पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागूनियां ॥ ३८ ॥ म्हणूनि सँमूळ हा उचितु । स्वधर्मरूप कंतु । नानुष्ठी जो म । लोकीं इये || ३९ ॥ तो पातकांची राशी । जाण भार भूमीमी । जे कुक इंद्रियांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥ तें जन्मकर्म सकळ । अर्जुना अतिनिष्फळ । जैसें कां अभ्रपटळ | अकाळींचें ॥ ४१ ॥ कां गळां स्तन अजेचे | तैसें जियालें देखें तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥ ४२ ॥ म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा । सर्वभावें भजावा । हाचि एक ॥ ४३ ॥ हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आलें । मग उचित कां आपुलें । वोसंडावें ॥ ४४ ॥ परिस पां सव्य- साची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ ४५ ॥ यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्ये न विद्यते ॥ १७ ॥ सम० - आत्मखींच जया प्रीति आत्मलाभेंचि तृप्त जो । जो आत्मवींच संतुष्ट त्याला कर्तव्य हॅ नसे ॥ १७ ॥ आर्या-- आत्मरत आत्मतृप्त क्षत्रियवर्या जगामधीं आर्य । जो आत्मतुष्ट पार्था नाहीं त्यालागि कोणते कार्य ॥ १७ ॥ ओवी - आत्मस्वी जे राहिले । आत्मसुखं तृप्त झाले । स्वरूपींच सामावले । तयां कर्मे न लागती ॥१७॥ देखें असतेनि देहधर्मै । एथ तोचि एकु न लिंपे कर्मै । जो अखंडित रमे । औपणपांचि ॥ ४६ ॥ जे तो आत्मबोधं तोपला । तरी कृतकार्य देखें जाहला । म्हणोनि सहजें सांडला । कर्मसंगा ॥ ४७ ॥ पार्था, या स्वधर्मयज्ञाची ही मूळपीठिका मीं तुला अशा प्रकारें थोडक्यांत सांगितली आहे. ३८ म्हणून हा स्वधर्माचरणरूपी यज्ञ मूळचाच योग्य आहे; या लोकीं भ्रमानें माजलेला जो पुरुष हा यज्ञ करणार नाहीं, ३९ तो केवळ इंद्रियांचे लळे पुरविण्याच्या कामाला आल्यामुळे पापाची रास बनून या पृथ्वीला भारच झाला आहे, असें समज. १४० भलत्याच वेळीं आकाशांत पसरलेल्या अभ्रमंडळासारखं अशा पुरुषाचें सर्व जिणें केवळ वांझोटें होतें. ४१ किंवा, ज्याला स्वधर्माचें साधन घडत नाहीं, त्या पुरुषाचें जीवित शेळीच्या गळ्यास लटकत असलेल्या स्तनासारखें सर्वस्वीं निरुपयोगी गणावें. ४२ म्हणून, अर्जुना, लक्षांत घे, कीं, स्वधर्म कोणीही सोडूं नये; या एका स्वधर्माचंच अनुष्ठान जीवाभावानें करावें. ४३ अरे, आपण जर शरीरधारी आहों, तर कर्तव्यकर्म हं शरीराबरोबर ओघानेच आलें आहे, मग आपले विहित कर्म आपण कां सोडावें ? ४४ अर्जुना, देह प्राप्त झाला असूनही जे स्वकर्माचा तिटकारा करितात, ते केवळ गांवढळ जाणावे. ४५ जो आत्मस्वरूपांत निरंतर आनंदानें मग्न असतो, तो, देहधर्म चालू असतांही, कर्मफलानें माखला जात नाहीं, ४६ कारण, तो आत्मज्ञानानें संतुष्ट झाल्यामुळे आणि तेणेंकरून त्याचं जीवित- कर्तव्य संपल्यामुळे, त्याला कर्माचा संग आपोआपच घडत नाहीं. ४७ १ यज्ञाला. २ मूळापासून ३ यज्ञ ४ इंद्रियांच्या पंगस्तीस गेला. ५ शरीर उत्पन्न होतोच. ६ आत्म्याशी.