पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ८९ यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्तं मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥ सभ० - जरी कर्मी न वर्तें मी कधींही यत्नपूर्वक । मार्गानुरूप माझ्या हे वर्तती सर्व मानव ॥ २३ ॥ आर्या- जरि होऊनि निरालस कर्माच्या मी न चालतों वाटे । तरि सकळहि जन माझ्या मार्गे येती मला असे वाटे ॥ २३ ॥ ओवी - जरी कर्म मी न वर्तवीं । तरी कर्म पडे स्वभावीं । म्यां आचरणूक करावी | लोक तैसेच करितील ॥ २३ ॥ परी स्वधर्मी वर्ते कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाचि एका उद्देशा | लागौनियां ॥ ६४ ॥ जें भूतजात सकळ । असे आम्हांचि अधीन केवळ | तरी न व्हावें बरळ । म्हणोनियां ॥ ६५ ॥ उत्सीदेयुरिमं लोका न कुर्या कर्म चेदहम् । संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥ सम० - भ्रष्ट होतील हे लोक न करीं कर्म मी जरी । तेंही करीं अन्य धर्मे तरी या भ्रष्टती प्रजा ॥ २४ ॥ आर्या - जरि मी न करीं कर्मा तरि हे होतील लोक उच्छिन्न । तेव्हां प्रज्ञविनाशक संकरकर्ताहि मी परिच्छिन्न ॥ २४ ॥ ओवी - मी कर्म जरी न करीं । संकट होईल अवधारीं । लोक भ्रष्टती यापरी । तें करणें मज नाहीं ॥ २४ ॥ आम्ही पूर्ण काम होउनी । जरी आत्मस्थिती राहूनी । तरी प्रजा है। कैसेनि । निस्तरेल ।। ६६ ।। इहीं आमुची वांस पाहावी । मग वर्तती परी जाणावी । ते लोकस्थिति आघवी । नासिली होईल ॥ ६७ ॥ म्हणोनि समर्थ जो एथें । आणि लावी सर्वज्ञते । तेणें सविशेष कर्मातें । त्यजावें ना ॥ ६८ ॥ सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत । कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तचिकीर्षुलांकसंग्रहम् ॥ १५ ॥ सम - कर्मै फलार्थ अज्ञानी जशीं करिति भारता । तीं निष्काम करी ज्ञानी जो इच्छी लोकसंग्रह ॥ २५ ॥ आर्या - अज्ञासक्त जसे कां असती कमांचिया महाहाटीं । ज्ञानी सक्त न तैसा परि जनशिक्षार्थ कर्म राहाटी ॥ २५ ॥ ओंवी - हे लोक नेणती कांहीं । वडिलांसारिखे वर्तती पाहीं । ह्मणऊनि श्रेष्ठी दोनी सोई। लोकसंग्रहार्थ धर्म कीजे ॥ २५ ॥ देखें फळाचिया आशा | आचरे कामुक जैसा | कर्मी भरू होआवा तैसा । निराशाही ॥ ६९ ॥ जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था | रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ॥ १७० ॥ मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरे लावावें । अलौलिका नोहावें । लोकांप्रति ॥ ७१ ॥ आणि, मी हें कर्म असें आचरतों, कीं, कोणी म्हणावें हा अजून सकामच आहे ! पण हें करण्यांत माझा एकच उद्देश आहे. ६४ तो हा, कीं, हे सर्व जीव माझ्याच आसऱ्याने जाणारे आहेत, तेव्हां यांनीं बहकून जाऊं नये. ६५ आम्ही पूर्णत्वाला पोंचून जर आत्मस्थितीत अकर्मेपणानें राहिलों, तर या प्रजेचा निभाव कसा लागेल ? ६६ यांनी आमची रहा पहावी, आणि मग तीवरून सदाचरणाची पद्धति जाणावी, अशी जी आजमितीस समाजसंस्थेची घडी आहे, ती सर्वत्र विघडून जाईल कीं ! ६७ म्हणून, ज्या सामर्थ्यवान पुरुषाने या जगांत सर्वज्ञपणाचे पीक गोळा केलें आहे, त्यानें तर कर्माचा त्याग विशेषेकरून करूं नये. ६८ जसा सकाम पुरुष फळाची इच्छा धरून कर्म करतो, तसाच निष्काम पुरुषाचाही कर्माचरणांत भर असावा. ६९ कारण, अर्जुना, तुला पुन्हां पुन्हां बजावतों, कीं, ही समाजसंस्था सर्व परींनी नीट राखणें, अवश्य कर्तव्यच आहे. १७० शास्त्रविहित मार्गाने चालावें, सर्वजणांना नीट चालीला लावावें, आणि कोणत्याही प्रकारें आपण समाजापासून वेगळे आहों असें भासूं देऊं नये. ७१ १ वाठ, पद्धति, वर्तनक्रम. २ सर्वज्ञतेचे पीक पूर्णतेला आणतो. लावी=शेताची लाणी ( कापणी ). ३ नीट मार्गाला. १२