पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ८५ हें संपत्ति जात आघवें । हवनद्रव्य मानावं । मग स्वधर्मयज्ञे अर्पावें । आदिपुरुषी ॥ १३० ॥ हें सांडोनियां मूर्ख । आपणपेयालागीं देख | निफजविती पाक । नानाविध ॥ ३१ ॥ जिहीं यज्ञ सिद्धी जाये। परेशा तोपु होये । तें हें सामान्य अन्न नोहे | म्हणोनियां ॥ ३२ ॥ हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । हें जीवनहेतु कारण | विश्वा यया ॥ ३३॥ अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः । यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४ ॥ कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥ १५ ॥ सम० - भूतें अन्नरसें होती अन्न पर्जन्यवृष्टिनें । यज्ञेकरुनि पर्जन्य यज्ञ कमैकरूनियां ॥ १४ ॥ वेदांपासोनियां कर्म वेद अक्षरसंभव । तस्मात् तँ सर्वगतही सदा यज्ञ प्रतिष्ठित ॥ १५ ॥ आर्या - अन्नापासुनि भूतें पर्जन्यापासुनीच तें अन्न । ऋतुपासुनि पर्जन्य ऋतु तो कर्माहुनी नसे भिन्न ॥ १४ ॥ कर्म ब्रह्मज तेंही अक्षरभव जाणिजेत समयज्ञीं । सर्वगत ब्रह्महि जें प्रतिष्ठित असे सदैव तें यज्ञीं ॥ १५ ॥ ओंवी—अन्नापासूनि भूतें होती । धान्यें पर्जन्यें निपजती । पर्जन्ये यज्ञाचेनि सुकृतीं । यज्ञ कर्मापासुनि ॥ १४ ॥ कर्मै ब्रह्मापासोनि । ब्रह्म अक्षराहूनी । याकारण ब्रह्म अझुनी । नित्य कर्मे करीत ॥ १५ ॥ अन्नास्तव भूतें । प्ररोहे पार्वती समस्तें । मग पर्जन्यु या अन्नातें । सर्वत्र प्रसवे ॥ ३४ ॥ तया पर्जन्या यज्ञीं जन्म | यज्ञातें प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥ ३५ ॥ तया वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर । म्हणौनि हें चराचर । ब्रह्मव ॥ ३६ ॥ परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुति । ऐकें सुभद्रापति । अखंड गा ॥ ३७ ॥ एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६ ॥ सम॰—असें वर्तविलें चक्र लोकीं जो कां न वर्तवी । वृथा तो पापआयुष्य इंद्रियासक्त तो जित ॥ १६ ॥ आर्या--एवं परंपरागत जो कोणी हा न चालवी बोध । इंद्रियनिरत अघायू त्याचें आयुष्य सर्वथा मोघ ॥ १६ ॥ ओवी— ब्रह्मचत्रा प्रतिष्ठिलें । ते जन्म पावोनि भले । न संपादिलें ते पापी जन्मले । भूभार होवोनियां ॥ १६ ॥ हा संपत्तिसंग्रह स्वधर्मयज्ञांतील आहुति देण्याचें द्रव्य आहे, आणि हें द्रव्य या यज्ञांत परमपुरुषाला समर्पण करावयाचे आहे. १३० हें तत्त्व दूर झुगारून देऊन मूर्ख लोक केवळ स्वतःच्या मिजासी- करितां नानापरींचे अन्नाचे प्रकार बनवितात. ३१ ज्याच्या योगानें हा यज्ञ सिद्धीस जातो आणि आदिपुरुषाला संतोष होतो, तें अन्न खचित हलकंसल कें मानितां येत नाहीं. ३२ अन्नाला सामान्य समजूं नये; हें प्रत्यक्ष ब्रह्मरूपच जाणावें, कारण हेंच या सर्व विश्वाचें जीवनसाधन आहे. ३३ अन्नाच्या साह्यानेंच सर्व भूतें वाढतात, आणि नेहमीं पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ति होते. ३४ अशा पर्जन्याला यज्ञ कारण आहे, आणि कर्माच्या साह्यानेंच यज्ञ सिद्ध होतो, आणि कर्म वेदरूपी ब्रह्मापासून उद्भवते. ३५ या वेदब्रह्माचा संभव अक्षर अशा परात्पर ब्रह्मतत्त्वापासून होतो. म्हणून हें स्थावर जंगम विश्व मूलतः अक्षर परब्रह्माने ओतप्रोत भरलेलें आहे. ३६ तरीपण कर्मरूपानें अवतरणान्या या यज्ञांत वेदरूपी ब्रह्म अक्षय राहत असतें, हें, अर्जुना, तूं ध्यानीं घे. ३७ १ वाट घेतात. २ जननी, प्रसवणारी.