सपेंसी खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल । सांगें हाळाहळ जिरेल | सेविलिया काई || ३ || देखें खेळतां अभि लाविला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥ ४ ॥ एहवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नाना भोगँरचना | मेळवावी ॥५|| आपण साया में करूनि बहुतें । सकळही समृद्धि- जातें । उदोअ॑स्तु या देहातें । प्रतिपाळावें कां ॥ ६ ॥ सर्वस्वं शिणोनि एथें | अर्जवावीं संपत्तिजातें । तेणें स्वधर्म सांडूनि देहातें । पोखावें काई ॥ ७ ॥ मग हें तंव पांचमेळावा | शेखीं अनुसरेल पंचवा । ते वेळी केला किंवा चंद्रोदयाचा जसा कावळ्याला कांहींच उपयोग होत नाहीं, तसा हा कर्मयोगाचा उपदेश मूर्खाला रुचणार नाहीं. ९८ म्हणून ते याला मान देत नाहींत, उलट याची निंदाही करूं लागतात. आणि हें असेंच व्हावयाचें, कारण पतंगाला कधीं तरी दिव्याचा प्रकाश सहन होतो का ? सांग पाहू ९९ पतंग दिव्याला आलिंगन देण्यास जातो आणि नेमका जळून मरतो, तद्वत् विषयाचे सेवन अशा मूर्खाना आत्मघातकच होते. २०० त्याप्रमाणेच, वा अर्जुना, ज्यांना या परमार्थविचाराचा कंटाळा येतो, त्यांच्याशी याविषयी भाषणही करूं नये. १ म्हणून हीं इंद्रिये एकाही जाणत्या पुरुषाने हौस, मौज, रंजन, इत्यादि निमित्तांनीं लाडावून सोडूं नयेत. २ अरे, सांग पाहू, सर्वाशी खेळतां येईल, कीं, वाघाशीं सोबत जमेल, कीं हालाहल विष पिऊन जिरवितां येईल ? ३ हें पहा आधीं मौजेने अग्नि लावावा, आणि मग तो भडकला कीं आटोक्यांत राहात नाहीं, तसेच इंद्रियांचे लाड केले म्हणजे मोठेच संकट उद्भवते. ४ खरोखरच, अर्जुना, हा देह जर पराधीन आहे, तर आपण याच्याकरितां नाना त-हेचे भोग कां म्हणून गोळा करावे ? ५ अनेक प्रकारचे कप सोमून, नाना प्रकारचे विषय संपादन करावे आणि रात्रंदिवस त्या विषयांनी आपण या शरीराची भर कां करावी ? ६ सर्व परींनीं शिणून आणि नानाविध संपत्ति मिळवून आणि असें करितांना स्वधर्मालाही विसरून या शरीराला कशाकरितां पुष्ट करावें ? ७ अहो, हे तर पांचभौतिक आहे, आणि अखेर त्या पंचभूतांतच विरून जाणार, मग तें असें पंचवाला १ उसळला, भडकला. २ विषयभोगांची जुळवाजुळव ३ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत.