पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ९१ तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥ सम० - तत्वज्ञ गुणकमांच्या दों भागीं स्वअकर्तृता । पाहे की स्वस्वविषयीं इंद्रिये हीच वर्तती ॥ २८ ॥ आर्या-गुणकर्मविभाग तो तत्वज्ञान्यासि भेद साहीना । गुणसंधींतचि वर्तति ऐसें जाणोनि सक्त होईना ॥ २८ ॥ ओंवी — प्रकृतिगुण मोहिती । मूर्ख फलीं आसक्त होती । ते ज्ञानियांची युक्ती । इंद्रियगुण ॥ २८ ॥ जे तत्त्वज्ञानियांच्या ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात पाहीं | निफजत असे ॥ ८१ ॥ ते देहाभिमान सांडुनी । गुणैकमैं बोलांडुनी । साक्षीभूत होउनी । वर्तती देहीं ॥ ८२ ॥ म्हणूनि शरीरीं जरी होती । तरी कर्मवधा नातळती । जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥ ८३ ॥ प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्तं गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दान कृत्स्नविन्न विचालयेत् ॥ २९ ॥ सम० -- प्रकृतीच्या गुणीं मूढ झोंबती विषयद्वियीं । असर्वज्ञां तयां मूढां सर्वज्ञ खवं नये ॥ २९॥ आर्या- प्रकृति गुण मोहित जे गुणकर्मी सक्त मंद अज्ञानी । त्यांचे मनास चालन न करावे जाणत्यांहि सुज्ञांनीं ॥ २९ ॥ ओवी — प्रकृतिचेष्टा करी माया । विषर्थी आसक्त होऊनियां । मूढगती पावोनियां । मूखांसि खवळूं नये ॥ २९ ॥ एथ कर्मी तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥ ८४ ॥ इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें पैरकर्म वलात्कारें | औपादी जो ॥ ८५ ॥ माय सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥३०॥ सम० – कर्मे समर्पनि मज सर्व अध्यात्मबुद्धिनें । टाकूनि आशा ममता सुर्खे हैं करिं युद्ध तूं ॥ ३० ॥ आर्या--अध्यात्म विचारें करिं माझ्या ठाईं स्वकर्मसंन्यास । निर्मम निष्काम रणीं निश्चळ होवोनि मारिं सैन्यास ॥ ३० ॥ ओवी - सर्व कर्मे मज अप । चित्त आत्मयातें समप । उदासपणें वोपीं । ऊठ युद्धासी ॥ ३० ॥ तरी उचितें कर्मे आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ||८६|| आणि हें कर्म मी कर्ता । आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिघों देसी ॥ ८७ ॥ तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ ज्यांना आत्मतत्त्वाचा बोध झाला आहे, त्यांच्या ठायीं अखिल कमै उत्पन्न करणाऱ्या मायेचा अभाव असतो. ८१ ते देहाचा अभिमान सोडतात, गुण आणि कर्म यांचा अन्योन्य संबंध ओळखतात, आणि केवळ तटस्थ वृत्तीनें तिन्हाइतासारखे शरीरांत राहतात. ८२ म्हणून, ज्याप्रमाणें पृथ्वीवरील प्राण्यांच्या किया सूर्याला लागत नाहींत, त्याप्रमाणें असे पुरुष जरी शरीरांत राहात असले, तरी कर्मबंध त्यांना स्पर्श करीत नाहीं. ८३ गुणांचा पगडा ज्याच्यावर बसतो आणि जो मायेच्या तंत्रानें वागतो, त्यालाच या संसारांत कर्माची बाधा होते, ८४ कारण, गुणांच्या आश्रयानें इंद्रियें आपल्या स्वभावधर्मानें जो व्यवहार करितात, त्या दुसऱ्यांच्या व्यवहाराला हा पुरुष बळेंच आपल्यावर लादून घेत असतो. ८५ , म्हणून तूं सर्व विहित कर्मे करून तीं मला समर्पण कर, परंतु चित्तवृत्ति निरंतर आत्मस्वरूपावर रोखून ठेव. ८६ आणि 'हें कर्म, मी कर्ता, याला मी करणार, अशा प्रकारच्या गर्वाला मात्र चित्तांत शिरूं देऊ नकोस, म्हणजे झाले. ८७ या शरीराच्या भजनीं लागूं नको, आणि सर्व स्वार्थी कामना टाकून दे आणि मग जे जे भोग ज्या ज्या वेळीं उपस्थित होतील, त्या सर्वाचा १ माया म्हणजे मीच ही भावना. २ त्रिगुणाचे परिणाम, ४ त्रिगुणाने घडलेलें कर्म. ५ आपले कर्म समजतो, ३ तटस्थ वृत्तीने राहून.