पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा || १६ || तुम्ही देवांतें भजाल | देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥९७॥ तेथ तुम्ही जें करूं म्हणाल । तैं आपसे सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें ॥ ९८ ॥ वाचासिद्धि पावाल । आज्ञापक होआल । म्हणियें तुमतें मागतील । महाऋद्धि ॥ ९९ ॥ जैसें ऋतुपतीचें द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार - । लावण्येंसीं ॥ १०० ॥ इष्टान्भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः । तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥१२॥ सम० -- इष्टभोग तुम्हां देती यज्ञे जे देव पूजिले । देवीं दिलें तें देवांला न देतां खाय चोर तो ॥ १२ ॥ आर्या- यश भावित सुर ते देति तुम्हां इष्ट भोग ते थोर । देवीं जें दिधलें तें त्यांसि न देतांचि खाय तो चोर ॥ १२ ॥ ओवी - इष्टभावेंकरूनी । यज्ञमुखं समपनी । तें देव अंगीकारुनी । फल देत कल्पनेचें ॥ १२ ॥ तैसें सर्व सुखसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखां काढत । तुम्हांपाठीं ॥१॥ ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मनिरत । वर्ताल बापा ॥ २ ॥ कां जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनियां स्वादा | विषयांचिया ॥ ३ ॥ तिहीं यज्ञंभावित सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी । तया स्वधर्मी सर्वेश्वरीं । न भजेल जो ॥ ४ ॥ अभिमुखीं हवन | न करील देवतापूजन । प्राप्तवेळे भोजन । ब्राह्मणाचें ॥ ५ ॥ विमुख होईल गुरुभक्ती । आदर न करील अतिथी | संतोष नेदील ज्ञाती । आपुलिये ॥ ६ ॥ ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणें तुमचा योगक्षेम निश्चयाने चालवितील तुम्हांला कोणत्याही प्रकारची वाण भामूं देणार नाहींत. ९६ अशा देवांना भजाल तेव्हां देव तुमच्यावर संतुष्ट होतील, आणि असा तुम्हां उभयतांमध्ये प्रेमभाव उत्पन्न होईल. ९७ मग तुम्ही जें करूं म्हणाल, तें सिद्धीस जाईल, आणि तुमच्या सर्व मनकामना पूर्ण होतील. ९८ तुमचा शब्द कधींही खाली पडणार नाहीं. आज्ञा करण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगीं येईल, आणि सर्व प्रकारच्या समृद्धि तुमच्या आज्ञेची याचना करूं लागतील. ९९ ज्याप्रमाणें ऋतु वसंताच्या दारीं वनशोभा नेहमीच फळभाराचे सौंदर्य धारण करून सिद्ध असते. १०० प्रत्यक्ष देव सर्व सुखसमृद्धि बरोबर घेऊन तुम्हांला शोधीत येईल. १ बाप हो ! जर तुम्हीं स्वधर्माचे ठायीं निप्रा ठेवून असे वागाल, तर सर्व परींनीं सुखी व क्लेशहीन व्हाल. २ परंतु सर्व संपदा हातीं आल्यावर, , जो विपयांच्या गोडीला लालचावून इंद्रियांच्या मिजासीला बळी पडेल, ३ आणि स्वधर्मयज्ञानं प्रसन्न झालेल्या देवांनी दिलेल्या भरपूर संपत्तीनें जो योग्य मार्गानें चालून विश्वप्रभूचें भजन करणार नाहीं, ४ जो अम्मीला आहुति देणार नाहीं, देवतांना पुजणार नाहीं, किंवा ब्राह्मणांना यथाकाळी जेवण घालणार नाहीं, ५ जो गुरूची भक्ति करणार नाहीं, अतिथि-अभ्यागताचा सत्कार करणार नाहीं, किंवा आपल्या जातगोताचा संतोष राखणार नाहीं, ६ असा जो स्वधर्माचाराला पराङ्‌मुख होईल व प्राप्त १ वसंताचें. २ यज्ञानें संतुष्ट झालेले. ३ आढ्यतेनें.