पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ८१ तैं नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें । परी नेणतीचि तियें यज्ञातें | सूक्ष्म म्हणौनी ॥ ८६ ॥ ते वेळीं जीं विनविला ब्रह्मा | देवा काय आश्रयो एथ आम्हां । तंव म्हणे तो कमळजन्मा | भूतांप्रति ॥ ८७॥ तुम्हां वर्णविशेषैव । आम्हीं हा स्वधर्मचि विहिला असे । यातें उपासा मग पैसे | पुरती काम ॥ ८८ ॥ तुम्हीं व्रतनियम न करावे । शरीरातें न पीडावें । दुरी केही न वचावें । तीर्थांसी गा ॥ ८९ ॥ योगादिकें साधनें । सौकांक्ष आराधनें | मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥ ९० ॥ देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें । तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥ ९१ ॥ अहेतुकें चित्तें । अनुष्ठां पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ॥ ९२ ॥ तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्यु तुम्हां एक । ऐसें सत्यलोक- नायकु । वोलता जाहला ॥ ९३ ॥ देखा स्वधर्मातें भजाल | तरी कामधेनु हा होईल । मग प्रजा हो न सांडील | तुमतें कदा ॥ २९४ ॥ देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ११ ॥ सम० - भजा देवांस या यज्ञे देव देती फळें तुम्हां । अन्योन्य भजतां ऐसें पावाल श्रेय उत्तम ॥ ११ ॥ आर्या-यज्ञे देवासि तुम्ही देव तुम्हांला परस्परें भावा । अन्योन्यभावनेनें पावाल श्रेय धरुनियां भावा ॥ ११ ॥ वी- तुम्ही देवां भावें पूजा । ते प्रसन्न होती सहजा । परस्परें तुमचिया काजा । श्रेय देतील ॥ ११ ॥ जे येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सितां । अर्थातें देती ।। ९५ ।। या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । तेव्हां त्यानें समस्त मानव या नित्ययज्ञासह म्हणजे विहिताचाराच्या धर्मासहच निर्माण केले; परंतु हा नित्याचारधर्म गहन असल्यामुळें त्या अज्ञ प्राण्यांना तो समजेना. ८६ तेव्हां सर्व मानवांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, कीं, 'देवा, आमचे जीवाचे सार्थक होण्याला व सर्व यथास्थित चालण्याला आम्हांला आधार काय आहे ? ' तेव्हां ब्रह्मदेव मानवांना म्हणाला, ८७ 'तुम्हांला तुमच्या वर्णपरत्वें उचित असा ' स्वधर्म' नांवाचा यज्ञ नेमस्त केला आहे. याची उपासना करा म्हणजे तुमच्या सर्व इच्छा आपोआप पुऱ्या होतील. ८८ तुम्हांला व्रतनियमांच्या भरीस पडावयास नको, तपश्चरणानें शरीरदंड सोसावयास नको, किंवा दूरदूरच्या तीर्थयात्राही करावयाला नकोत. ८९ योगादि मोक्षाचे उपाय, नानाप्रकारच्या कामिक उपासना, आणि मंत्रयंत्राचे प्रयोग, यांच्या नाहीं एखादे लागालविगाल ! ९० नानांदेवतांचें भजनही तुम्ही मुळींच करूं नका. केवळ स्वधर्माचरणाचा अनायासानें घडणारा यज्ञ मात्र करीत जा. ९१ तुम्ही मनांत कोणताही स्वार्थ न देवतां या स्वधर्माचे अनुष्ठान करा. जशी पतिव्रता आपल्या पतीची आराधना एकनिप्रेनें व निष्कामबुद्धीनें करते, तशी तुम्हीं या यज्ञाची आराधना करणें, हेंच तुमचें कतर्व्य आहे. ' सत्यलोकाचा अधिपति ब्रह्मदेव आणखी म्हणाला- ९२, ९३ 'अहो मानव हो, जर तुम्हीं या स्वधर्माचं भक्तीनें सेवन कराल, तर तो कामधेनूप्रमाणें तुमच्या सर्व इच्छा तृप्त करील. आणि मग हा तुम्हांला कधींही निराधार सोडणार नाहीं. ९४ जेव्हां या स्वर्धाचरणरूपी यज्ञानें तुम्ही सर्व देवतांना संतुष्ट कराल, तेव्हां त्या देवता तुम्हांला सर्व इच्छित वस्तू देतील. ९५ या स्वधर्माचरणरूपी पूजेनें तुम्ही देवतांना पूजाल, तेव्हां त्या देवता १ प्रजानी, मनुष्यप्राण्यांनी २ वर्णभेदानुसार ३ सकाम, काम्य ४ ब्रह्मदेव. ११