पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० सार्थ श्रीज्ञानेश्वरी म्हणोनि नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे । आणि निपिद्ध केवीं राहाटावें । विचारीं पां ॥ ७७ ॥ म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरें- करूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥ ७८ ॥ पार्थी आणिकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जे ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥ ७९ ॥ देखें अनु- क्रमाधारें। स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ||८०|| सम० - यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ९ ॥ 1- विष्णुप्रीत्यर्थ जें कर्म त्याविणें सर्व बंधके । तत्प्रीत्यर्थहि कौंतेया संग टाकूनि आचरें ॥ ९ ॥ आर्या-यज्ञार्थविण करितां कौंतेया कर्म तें जना बाधी । निसंग कर्म हरिच्या प्रीत्यर्थ करावया असो वा धी ॥ ९ ॥ ओवी - 'यज्ञ विष्णु' ऐसी श्रुती । तयावेगळें कर्म अन्यत्र अर्पितां बद्ध होती । म्हणूनि कौंतेया तत्प्रीत्यर्थ देती । फळ टाकूनि आचरें तूं ॥ ९ ॥ स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञ जाण पां । म्हणोनि वर्ततां तेथ पापा | संचारु नाहीं ॥ ८१ ॥ हा निजधर्म जैं सांडे । आणि कुकर्मी रति घडे । तैंचि बंधु पडे । सांसारिक ॥ ८२ ॥ म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञयाजन । जो करी तया बंधन | कांहींच न घडे ॥ ८३ ॥ हा लोकु कर्मै बांधिला । जो परतंत्रा भुलला । तो नित्ययज्ञातें चुकला । म्हणोनियां ॥ ८४ ॥ आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एक मी कथा । जैं सृष्ट्यादि संस्थां । ब्रह्मे केली ॥ ८५ ॥ 1 सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ १० ॥ सम० -- प्रजा यज्ञासर्वे ब्रह्मा पूर्वी निर्मूनि बोलिला । कीं या यज्ञीं वृद्धि पावा तुमची कामधेनु हा ॥ १० ॥ आर्या-यज्ञासह जन निर्मुनि बोले विधि त्यांस हैं असें स्पष्ट । यज्ञे प्रसवा तुम्ही तुमचा पुरवील काम हा इष्ट ॥ १० ॥ ओवी - ब्रह्मयानें यज्ञ आणि सृष्टि केली । मग आशीर्वादांची उत्तरें बोललीं । यज्ञकामधेनु दुहिली । भक्तांस्तव ॥ १० ॥ तेव्हां नैष्कर्म्य साधणें असेल, तर तें या जगांत शक्य नाहीं; आणि निषिद्ध कर्म आचरावें कीं काय, याचा तूंच विचार कर. ७७ यासाठीं जें जें कर्म योग्य व प्रस्तुत असेल, तें तें निष्काम मनानें तूं आचरावंस. ७८ अर्जुना, यासंबंध आणखी एक मौज तुझ्या लक्षांत आलेली नाहीं, ती ही, कीं, अशा रीतीनें आचरलेले कर्म आपोआप मोक्षदायक होते. ७९ तूं ध्यानांत ठेव, कीं, जो शास्त्राज्ञेच्या आधाराने स्वधर्माप्रमाणें कर्म करितो, तो त्याच कर्माच्या साह्यानें मोक्ष निश्चयेंकरून पावतो. ८० आपला जो स्वधर्म, त्यालाच, बा अर्जुना, 'नित्ययज्ञ' हें नांव आहे, म्हणून तो करण्यांत पापाची पायचालही नसते. ८१ हा स्वधर्म जेव्हां सुटतो आणि भलत्याच परधर्माची आवड उत्पन्न होते, तेव्हांच संसाराचं म्हणजे जन्ममरणाचे बंधन पुरुषाला पडते. ८२ यास्तव, जो नेहमीं स्वधर्मा- प्रमाणं कर्म आचरतो, त्याच्या हातून त्या कर्माचरणांतच निरंतर यज्ञकर्म घडते, म्हणून असें कर्म जो करितो, त्याला संसाराचा गुंता गोवूं शकत नाहीं. ८३ जो हा सर्व लोक आहे. तो मायेच्या पंगस्तीस मोहाने गेल्यामुळे व स्वधर्माचरणरूपी नित्ययज्ञ त्याच्याकडून न घडल्यामुळे, तो कर्मबंधांत जखडला आहे. ८४ आतां, अर्जुना, याच विषयास अनुसरून मी तुला एक कथा सांगतो. जेव्हां ब्रह्मदेवाने ही सृष्टि व इतर कार्ये केली, ८५ १ शिरकाव २ रचना.