पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

R:::::::::HHHHHHHHHH ब्रह्मवृंदाचा दोष नाहीं १३ अशी ज्ञानदेवांची अपरंपार स्तुति येथे व्यवहारास धरून नाहीं. ( ४ ) चवथें, यांत ज्ञानदेवांशिवाय इतर भावंडांचा शुद्धीकरणप्रकरणी पृथक्त्वाने उल्लेख पाहिजे होता, तो मुळींच आढळत नाहीं ; ( ५ ) आणि अखेरचें पांचवें कारण असें कीं, या काव्यांती ग्रंथकाराने आपली कृति ' सुरसेवित' ज्ञानदेवचरणांवर अर्पण केली आहे. त्यांत पैठणकर ब्रह्मवृंदाचा कांहीं संबंध दर्शविलेला नाहीं. काव्यग्रथक बोपदेव म्हणतो:- श्रीमद्ज्ञानेशचरणयुगले सुरसेविते । बोपदेवेन ग्रथितं शुद्धिपत्रं समर्पितम् ॥ असें जरी आहे, तरी जोपर्यंत विरोधक पुरावा उपलब्ध झाला नाहीं, तोंपर्यंत या शुद्धीकरण काव्यांतील शुद्धिशक स्वीकारण्यास कांहीं हरकत नाहीं. या काव्यांत शुद्धीकरणाचा काल शालिवाहन शक १२०९, माघ शुद्ध पंचमी, सर्वजिन्नाम संवत्सर, असा दिलेला आहे; म्हणजे या वेळी ज्ञानदेवांचे वय बारा वर्षांचे होते. या प्रकरणी ह. भ. प. पांगारकर आपल्या ज्ञानेश्वेरचरित्रांत म्हणतातः " विठ्ठलपंतांचे वैराग्य, ज्ञान व योग्यता लक्षांत आणून त्यांनी ( ब्राह्मणांनी ) अपवादादाखल त्याला मुक्त केलें असतें किंवा शास्त्राला थोडेसें चालन देऊन किंवा त्यांत अपवादप्रकरणी स्वतंत्र नियम ठरवून जर क्षमा केली असती तर सोन्याहून पिवळे म्हणतां आलें असतें; पण एवढे बुद्धिवैभव व धमक त्या ब्राह्मणांत नसल्यामुळे त्यांनी रूढ शास्त्राप्रमाणे त्याला गुन्हेगार ठरविलें. " पण, अशा प्रकारें ब्राह्मणांवर बुद्धिमांद्याचा व कमकुवतपणाचा टोला टाकून, ते पुढे म्हणतात की, “ विठ्ठलपंतांचे विवेकवैराग्य लक्षांत घेतां व ज्ञानेश्वरादि दिव्यपुत्ररत्नांचे ते जनक आहेत ही गोष्ट मनांत आणतां त्यांना जगानें ह्यापेक्षां कितीतरी अधिक प्रेमाने व आदराने वागवावयास पाहिजे होतें असें आपणास वाटतें. पण त्या वेळच्या त्यांना शिक्षा देणाऱ्या ब्राह्मणांनाही फारसा दोष देववत नाहीं. " यानंतर ते पुढे म्हणतात कीं, " धर्माचे व समाजाचे कायदे मोडणारे पुरुष धर्मद्रोही व समाजद्रोहीच समजले पाहिजेत. " शिवाय " थोरांचा थोरपणा तरी अडचणीशिवाय कसा प्रकट व्हावा !" पण या सर्व गोष्टी जर खन्या आहेत, तर तत्कालीन आळंदीकर किंवा पैठणकर ब्राह्मणांवर पहिल्या प्रथम कठोरपणें बुद्धिमंदत्वाचा व दुर्बलतेचा आरोप केला आहे, तो कां म्हणून ? विठ्ठलपंतांचीं मुलें दिव्यप्रभावाचीं होतीं, हें आज आपणास माहीत आहे; पण विठ्ठलपंताच्या शुद्धी- करणाचा प्रश्न निघाला त्या वेळी आळंदीकरांस किंवा पैठणकरांस या भविष्य गोष्टीचें आगाऊ स्वप्न पडलें होतें, असें मानण्यास काय कारण आहे ? विठ्ठलपंतांचे एकंदर चरित्र बरेचसे डळमळीचे व लहरींचे आहे असेंही त्या वेळच्या लोकांस वाटणें, अगदीं साहजिक होतें, ही गोष्ट आपल्यास नजरेआड करतां येत नाहीं. विद्येनें संपन्न होऊन व — डोळस ' वैराग्यानें युक्त होऊन तीर्थाटनाला अल्पवयांत बाहेर पडणे, याच तीर्थाटनांत आळंदीक्षेत्रांत गृहस्थाश्रमी होणें, नंतर फारसे कारण नसतां घरदार सोडून विरक्तीच्या लहरींत संसारांतून निसटणे, 'लग्याबांध्याचें कोणी नाहीं, ' असें बळेंच सांगून रामानंदांकडून किंवा श्रीपादस्वामींकडून संन्यासदीक्षा घेणे, हें कपट उघडकीस आल्यावर संन्यासाश्रम सोडणे व पुन्हा गृहस्थ होणें, नंतर संततिविस्तार झाल्यावर आपल्यावरील बहिष्कार उठण्याबद्दल ब्राह्मणांची मनधरणी करणं, आणि ब्राह्मणांनी देहदंडाचें प्रायश्चित्त सांगितल्याबरोबर पोरक्या पोरांना वान्यावर सोडून आपला देह गंगेस समर्पण करणें, या सर्व गोष्टींत ' डोळस ' वैराग्यापेक्षां दुसऱ्याच कसल्यातरी गुणाची छाया तत्कालीन ब्रह्मवृंदास दिसली असली, तर त्यास बुद्धिमांद्य किंवा दुर्बलता म्हणतां येईल, असे आजही आम्हांस वाटत नाहीं. आश्रमचतुष्टयाचा गाडा असा आहे कीं, तो टप्याटप्यानें अगर कांही टप्पे ओलांडून पुढेच जात असतो, तो 'एकाद्या टप्यांत रेंगाळतही राहील, पण कधीही मागे फिरून मागच्या टप्यावर परत येत नसतो. तेव्हां आश्रमविशिष्ट समाजांना या आश्रमपरंपरेच्या पुरोगतीला अबाधित राखणें अवश्य आहे. आश्रमपरंपरेच्या निर्बंधाला एकादा अपवाद मान्य करण्याचे काम अशा समाजाला चुटकीसरसें उलगडतां येणार नाहीं, हें उघड आहे. शिवाय विठ्ठलपंताच्या चरित्राची वर जी त्रोटक रूपरेखा दिली आहे, त्यावरून त्याचा दामही अगदीं खणखणीत होता, असे म्हणवत नाहीं. अशा बाबतीत खन्याखोट्याचा निर्णय करणे फार कठीण असतें, आणि असा निर्णय न करताच सवलत देणें म्हणजे सरसकट सर्वांनाच मुक्तद्वार होते. औषधाकरितां मद्य पिणें हें ब्राह्मणसमाज क्षम्य समजेल, परंतु अमुक एक इसम मद्यसेवन करतो, तें औषधासाठी की हौशीसाठी हा प्रश्न सोडवणे मोठ्या मुष्किलीचें होतें. १ १ श्रीज्ञानेश्वरचरित्र पृ० ६७, ६८, ६९.