पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ८३ प्रमत्तु । केवल भोगासक्तु । होईल जो ॥ ७ ॥ तया मग अपावो थोर आहे । जेणें तें हातींचें सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे | भोग भोगूंं ॥ ८ ॥ जैसें गतायुपी शरीरीं । चैतन्य वासु न करी । कां निर्देवाच्या घरीं । न राहे लक्ष्मी ॥ ९॥ तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवें हरपला । प्रकाशु जाय ॥ ११० ॥ तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजा हो फुडें । विरंचि म्हणे ॥ ११ ॥ म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील | तयातें काळु दंडील | चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयाचें ॥ १२ ॥ मग सकळ दोषु भवते । गिंवसोनि घेती तयांतें । रात्रिममयी श्मशानातें । भूतें जैसीं ॥ १३ ॥ तैसीं त्रिभुवनींची दुःखें । आणि नानाविधे पातकें | दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥ १४ ॥ ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे वापा रुदतां । कल्पांतीही सर्वथा । प्राणिगण हो । १५ ॥ म्हणऊनि निजवृत्ति हे न सांडावी । इंद्रियें वेरळों नेदावीं । ऐसें प्रजांतें शिकवी | चतुराननु ॥ १६ ॥ जैसें जळचरा जळ सांडे । मग तत्क्षणी मरण मांडे | हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंघों नये ॥ १७ ॥ म्हणोनि तुम्हीं समस्त । आपुलालिया कर्मों उचितीं । निरत व्हावें पुढतपुढती । म्हणिपत असें ॥ १८ ॥ झालेल्या संपत्तीनें माजोरी होऊन केवळ सुखोपभोगांत गुंग होईल, ७ त्याचा मोठाच घात होईल, त्यामुळे हाती आलेले सर्व वैभव न होईल आणि प्राप्त झालेलेही सुखोपभोग भोगणें त्याला घडणार नाहीं. ८ जसे, ज्याचें आयुष्य संपलें आहे, अशा शरीरांत चेतनाशक्ति राहात नाहीं, किंवा दुर्दैवी पुरुषाच्या घरीं लक्ष्मी ठरत नाहीं, ९ तसाच, जर स्वधर्माचरणाचा लोप झाला, तर सर्व सुखाचा आधारच तुटला म्हणून समजावें. ज्याप्रमाणे दिवा नाहींसा झाला, म्हणजे त्याच्याबरोबर उजेडही नाहींसा होतो, ११० त्याप्रमाणेंच जेथें स्वधर्माचा उच्छेद झाला, तेथें स्वतंत्रतेलाही ठाव मिळत नाहीं.” ब्रह्मदेव आणखी म्हणाला, ११ 66 म्हणून, हे प्रजांनों, जो स्वधर्म सोडील, त्याला काळ शिक्षा करील, आणि त्याला चोर ठरवून त्याचें सर्वस्व हरण करील. १२ मग सर्व दोष चारी दिशांनीं त्याला गळामिठीत पकडतील आणि जशीं रात्रींच्या वेळीं भूतखेतें मसणवटींत प्रकट होतात, १३ तशीच त्रैलोक्यामधलीं दुःखं आणि नानापरीचीं पातकें, आणि प्रत्येक तऱ्हेचा दीनवाणेपणा, हीं त्या पुरुषाच्या ठिकाणीं वास करितात. १४ अशी दशा त्या वैभवाने माजलेल्या पुरुषाची होते, आणि मग, बाबांनों, तो कितीही रडला रोवला, तरी कल्पांतीही त्याची सुटका होत नाहीं. १५ यास्तव आपला स्वधर्म सोडूं नये, इंद्रियांना बेताल होऊं देऊ नये," म्हणून असा उपदेश ब्रह्मदेवानें मानवी जीवांस केला. तो आणखी म्हणाला, १६ " जलचर प्राणी पाणी सोडून बाहेर आला, कीं, त्याचें मरण ओढवले, म्हणून समजावें; त्याप्रमाणे हा स्वधर्म कोणीही सोडूं नये, नाहींतर सर्वस्वी नाश ठेवलेलाच ! १७ यासाठीं, तुम्हीं सर्वानीं आपल्या योग्य कर्माचरणांत गढलेलें असावें, असें मी तुम्हांला पुन्हां पुन्हां सांगतों. १८ १ बेताल होऊ देऊ नयेत. २ वारंवार.