पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

涼涼涼涼涼涼涼涼涼 १२ प्रस्तावना. सज्जनांचे हृदयाला पाझर फुटावा, यांत आश्चर्य कसले ? त्यांनी एकंदर सर्व प्रकरणाचा सामदामानें विचार करून 'फार खुबीनें निर्णय लाविला. एकदा संन्यास घेतलेल्या व्यक्तीनें पुन्हां गृहस्थाश्रमी होण्याची प्रथा समाजांत पडूं नये आणि निवृत्तिदेवादि अलौकिक बुद्धिमान्, सच्छील, व आदरणीय, व्यक्ति समाजांतून फुटू नयेत, या दोन्ही गोष्टी त्यांस साधावयाच्या होत्या व त्या त्यांनी साधल्या. त्यांनी असा निर्णय दिला, की, अनन्य भक्ती हरिपादपद्मीं निष्ठा धरा केवट सौख्यसझीं. तीव्रानुतापें भजनासि सारा, टाकोनि मायामय हा पसारा. चित्तीं चिदानंद धरोनि राहा, चैतन्य तें एक अखंड पाहा, या पद्धतीनंच तराल लोकीं, यावेगळा मार्ग तुम्हां नसो कीं. जितेंद्रियत्वेंचि वसा अखंड, न वाढवा संसृतिकामचंड, वैराग्ययांचि धरोनि पिंड वर्ता, तुम्हां निष्कृति हे उदंड - निरंजन माधव निवृत्तिदेवादि भावंडांनी-- विशेषतः ज्ञानदेवांनी हा निर्णय शिरसा वंद्य केला. निवृत्तिदेव व सोपानदेव यांचे मनांतून हा निर्णय अमान्य करावा असें कांहींसें होतें. परंतु ज्ञानदेवांनीं त्यांस आवरून धरलें. आपल्या समाज- संस्थेच्या हाडीमासीं वर्णाश्रमभेद व जातिभेद कसा खिळलेला आहे, हें त्यांनी ध्यानीं घेतलें. तत्त्वदृष्टीने हे भेद जरी निर्मूल असले, तरी सव समाजव्यवहार याच भेदांनी रंगलेले आहेत, आणि हे भेद सुविचाराने पाळले असतां व्यवहाराला सुरळीतपणा येतो, हेंही ज्ञानदेवांच्या नजरेतून सुटलें नाहीं. तेव्हां समाजसंस्था व्यवस्थित राखण्याकरितां हे भेद बंडखोरपणानें उधळून न टाकतां, त्यांत प्रसंगानुसार शक्य तितकें मार्दव व सैलपणा आणणे इतकेंच इष्ट आहे, असे त्यांनी आपल्या बंधुद्रयाच्या मनास पटवून दिलें. नामदेव सांगतात- विधिवेदविरुद्ध संपर्कसंबंध; नाहीं भेदाभेद स्वस्वरूप; अविधि आचरण परम दूषण, वेदोनारायण बोलियेला. स्वधर्म अधिकार जातिपरत्वभेद उचित ते शुद्ध ज्याचे तया. म्हणोनियां संत अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तानियां. कुळींचा कुळधर्म अवश्य पाळावा; सर्वथा न करावा अनाचार. प्रत्यवाय आहे अशास्त्रीं चालतां, पावन अवस्था जरी आली. ज्ञानदेव म्हणे, ऐका, जी निवृत्ति, बोलिली पद्धति धर्मशास्त्रीं. अशा प्रकारें पैठणकर ब्राह्मण समाजाच्या संमतीनेच हीं चारी भावंडें ब्राह्मणसमाजांत राहून ब्रह्मचर्याचे पालन करतीं झालीं. ब्रह्मवृंदाचा असा पाठिंबा नसता, तर मुक्ताबाईला निरपवादप्रमाणें ब्रह्मचारिणी रहातां आलेच नसतें. या शुद्धिप्रकरणाची अनेक लेखकांनी निरनिराळ्या प्रकारांनीं चर्चा केली आहे, त्याचे येथे दिग्दर्शन करणें अप्रासंगिक होणार नाहीं. जुन्या बळदांत सांपडलेलें बोपदेवाने रचलेलें एक शुद्धिपत्र कै. ह. भ. प. भिंगारकरबोवांनी प्रसिद्ध केलेलें आहे. वास्तविक पहातां तें खरें शुद्धिपत्र नसून ज्ञानदेवसंप्रदायांतील एका बोपदेवाने रचिलेले सदहू प्रसंगावरील काव्य आहे. ते जरी समस्त पैठणकर ब्राह्मणांच्या नांवाचा बहाणा करून लिहिलें आहे, तरी त्याचें खरें स्वरूप लपत नाहीं. असें निश्चित करण्यास अनेक कारणे आहेत; ( १ ) एक तर याची भाषा व्यावहारिक शुद्धिपत्राची नसून, फार शब्दार्थालंकारमंडित आहे; ( २ ) दुसरें असें कीं, यांत विशुद्धीकरण कशा रीतीने करण्यांत आलें, निर्णय काय झाला, याचा मुळीच ठाव नाहीं ; ( ३ ) तिसरें कारण हैं कीं, निवृत्तिदेवादि भावंडांना शुद्ध करण्याच्या उद्देशाने दिलेल्या शुद्धिपत्रांत - ज्ञानेश्वरः स्मरणतः स्मरणेन मुक्तान् मुक्ताग्रजोऽयमखिलान् खलु कर्तुमी निंद्यां नु बांधरहितैः स्वहितेक सिध्ये वंद्यो ध्रुवं सुकृतिभिः कृतिभिः समस्तैः ॥