पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन । न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८ ॥ सम०—–कर्मी त्याला फळ नसे अकर्मी प्रत्यवायही । न ज्यांस सर्वभूतींही कांहीं फळ अपेक्षित ॥ १८ ॥ आर्या - कार्ये अर्थ कार्ये अनर्थ जो या व्यजीच उभयांस सर्वांभूर्ती पार्था नाहीं अर्थ व्यपाश्रये त्यास ॥ १८ ॥ ओवी - कर्म न केलिया कांहीं । परस्परें गुंतलें नाहीं । सर्व भूतांचे ठायीं । फलेच्छा न करी ॥ १८ ॥ ८७ तृप्ति जालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं । देखें आत्मतुष्टी तैसीं । कर्मे नाहीं ॥ ४८ ॥ जंववरी अर्जुना । तो वोधु भेटेना मना । तंवचि यया साधना | भजावें लागे ॥ ४९ ॥ तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर । असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ १९ ॥ सम० यालागि निष्काम सदा करावें कर्म तें करीं । निष्काम करितां कर्म पुरुष ब्रह्म पावतो ॥ १९ ॥ आर्या- यास्तव सक्त न होतां अवश्य जें कर्म त्याविना न रहा । सक्त न होतां कर्मा करितां ब्रह्मास पावतो नर हा १९ ओंवी — याकारणें निष्काम । कर्म करावे सकाम । निष्काम करावें काम । तो ब्रह्मी मिळे ॥ १९ ॥ म्हणऊनि तूं निर्यतु । सकळ कामरहितु । होऊनियां उचितु । स्वधर्मे रहाटें ।। १५० ।। जे स्वधर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । ते कैवल्य परम तत्त्वतां । पावले जगीं ॥ ५१ ॥ कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसंग्रमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥ २० ॥ सम० — कर्मैच करितां सिद्धी पावले जनकादिक । लोकसंग्रहदृष्टीनें तरी कर्मासि योग्य तूं ॥ २० ॥ आर्या - जनकादिकही कर्मे झाले ते सिद्ध पावले शर्म । जनसंग्रहाकडेही पाहुनि पार्था करीं सदा कर्म ॥ २० ॥ ओवी - विदेहादि जनक बोलिले । ते कर्मै सिद्धी पावले । म्हणोनि श्रेष्ठ बोलिले । यास्तव तूं कर्म करीं ॥ २० ॥ देख पां जनकादिक । कर्मजात अशेख | न सांडितांचि मोक्षसुख | पावते जाहले ॥ ५२ ॥ याकारणें पार्था । होआवी कमीं आस्था । हे आणिकाही एका अर्था | उपकारैल ॥ ५३ ॥ जे आचरतां आपणपयां | देखी लागेल लोका यया । तरी चुकेल अपाया | प्रसंगेंचि ॥ ५४ ॥ देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले | तयांही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ ५५ ॥ ज्याप्रमाणे एकदा तृप्ति झाल्यावर तिची साधनं आपोआपच नाहींशी होतात, त्याप्रमाणेंच आत्मानंद लाभला की कर्माचा नाश होतो. ४८ अर्जुना, जोपर्यंत हा आत्मबोधाचा उदय मनांत झाला नाहीं, तोंपर्यंत या स्वधर्माचरणाच्या साधनाला भजणें अवश्य आहे. ४२ म्हणून, तूं इंद्रियांचा आवर करून आणि सर्व स्वार्थी इच्छा सोडून विहित स्वधर्माचे आचरण करावेंस. १५० हे पार्था, ज्यांनीं निष्कामबुद्धीनें स्वकर्म अनुसरलें, ते या जगांत खरोखर केवट ब्रह्मस्थितीला पोचतात. ५१ उदाहरणार्थ, कोणतंही विहित कर्मानुष्ठान न सोडतांच जनकादि राजर्षि मोक्ष मिळविते झाले. ५२ या कारणास्तव, अर्जुना, स्वकर्माविषयीं निरंतर काळजी घ्यावी. स्वकर्माचे अनुमान दुसऱ्याही एका गोष्टींत चांगले साधन होईल, ५३ कारण, आपण स्वकर्म आचरिलें असतां, या इतर लोकांनाही योग्य आचाराचा मोळा लागतो, आणि मग जगाचा अपाय आपोआपच टळतो. ५४ असें पहा, कीं, जे ब्रह्मस्वरूपाला पांचून धन्य झाले आणि जे पूर्णत्वानें निष्काम बनले, त्यांनाही इतर लोकांना योग्य मार्गाचें वळण लागावें म्हणून त्या ज्ञानोत्तरकाळीही कर्म करावें लागतें. ५५ १ इंद्रियनिग्रह करून. २ आत्मभावनेनें. ३ ओघाने, सहज. ४ कृतकार्य.