पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९० सार्थ श्रीज्ञानेश्वरी न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्म संगिनाम् । जोपयेत्सर्वकर्माणि विज्ञान्युक्तः समाचरन् ॥ २६ ॥ सम० -- काम्य कर्मठ अज्ञांचा बुद्धिभेद करूं नये । करवाव सर्व कर्मै तत्रज्ञे युक्त जो स्वर्ये ॥ २६ ॥ आर्या-जे अज्ञ कर्मसक्त प्रज्ञा त्यांची कदा न पर्तविजे । युक्तप्रज्ञे आपण कमसि करोनि व्यांसि वर्तविजे ॥ २६ ॥ ओवी - ज्ञानी एकचित्त होऊनी । सर्व कर्मै उत्कृष्ट करूनी । अज्ञानियांस कर्म आचरवावें दाटूनी । ज्ञानी स्वयें ॥२६॥ जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्कान्नें केवीं जेवी । म्हणोनि वाळका जैसीं नेदावीं । धनुध ॥ ७२ ॥ तैसी कर्मी जया योग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी ॥ ७३ ॥ तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचिएकी प्रशंसावी । नैष्कमही दावावी । आचरोनी ॥ ७४ ॥ तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलेना ॥ ७५ ॥ जैसी बहुरूपियांची रावोराणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी | तैसीच करिती ॥ ७६ ॥ प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ॥ २७ ॥ सम० – कर्मै सर्व प्रकृतिच्या करिजेताति जीं गुणीं । अहंकारें मूढबुद्धी मी कर्ता मानितो असें ॥ २७ ॥ आय - प्रकृतिगुणानुग कर्मे होती ऐसे असोनि हा मूढ । मी कर्ता म्हणवुनियां अभिमानीं व्यर्थ होत आरूढ ॥ २७ ॥ ओवी - प्रकृतिगुणांचे कार्य । क्रिया निपजे गुणमय । नेणत्या संतोष होय । मी कर्ता मानी ॥ २७ ॥ देखें पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेइजे । तरी सांगें कां न दाटिजे । धनुर्धरा ॥ ७७ ॥ तैसीं शुभाशुभ कर्मै । जियें निजती प्रकृति- धर्मे । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ ७८ ॥ | ऐसा अहंकारादि रूढ | एकदेशी मृढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥ ७९ ॥ हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित । तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारीं पां ॥ १८० ॥ जें मूल मोठ्या कष्टानेंच स्तनपान करूं शकते, त्या मुलानं पक्वान्ने कशीं खावीं ? म्हणून, अर्जुना, त्या मुलाला जशीं पक्वान्नं देऊ नयेत, ७२ त्याप्रमाणेच ज्याला कर्म करण्याचीच योग्यता आहे, त्याला थट्टाविनोदांतही कर्मत्यागाचा उपदेश करूं नये. ७३ अशा मनुष्याला निष्काम ज्ञानवानानंही सत्कर्माचा मार्ग दाखवावा, सत्कर्माची प्रशंसा करावी, आणि स्वतःही तसेंच वर्तन ठेवून उदाहरण घालून द्यावें. ७४ अशा प्रकारें लोकसंग्रह करण्याकरितां म्हणजे समाजसंस्था चांगल्या स्थितींत राखण्याकरितां कर्माचा स्वीकार केला, तर कर्म करणाराला तें बंधक होत नाहीं. ७५ बहुरूपी राजाराण्यांचीं सोंगें घेतात, आणि त्यांच्या मनांत वास्तविक स्त्रीपुरुषभाव नसतांनाही सोंगांची बतावणी यथासांग करून जसा लोकांचा संतोष संपादितात, तसेंच ज्ञानवान् पुरुषही ज्ञानोत्तरकाली लोक संपादणीसाठी निष्काम व निर्विकार वृत्तीनें सत्कर्म आचरतात. ७६ अर्जुना, असें पाहा, कीं, जर दुसऱ्याचे ओझें आपण आपल्या डोक्यावर घेतलें, तर त्याखालीं आपण कसे दडपून जाणार नाहीं ? ७७ याच न्यायानें, मायेच्या गुणानें उत्पन्न होणारी बरीं वाईट कमें, मूर्ख मनुष्य बुद्धिभ्रमानं स्वतःला त्यांचा कर्ता समजून, आपल्यावर लादून घेतो, ७८ असा जो अहंकारास चढलेला, स्वार्थी, संकुचित दृष्टीचा, मूर्ख मनुष्य, त्याला हैं परमार्थाचें गूढत्व उपदेशं नये. ७९ पण हे पुरे आतां. सध्यां तुझें कशांत हित आहे, तें तुला सांगतों; अर्जुना, श्रवण कर. १८० १ थडकणार नाही. २ दुसऱ्याचे ३ एकांगी, एककल्ली.