पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी मार्गी अंधामरिमा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । जाणतेनि ॥ ५६ ॥ हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे । तिहीं कवणेपरी जाणिजे । मार्गातें या ॥ ५७ ॥ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥ सम० - की जे जे आचरे श्रेष्ट तें तें इतरही जन । तो जो कां निर्णय करी वर्तती लोक ते रिती ॥ २१ ॥ आर्या - चालति जन त्या मार्गे घालिति जो श्रेष्ठ पांडवा धारा । ते जे प्रमाण करिती वर्तति जन त्या वरोनि आधारा२१ आंवी - जें जें श्रेष्ट वर्तती | लोक तैसेचि आचरती । जैसे ते प्रमाण करिती । जन त्या मार्गे असे ॥ २१ ॥ एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्म ठेविती । तेंचि येर अनुष्टिती । सामान्य सकळ ॥ ५८ ॥ हें ऐसे असे स्वभावें । म्हणोनि कर्म न मंडावें । विशेष आचरावें । लागे संतीं ॥ ५९ ॥ न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवातव्यं वर्त एव च कर्मणि ॥ १२ ॥ सम० पार्था मार्ते तिहीं लोकीं नाहीं कर्त्तव्य कांहिंही । अवाप्तकाम निष्काम तरी कमीच वर्तत ॥ २२ ॥ आर्या- त्रिभुवनं कर्तव्याची माझ्या कांहीं मनीं नसे ऊर्मी । अप्राप्त पावयाची नसतांही वर्ततींच मी कर्मी ||२२|| ओंवी — त्रैलोक्याचे ठायीं । पार्थो मज करणें कांहीं नाहीं । अवाप्त पावणें नाहीं । तीं कम करीतसे ॥ २२ ॥ आतां आणिकांचिया गोठी । कायेशा सांगों किरीटी । देखें मीचि ये राहाटी । वर्तत अमें ।। १६० ।। काय सांकडे कांहीं मातें । कीं कवणें एक आतें । आचरें मी कर्मातें । म्हणमी जरी ॥ ६१ ॥ तरी पुरतेपणीलागी | आणिक दुसरा नाही जगीं । ऐसी सामग्री माझ्या अंगी । जाणसी तूं ।। ६२ ।। मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मी वर्ते ॥ ६३ ॥ आंधळ्यावरीवरच पुढे जसा डोळस माणूस वाटेनं चालतो, तसा अज्ञानी लोकांना बरोबर घेऊनच जाणत्यानं स्वधर्माचा बोध त्या अजाणांना करावा. ५६ अरे वा, जर जाणत्यांनी असे केले नाहीं, तर अज्ञ जनांना काय कळणार आणि कर्तव्यमार्गाची ओळख त्यांना होणार तरी कशी ? ५७ जगाची रीत अशी आहे, कीं, थोर माणसं जं जं करितात, त्याला लोकांत 'धर्म' हे नांव मिळतं, आणि इतर सर्वसाधारण लोक त्याचंच अनुकरण करितात. ५८ असा अगदीं स्वाभाविक प्रकार घडत असल्यामुळे, स्वकर्मानुष्ठान सांडूं नये. त्यांतही जे संत म्हणून नांवाजले असतील, त्यांनी तर तं कधींच सोडतां कामा नये. ५९ आतां, अर्जुना, या दुसऱ्यांच्या गोष्टी तुला कशाला सांगुं ? पहा बरं, मीसुद्धां या स्वकर्मानुष्ठा- नाच्या मार्गानंच चालत असतो. १६० आतां माझ्यावर कांहीं संकट पडले आहे, किंवा मला कांहीं स्वार्थी हेतु साधावयाचा आहे, म्हणून मी हे कर्माचरण करितों, असं तुझं म्हणणं असेल, ६१ तर माझ्याइतका पूर्णत्वाला पोचलेला दुसरा कोणीच या जगांत नाहीं, असें सामर्थ्य माझ्या अंगी आहे, हे तुला ठाऊकच आहे. ६२ सांदीपनि गुरूंचा मेलेला मुलगा मी यमलोकाहून परत आणिला, तो माझा अलौकिक पराक्रम तूं स्वतः डोळ्यानं पाहिला आहेस. तरीपण मी शांतपणे विहित कर्म आवरीतच असतो. ६३ १ परिपूर्ण सामर्थ्यासंबंध