पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥१३॥ सम० -- यज्ञाचें शेष खाणारे नाशिती सर्व पातकें पापी पापचि ते खाती रांधिती स्वनिमित्त जे ॥ १३ ॥ आर्या- निर्दोष सर्वथा ते सेविती जे नित्य यज्ञअवशिष्ट । भक्षिति केवळ अघ ते यज्ञाविण भक्षिती अती मिष्ट १३ ओवी - यज्ञशेष जे भक्षिती । त्यांचीं पातकें जाती । उदरार्थ पशु भक्षिती । पाप भोगिती देख ॥ १३ ॥ देखा विहित क्रियाविधी । निर्हेतुका बुद्धी । जो अमतिये समृद्धी । विनियोग करी ॥ १९ ॥ गुरु गोत्र अनि पूजी । अवसरीं भजे दिजीं । निमित्तादिकीं यजी । पितरोद्देशें ।। १२० ।। या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशी हवन करितां । हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥ २१ ॥ तें मुखें आपुलां घरीं । कुटुंबेसी भोजन करी । कीं भोग्यचि तें निवारी | कल्मपातें ॥ २२ ॥ तें यज्ञवशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अधीं । जयापरी महारोगी । अमृतसिद्धि ॥ २३ ॥ कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेप भोगी तैसा । नाकळे दोपा ॥ २४ ॥ म्हणोनि स्वधमें जें अर्ज । तें स्वधर्मेचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ २५ ॥ हैं वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य हे कथा । श्रीमुरारि सांगे ॥ २६ ॥ जे देहचि आपण मानिती । आणि विषयांतें भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥ २७ ॥ हें यज्ञोपकरण सकळ । नेर्णत सांवळें । अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ।। २८ ।। इंद्रियरुचीसारखे | करविती पाक निके । ते पापिये पातकें । सेविती जाण ॥ २९ ॥ जो निष्काम बुर्द्धानं स्वधर्मानुसार योग्य क्रियेमध्ये आपल्या संपत्तीचा वेंच करितो, १९ गुरु, गाई, व अग्नि यांची पूजा करतो, यथाकाळीं ब्राह्मणाची सेवा करतो, आणि पितरांच्या तृप्तीकरितां श्राद्धादि कर्मे करतो, १२० अशा रीतीनें स्वधर्माचरणाचा यज्ञ संपादून, जो पंचमहायज्ञादि करून अग्नी आहुति समर्पण करतो, आणि मग जो सहज मागें शेष राहील, २१ तोच भाग पापाचा नाश करणारा असल्यामुळे भक्षण करण्यास योग्य आहे, असें जाणून, त्याचें आपल्या कुटुंबासह सुखानें सेवन करतो, २२ अशा रीतीनं यज्ञाचा हुतशेषभाग उपभोगणाऱ्या पुरुषाला, अमृतलाभानें महारोग, तशी सर्व पातकें सोडून जातात. २३ किंवा ज्याला निश्चित तत्त्वज्ञान झालें आहे, तो • जसा लवमात्र भ्रांतीत पडत नाहीं. तद्वत् हा शेषभोगी पापांना सांपडतच नाहीं. २४ म्हणून, स्वधर्माचरण करून जें संपादन केलें जातें, त्याचा स्वधर्माचरणाकडेच बेंच करावा, आणि मग जं मागें अवशिष्ट राहील त्यावर संतोपानें गुजारा करावा. " २५ म्हणून, हे अर्जुना, हा स्वधर्मयज्ञ केल्यावांचून राहू नये, अशी पुरातन कथा श्रीकृष्णांनी सांगितली. २६ जे या देहालाच आत्मा मानितात आणि विषयांचा स्वार्थबुद्धीनं उपभोग घ्यावा असें म्हणतात, व त्यापलीकडे ज्यांना कोणत्याही गोष्टींचं भान नसतं, २७ त्या वहकलेल्या मूर्खाना या नित्ययज्ञाच्या साधनाने रहस्य कळत नसतं आणि ते केवळ अहंपणाने सुखोपभोग भोगूं इच्छितात. २८ आपल्या इंद्रियांना रुचकर वाटतील, असे अन्नप्रकार जे सिद्ध करितात, ते पापी पुरुष पातकांचं सेवन करितात, असें जाणावें. २९ १ प्राप्त होते. २ आत्मा ३ जाणत नसतो. ४ बारगळलेले, बेताल.